AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

महावितरणकडून सुविधांपेक्षा अडचणी अधिक, थकबाकी अदा करुनही समस्या कायम, काय आहे बांधावरची स्थिती?

यंदा सरासरीपेक्षा अधिकचा पाऊस झाल्याने मुबलक प्रमाणात पाणी आहे. असे असताना केवळ विद्युत पुरवठा सुरळीत नसल्यामुळे पिके करपून जात आहेत. कृषीपंपाकडील वाढत्या थकबाकीमुळे सध्या महावितरणची वसुली मोहीम सोलापूर जिल्ह्यात सुरु आहे.त्यामुळे राज्य सरकारच्या निर्देशानुसार शेतकरी थकीत रक्कमही अदा करीत आहेत. पण असे असूनही सुरळीत विद्युत पुरवठा होत नाही. थकबाकी अदा करुनही सुरळीत विद्युत पुरवठा होत नसल्याने अखेर जनहित शेतकरी संघटनेच्या पदाधिकाऱ्यांनी महावितरणच्या अधिकाऱ्यांना चांगलेत धारेवर धरले आहे.

महावितरणकडून सुविधांपेक्षा अडचणी अधिक, थकबाकी अदा करुनही समस्या कायम, काय आहे बांधावरची स्थिती?
| Edited By: | Updated on: Mar 04, 2022 | 9:43 AM
Share

सोलापूर : यंदा सरासरीपेक्षा अधिकचा पाऊस झाल्याने मुबलक प्रमाणात पाणी आहे. असे असताना केवळ (Power Supply) विद्युत पुरवठा सुरळीत नसल्यामुळे (Crop) पिके करपून जात आहेत. कृषीपंपाकडील वाढत्या थकबाकीमुळे सध्या महावितरणची वसुली मोहीम सोलापूर जिल्ह्यात सुरु आहे.त्यामुळे (State Government) राज्य सरकारच्या निर्देशानुसार शेतकरी थकीत रक्कमही अदा करीत आहेत. पण असे असूनही सुरळीत विद्युत पुरवठा होत नाही. थकबाकी अदा करुनही सुरळीत विद्युत पुरवठा होत नसल्याने अखेर जनहित शेतकरी संघटनेच्या पदाधिकाऱ्यांनी महावितरणच्या अधिकाऱ्यांना चांगलेत धारेवर धरले आहे. वीजबिल अदा करुनही शेतकऱ्यांना त्यांच्या हक्काची वीज मिळत नसेल तर होत असलेल्या नुकसानीला जबाबदार कोण असा सवाल उपस्थित करीत सोलापूर जिल्ह्यातील विद्युत पुरवठा सुरळीत झाला नाही तर मात्र, 7 मार्च रोजी मोहोळ येथे चक्काजाम आंदोलन केले जाणार असल्याचा इशारा देण्यात आला आहे.

बिले अदा करुनही परस्थिती जैसे थे..!

रब्बी हंगामातील पिकांचे नुकसान टाळण्यासाठी शेतकरी वीजबिल अदा करुन कृषीपंप सुरु रहावेत यासाठी प्रयत्न करीत आहे. वेळप्रऔसंगी हातउसणे पैसे घेऊन वीजबिल शेतकऱ्यांनी भरलेले आहे. असे असताना रोहित्रावरील सर्वच थकबाकी अदा झाल्यावरच विद्युत पुरवठा सुरळीत केला जाणार असल्याची भूमिका ही महावितरणने घेतली आहे. त्यामुळे शेतकऱ्यांचे नुकसान हे सुरुच आहे. सध्या उन्हाचा कडाका वाढला असून पिकांना पाण्याची आवश्यकता आहे. आता वेळेवर पाणी मिळाले नाही तर उत्पादनात घट होणार आहे. त्यामुळे महावितरणने आडमुठी भूमिका सोडून विद्युत पुरवठा सुरळीत करण्याची मागणी होत आहे.

काय आहेत शेतकरी संघटनेच्या मागण्या?

सध्या रात्रीच्या वेळी विद्युत पुरवठा केला जात असल्यामुळे कोल्हापूर, सांगली जिल्ह्यामध्ये स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे आंदोलन सुरु आहे. रात्री पिकांना पाणी देताना विंचू, साप हे आढळून आल्यास थेट शासकीय कार्यालयात सोडले जात आहेत. तर आता जनहित शेतकरी संघटनेने दिवसा 10 तास विद्युत पुरवठा करावा अन्यथा 7 मार्च रोजी राष्ट्रीय महामार्गावर चक्काजाम आंदोलन केले जाणार असल्याचा इशारा दिला आहे. सध्या 7 तास अन् तोही रात्रीच्या वेळी विद्युत पुरवठा केला जात आहे.

पाणी असूनही शेतकऱ्यांच्या अडचणी कायम

यंदा सरासरीपेक्षा अधिकचा पाऊस झाल्याने मार्च महिना मध्यावर आला तरी विहीरी, बोरला मुबलक प्रमाणात पाणी आहे. त्यामुळे उत्पादनवाढीसाठी शेतकऱ्यांनी वेगवेगळे प्रयोग राबवलेले आहेत. असे असताना आता विद्युत पुरवठा सुरळीत नसल्याने पिकांचे नुकसान होत आहे. खऱीप निसर्गाच्या लहरीपणामुळे तर आता रब्बी हंगाम महावितरणच्या मनमानी कारभारामुळे वाया जात आहे.

संबंधित बातम्या :

Chickpea Crop : कृषी विभागाकडून हरभऱ्याची उत्पादकता जाहीर? किती टनाला मिळणार हमी भावाचा ‘आधार’?

Banana : एका पिकाचा दुहेरी फायदा, केळीवर प्रक्रिया करुन मिळवा उत्पन्न दुप्पट, जाणून घ्या सर्वकाही

वेळ निघून गेली अन् पीक पेरा नोंदणीचे महत्व कळाले, खरेदी केंद्रावर काय आहेत अडचणी?

बहरीनमध्ये जय पवार यांची हळदी, बघा दिमाखदार सोहळ्याचे फोटो
बहरीनमध्ये जय पवार यांची हळदी, बघा दिमाखदार सोहळ्याचे फोटो.
पार्थ पवारांच्या कंपनीचा 42 कोटी भरण्यास नकार, बावनकुळेंनी ठणकावलं
पार्थ पवारांच्या कंपनीचा 42 कोटी भरण्यास नकार, बावनकुळेंनी ठणकावलं.
रविंद्र चव्हाणांकडून समझोता, पण निलेश राणे तयार नाही!
रविंद्र चव्हाणांकडून समझोता, पण निलेश राणे तयार नाही!.
महायुतीतील मतभेद दूर, आगामी निवडणुका एकत्र लढणार! बघा कोण काय म्हणालं?
महायुतीतील मतभेद दूर, आगामी निवडणुका एकत्र लढणार! बघा कोण काय म्हणालं?.
राणीच्या बागेतील दोन्ही वाघांचा मृत्यू, कारण लपवण्याचं कारण काय?
राणीच्या बागेतील दोन्ही वाघांचा मृत्यू, कारण लपवण्याचं कारण काय?.
'अडीच वर्षाचा स्पीड ब्रेकर सोडला, तर गेल्या 11 वर्षात प्रगतीचं...'
'अडीच वर्षाचा स्पीड ब्रेकर सोडला, तर गेल्या 11 वर्षात प्रगतीचं...'.
पुतीन यांची भारताला मोठी ग्वाही अन् रशिया-भारत करारांवर दिला भर
पुतीन यांची भारताला मोठी ग्वाही अन् रशिया-भारत करारांवर दिला भर.
भारत-रशियात महत्त्वपूर्ण करार, PM मोदी म्हणाले आता व्यापारी संबंधाना..
भारत-रशियात महत्त्वपूर्ण करार, PM मोदी म्हणाले आता व्यापारी संबंधाना...
भाजप-ठाकरे सेनेचा कामगार युनियनवरून राडा, वांद्र्यानंतर वरळीत घडल काय?
भाजप-ठाकरे सेनेचा कामगार युनियनवरून राडा, वांद्र्यानंतर वरळीत घडल काय?.
सुट्ट्यांबाबत इंडिगोचे नियम शिथिल, DGCA कडून जारी केलेले नवे आदेश काय?
सुट्ट्यांबाबत इंडिगोचे नियम शिथिल, DGCA कडून जारी केलेले नवे आदेश काय?.