ड्रोनच्या माध्यमातून होणार पिकांवरील कीडीचे नियंत्रण, जानेवारीपासून मराठवाड्यात प्रशिक्षण

शेती व्यवसयामध्ये अमूलाग्र बदल होत आहे. वेळीची बचत आणि तत्परता साधण्यासाठी आता पिकांवरील किडीचे नियंत्रण पध्दतीमध्येही बदल होत आहे. मध्यंतरीच ड्रोन वापराच्या अनुशंगाने केंद्र सरकारने नियामावली जारी केली होती. आता ड्रोनच्या वापराची प्रत्यक्ष वेळ आली असून मराठवाड्यातील उस्मानाबाद जिल्ह्यामध्ये जानेवारी महिन्यापासून ड्रोन हातळण्याचे प्रशिक्षण हे दिले जाणार आहे.

ड्रोनच्या माध्यमातून होणार पिकांवरील कीडीचे नियंत्रण, जानेवारीपासून मराठवाड्यात प्रशिक्षण
संग्रहीत छायाचित्र
टीव्ही 9 मराठी डिजीटल टीम

| Edited By: राजेंद्र खराडे

Dec 22, 2021 | 11:58 AM

उस्मानाबाद : (Agriculture) शेती व्यवसयामध्ये अमूलाग्र बदल होत आहे. वेळीची बचत आणि तत्परता साधण्यासाठी आता (spraying of crop) पिकांवरील किडीचे नियंत्रण पध्दतीमध्येही बदल होत आहे. मध्यंतरीच ड्रोन वापराच्या अनुशंगाने केंद्र सरकारने नियामावली जारी केली होती. आता ड्रोनच्या वापराची प्रत्यक्ष वेळ आली असून मराठवाड्यातील उस्मानाबाद जिल्ह्यामध्ये जानेवारी महिन्यापासून ड्रोन हातळण्याचे प्रशिक्षण हे दिले जाणार आहे. त्याअनुशंगाने आमदार राणाजगजितसिंह यांची ड्रोन संबंधित कंपनीच्या अधिकाऱ्यांची बैठक झाली असून जानेवारीपासून शेतकऱ्यांना प्रशिक्षण दिले जाणार आहे.

सेंटर ऑफ एक्सलंन्स ची होणार स्थापना

कृषी क्षेत्राशी निगडीत असलेल्या तरुणांना योग्य ते प्रशिक्षण देण्याच्या अनुशंगाने उस्मानाबाद येथे एक्सलन्स सेंटरची स्थापना करण्यात येणार आहे. तसेच शेती व्यवसयात ड्रोनचे तंत्रज्ञान किती महत्वाचे आहे हे देखील शेतकऱ्यांना सांगितले जाणार आहे. केंद्र सरकारनेही ड्रोनच्या वापराला परवानगी दिली असून त्याबाबत मार्गदर्शक सुचना केल्या आहेत. आता केंद्र सरकारचा उपक्रम थेट शेतकऱ्यांच्या बांधावर येऊन ठेपला आहे.

ड्रोनचा काय फायदा होणार?

आता कुठे रब्बीतील पिकांची उगवण झाली आहे. सुरवातीच्या अवस्थेतील किड ही डोळ्यांनी सहजासहजी दिसत नाही. मात्र, हाय डेफिनेशन कॅमेरामुळे या किडीचा प्रादुर्भाव लक्षात येणार आहे. ड्रोनमुळे किडीवर आळा घालण्यासाठी योग्य औषधांची योग्य प्रमाणात फवारणी आणि ते ही वेळेवर करणे सहज शक्य होणार आहे. कमी वेळेत आणि कमी खर्चात औषध फवारणी होणार आहे. उंचावरुन फवारणीमुळे अत्यंत लहान तुषार पिंकावर सर्वत्र सम प्रमाणात फवारणी होणार आहे.

काय आहेत कृषी मंत्रालयाचे निर्देश?

ड्रोनच्या माध्यमातून किटनाशकांवर औषध फवारणी करण्याची मोठी क्षमता आहे. असे असले तरी यामध्ये पिकांचे संगोपन आणि काही दुष्परिणाम होणार नाहीत त्याअनुशंगाने कृषी मंत्रालय हे काळजी घेत आहे. यामध्ये पिक फवारणी क्षेत्र, फ्लाय क्लिअरन्स, वजनाची मर्यादा, नोंदणी, सुरक्षा विमा तसेच हंगामी परस्थितीचा उल्लेख याचा समावेश नियमावली तयार करताना करण्यात आला आहे. एवढेच नाही तर ड्रोन उडवण्यापूर्वी आणि खाली उतरवतानाही काय काळजी घ्यावयची याची नियमावली ठरवून देण्यात आली आहे.

संबंधित बातम्या :

तुरीची आवक सुरु होताच केंद्र सरकारचा मोठा निर्णय, काय होणार दरावर परिणाम?

मराठवाड्यात 11 महिन्यात 805 शेतकऱ्यांच्या आत्महत्या, बीडचा आकडा भीतीदायक, काय घडतंय?

P. M Kisan Sanman Yojna | 10 वा हप्ता जमा होण्यापूर्वी जाणून घ्या eKYC करायचे कसे? प्रत्येक शेतकऱ्यासाठी महत्वाची बातमी

Follow us on

Related Stories

Most Read Stories

Click on your DTH Provider to Add TV9 MARATHI

राज्य चुनें