AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

PM Kisan: 2000 रुपये खात्यात आले की नाही? एका क्लिकवर बॅलेन्स तपासा

PM Kisan Yojana: पंतप्रधान शेतकरी सन्मान योजनेचा 21 वा हप्ता आज जमा होत आहे. लाखो शेतकऱ्यांच्या खात्यात ही रक्कम जमा होईल. तुमच्या खात्यात 2,000 रुपये आले की नाही? एका क्लिकवर जाणून घ्या

PM Kisan: 2000 रुपये खात्यात आले की नाही? एका क्लिकवर बॅलेन्स तपासा
पीएम किसान योजना
| Updated on: Nov 19, 2025 | 3:22 PM
Share

PM Kisan Samman Nidhi 21th Installment: देशभरातील कोट्यवधी शेतकऱ्यांच्या खात्यात आज 21 वा हप्ता जमा होत आहे. या योजनेची घोषणा 1 डिसेंबर 2018 रोजी करण्यात आली होती. या योजनेतंर्गत केंद्र सरकार बँक खात्यात दरवर्षी DBT सेवेतंर्गत तीन हप्त्यात 6 हजार रुपये जमा करते. 24 फेब्रुवारी 2019 रोजी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी गोरखपूर येथे पीएम-किसान योजनेतंर्गत पहिला हप्ता जमा केला होता. आज त्यांच्या हस्ते 21 वा हप्ता देण्यात येणार आहे. या योजनेचे बजट हे 75,000 कोटी रुपये इतके आहे. या योजनेत आतापर्यंत 20 हप्ते जमा करण्यात आले आहेत.

पंतप्रधानांच्या हस्ते जमा होणार रक्कम

पंतप्रधान नरेंद्र मोदी हे आज 19 नोव्हेंबर रोजी 21 वा हप्ता देण्याची प्रक्रिया पूर्ण करतील. पंतप्रधानांचा आज तामिळनाडूतील कोईम्बतूर येथे दौरा आहे. येथे ते दक्षिण भारतातील कृषी शिखर संमेलन 2025 चे उद्धघाटन करतील. देशभरातील 9 कोटी शेतकऱ्यांना मदत करण्यासाठी ते 18 हजार कोटींहून अधिकची रक्कम शेतकऱ्यांच्या खात्यात जमा करतील.

PM Kisan: हप्ता जमा झाला का?

पीएम किसान योजनेत स्टेटस तपासण्यासाठी तुम्हाला एक नोंदणीकृत क्रमांक मिळेल. तुम्ही आधार वा मोबाईल क्रमांकाआधारे हा रजिस्ट्रेशन क्रमांक सहज मिळवू शकता. Registration Number जाणून घेण्यासाठी pmkisan.gov.in या साईटवर Know your Registration हा पर्याय शोधा.

तर पंतप्रधान शेतकरी सन्मान निधी योजनेचा 21 वा हप्ता जमा झाला की नाही हे तपासण्यासाठी pmkisan.gov.in या वेबसाईटवर जा. शेतकरी कॉर्नर या पर्यायावर जा. लाभार्थ्यांच्या यादीवर जा. तुमचा आधार क्रमाक, खाते क्रमांक नोंदवा. “Get Data” वर क्लिक करा. पेमेंट स्टेट्स चेक करा.

येथे करा तक्रार

ई-केवायसी पूर्ण झाले असेल तर लाभार्थ्याच्या खात्यात रक्कम जमा होते.खात्यासोबत आधार कार्ड लिंक करणे आवश्यक आहे. तरच खात्यात पैसा येईल. पंतप्रधान शेतकरी सन्मान निधी योजनेविषयी काही अडचण असल्यास शेतकर्‍यांनी हेल्पलाईन क्रमांक 1800-115-5525 वर संपर्क करावा. PM Kisan हेल्पलाईन 155261 वा 011-24300606 येथे कॉल करावा.

सर्वात अगोदर कृषी अधिकारी, लेखापाल यांच्याकडे चौकशी करा.

खात्यात रक्कम जमा झाली नसल्याचे त्यांना सांगा.

त्यांच्याकडे तक्रार करुनही समाधान न झाल्यास पीएम-किसान हेल्प डेस्ककडे तक्रार करा.

pmkisan-ict@gov.in या ईमेलवर तक्रार पाठविता येईल.

पीएम-किसान हेल्प डेस्कच्या 011-23381092 (Direct Help Line) वर फोन करा.

मुंबई महापालिकेवर महायुतीचाच महापौर बसणार; अमित साटम यांचा दावा
मुंबई महापालिकेवर महायुतीचाच महापौर बसणार; अमित साटम यांचा दावा.
दिल्लीतून मुंबईचा महापौर ठरणं हा महाराष्ट्राचा अपमान
दिल्लीतून मुंबईचा महापौर ठरणं हा महाराष्ट्राचा अपमान.
महापालिकांमध्ये सत्तेचा पेच; महाराष्ट्रात पुन्हा ‘घोडेबाजार’ रंगणार?
महापालिकांमध्ये सत्तेचा पेच; महाराष्ट्रात पुन्हा ‘घोडेबाजार’ रंगणार?.
निष्ठावंतांची कोंडी, फडणवीसांच्या निकटवर्तीय नेत्याचा संन्यास
निष्ठावंतांची कोंडी, फडणवीसांच्या निकटवर्तीय नेत्याचा संन्यास.
मुंबईत बिहार भवन उभारणीवरून नवा वाद; मनसेचा थेट इशारा
मुंबईत बिहार भवन उभारणीवरून नवा वाद; मनसेचा थेट इशारा.
चंद्रपूर महापौर पदावर मोठा ट्विस्ट; काँग्रेसच्या गटबाजीचा भाजपला फायदा
चंद्रपूर महापौर पदावर मोठा ट्विस्ट; काँग्रेसच्या गटबाजीचा भाजपला फायदा.
भाजपात खळबळ, अजितदादांनी बडा नेता फोडला, थेट पक्षप्रवेश
भाजपात खळबळ, अजितदादांनी बडा नेता फोडला, थेट पक्षप्रवेश.
महाबळेश्वरमध्ये राजमाता जिजाऊंचा ‘सुवर्णतुलादिन' उत्साहात पडला पार
महाबळेश्वरमध्ये राजमाता जिजाऊंचा ‘सुवर्णतुलादिन' उत्साहात पडला पार.
शिवसेना, राष्ट्रवादी पक्ष चिन्हावरील सुनावणी 21 जानेवारीला होणार
शिवसेना, राष्ट्रवादी पक्ष चिन्हावरील सुनावणी 21 जानेवारीला होणार.
अनेक नगरसेवक आमच्या संपर्कात, भाजपच्या बड्या नेत्याचे विधान
अनेक नगरसेवक आमच्या संपर्कात, भाजपच्या बड्या नेत्याचे विधान.