आई-वडिलांना बनवायचे होते IAS-IPS,जिद्दीने सुरु केली शेती आणि आता वर्षाला कमावतो 80 लाख रुपये

सुधांशु कुमार 1990 पासून शेती करीत आहे आणि वैज्ञानिक पद्धतीने शेती करून, आपले उत्पादन वाढवून अधिकाधिक उत्पन्न मिळवत आहे. (Parents wanted to make IAS-IPS, stubbornly started farming and now earns Rs 80 lakh a year)

आई-वडिलांना बनवायचे होते IAS-IPS,जिद्दीने सुरु केली शेती आणि आता वर्षाला कमावतो 80 लाख रुपये
या तारखेनंतर येणार किसान सन्मान निधीचा आठवा हप्ता
Follow us
| Updated on: Apr 01, 2021 | 4:35 PM

नवी दिल्ली : बिहारमधील समस्तीपूर जिल्ह्यातील एक शेतकरी आज शेतीतून दरवर्षी 80 लाख रुपये कमावत आहे. तथापि, शेतकरी होण्याचा त्यांचा मार्ग सोपा नव्हता. घरातील लोकांना त्यांना आयएएस-आयपीएस बनवायचे होते. पण हट्टाने त्यांनी शेती सुरू केली आणि आज त्याचा परिणाम सर्वांसमोर आहे. हा 58 वर्षांचा शेतकरी पारंपारिक शेती करीत नाही तर तंत्रज्ञानाचा वापर करून संपूर्ण शेती करतो. शेतीमधील आपले यशाचे श्रेय ते तंत्रज्ञानाला देतात. शेतकरी सुधांशु कुमार यांनी आपल्या 60 एकर जागेवर आंबा, केळी, पेरू, बेरी, लीची, ब्राझिलियन स्वीट लाईम आणि ड्रॅगन फळ याशिवाय अन्य फळे आणि भाज्यांची 28 हजार झाडे लावली आहेत. त्यांची उत्पादने विकून ते वार्षिक 80 लाख रुपये कमावत आहेत. ‘द बेटर इंडिया’च्या वृत्तानुसार, सुधांशु कुमार 1990 पासून शेती करीत आहे आणि वैज्ञानिक पद्धतीने शेती करून, आपले उत्पादन वाढवून अधिकाधिक उत्पन्न मिळवत आहे. (Parents wanted to make IAS-IPS, stubbornly started farming and now earns Rs 80 lakh a year)

टाटाची नोकरी सोडून केली शेतीला सुरुवात

आपल्या शेतीच्या प्रवासाबद्दल बोलताना, सुधांशु कुमार सांगतात की, त्यांची सुरुवात टाटा टी गार्डन, मुन्नार येथील सहाय्यक व्यवस्थापकाची नोकरी नाकारल्यापासून झाली. केरळहून ते शेतीसाठी आपल्या घरी आले, परंतु त्यांचा मार्ग सोपा नव्हता. ते म्हणतात की माझे आजोबा शेती करीत असत आणि मला त्यांची परंपरा पुढे न्यायची होती पण माझ्या वडिलांना मला नागरी सेवेत पाठवायचे होते. बर्‍याच प्रयत्नांनंतर माझ्या वडिलांनी मनापासून मला पाच एकर जागेवर शेती करण्याची परवानगी दिली.

पहिल्यांदा 25 हजार रुपये गुंतवून केली 1.35 लाखांची कमाई

सुधांशु कुमार सांगतात की, ‘वडिलांनी मला चाचणीसाठी चांगली जमीन दिली नाही. पण मी तंत्रज्ञानाची मदत घेतली आणि पुसा येथील डॉ. राजेंद्र प्रसाद केंद्रीय कृषी विद्यापीठाच्या वैज्ञानिकांशी बोलून शेती करण्यास सुरवात केली. त्यानंतर 25 हजार रुपये गुंतवणूक आणि वर्षभर मेहनत घेतल्यानंतर मी त्या शेतीतून 1.35 लाख रुपये मिळवले. ही माझ्यासाठी मोठी रक्कम होती. मला देण्यात आलेल्या शेतातून कधीही 15 हजारांहून अधिक कमाई झालेली नाही. ‘आज सुधांशु त्याच पाच एकर जागेवर शेती करुन 13 लाख रुपये कमावत आहे.

सध्या 200 एकर जमिनीवर करतात शेती

सध्या सुधांशु 200 एकर जागेवर शेती करतात. त्यापैकी 60 एकर जमिनीवर मायक्रो इरीगेशन आणि 35 एकर जमिनीवर स्वयंचलित पद्धतीने लागवड केली जाते. ते म्हणतात की तंत्रज्ञानाच्या वापराने मी दर्जेदार शेती करण्यास सक्षम आहे. तंत्रज्ञानामुळे उत्पादन अधिक आणि पारंपारिक शेतीच्या तीनपट उत्पन्न मिळते.

कंट्रोल रूममधून एक बटण दाबून करतात सर्व काम

सुधांशु कुमार यांच्या शेतीत तंत्रज्ञानाचा वापर सर्वात महत्वाचा आहे. सुधांशुने एक नियंत्रण कक्ष स्थापित केले आहे ज्यात एक बटण दाबले की सिंचनापासून ते खत फवारणीपर्यंत सर्व काही स्वयंचलित पद्धतीने करता येते. ते म्हणतात की केवळ नियंत्रणाद्वारेच ठिबक व माइक्रो स्प्रिंकलर सिस्सटने सिंचन होते. कंट्रोल रूममध्ये बनविलेल्या टाकीमधून ठिबकद्वारे खत फवारणी केली जाते. सिंचन करण्यासाठी किंवा खत टाकण्यासाठी सुधांशु शेतात जात नाहीत. कंट्रोल रूममधूनही याबाबत माहिती देतात. (Parents wanted to make IAS-IPS, stubbornly started farming and now earns Rs 80 lakh a year)

इतर बातम्या

ICAI CA May Exam 2021: मे महिन्यातील सीए परीक्षेसाठी नोंदणी सुरु, रजिस्ट्रेशनसाठी वाचा सोप्या टिप्स

मोठी बातमी: अँटीजेन टेस्ट केली तरच नवी मुंबईच्या एपीएमसी मार्केटमध्ये प्रवेश

Non Stop LIVE Update
तर भाजपात पहिली उडी मारणारे सुनील तटकरे असतील रोहित पवार यांची टीका
तर भाजपात पहिली उडी मारणारे सुनील तटकरे असतील रोहित पवार यांची टीका.
शिवसेनेची पहिली यादी जाहीर, सात विद्यमान खासदारांना पुन्हा संधी
शिवसेनेची पहिली यादी जाहीर, सात विद्यमान खासदारांना पुन्हा संधी.
एका जागेसाठी कॉंग्रेसला देशाचे पंतप्रधान पद घालवायचं का ? - संजय राऊत
एका जागेसाठी कॉंग्रेसला देशाचे पंतप्रधान पद घालवायचं का ? - संजय राऊत.
आनंद दिघेंचा शिष्य यंदा मारणार हॅट्रीक, केदार दिघे यांचा विश्वास
आनंद दिघेंचा शिष्य यंदा मारणार हॅट्रीक, केदार दिघे यांचा विश्वास.
ओवेसी आणि इम्तियाझ यांनी चष्म्याचे नंबर बदलावे -केंद्रीय मंत्री भागवत
ओवेसी आणि इम्तियाझ यांनी चष्म्याचे नंबर बदलावे -केंद्रीय मंत्री भागवत.
लवकरच बरा होऊन... दिलीप वळसे पाटील यांचं दुखापतीनंतर पहिलं टि्वट काय?
लवकरच बरा होऊन... दिलीप वळसे पाटील यांचं दुखापतीनंतर पहिलं टि्वट काय?.
शिवसेनेत पक्ष प्रवेश करताच गोविंदाला हवी 'ही' जबाबदारी, शिंदे देणार?
शिवसेनेत पक्ष प्रवेश करताच गोविंदाला हवी 'ही' जबाबदारी, शिंदे देणार?.
जलील बोलका पोपट आणि चंद्रकांत खैरे नाकारलेला उमेदवार, कुणी केली टीका?
जलील बोलका पोपट आणि चंद्रकांत खैरे नाकारलेला उमेदवार, कुणी केली टीका?.
गोविंदाचा शिंदेंच्या शिवसेनेत प्रवेश, मुख्यमंत्र्यांच्या उपस्थित घोषणा
गोविंदाचा शिंदेंच्या शिवसेनेत प्रवेश, मुख्यमंत्र्यांच्या उपस्थित घोषणा.
बॉलिवूड कलाकार राजकारणात, सेनेकडून हे स्टार प्रचारक लोकसभेच्या रिंगणात
बॉलिवूड कलाकार राजकारणात, सेनेकडून हे स्टार प्रचारक लोकसभेच्या रिंगणात.