Banana : एका पिकाचा दुहेरी फायदा, केळीवर प्रक्रिया करुन मिळवा उत्पन्न दुप्पट, जाणून घ्या सर्वकाही

सध्याच्या केळीची तोडणी कामे ही सुरु आहेत. केवळ केळातूनच नाही तर प्रक्रिया करुन विविध माध्यमातून शेतकऱ्यांना उत्पन्न वाढविण्याची संधी आहे.केळी उत्पादक शेतकरी आता केळीपासून पावडर बनवून व्यवसाय करून आपले उत्पन्न दुप्पट करू शकतात. केळी पावडर कच्च्या फळांचा वापर करते. केळीपासून तयार करण्यात येणाऱ्या पावडरला अधिकची मागणी आहे.

Banana : एका पिकाचा दुहेरी फायदा, केळीवर प्रक्रिया करुन मिळवा उत्पन्न दुप्पट, जाणून घ्या सर्वकाही
Banana Powder
राजेंद्र खराडे

|

Mar 03, 2022 | 5:10 AM

मुंबई : सध्याच्या (Banana Crushing) केळीची तोडणी कामे ही सुरु आहेत. केवळ केळातूनच नाही तर प्रक्रिया करुन विविध माध्यमातून शेतकऱ्यांना उत्पन्न वाढविण्याची संधी आहे.केळी उत्पादक शेतकरी आता केळीपासून पावडर बनवून व्यवसाय करून आपले उत्पन्न दुप्पट करू शकतात. (Banana Powder) केळी पावडर कच्च्या फळांचा वापर करते. केळीपासून तयार करण्यात येणाऱ्या पावडरला अधिकची मागणी आहे. त्यामुळे शेतकरी जे मुख्य पिकातून कमवू शकत नाही ते केळीच्या पावडर मधून आपले (Increase in income) उत्पन्न वाढू शकतो. याकरिता केवळ केळीच्या पावडरचे मार्केटींग होणे गरजेचे असल्याचा सल्ला फलोत्पादन विभागाचे शास्त्रज्ञ डॉ. राजेंद्र प्रसाद यांनी दिला आहे.

* शेतकऱ्यांनी सर्वात आगोदर हिरव्या केळी फळांना सोडियम हायपोक्लोराइट द्रावण 10 ग्रॅम देणे गरजेचे आहे. त्यानंतर लागलीच सायट्रिक अॅसिड हे 1 ग्रॅम हे 1 लिटर पाण्यात 5 मिनिटे बूडवून ठेवणे गरजेचे आहे.

  • त्यानंतर केळीचे 4 मीमी जाडीचे तुकडे करणे गरजेचे आहे. त्यानंतर त्याच द्रावणात पुन्हा बुडवावीत, जेणेकरून एंजाइमॅटिक ब्राउनिंग होऊ नये. त्यानंतर केळीचे काप 60 डिग्री सेल्सियस पर्यंत कोरडे होण्यासाठी ओव्हनमध्ये 24 तास ठेवावे लागणार आहेत.ज्यावेळी केळीचे तुकडे हे ते पूर्णपणे कोरडे होत नाहीत तोपर्यंत त्याची काळजी घेणे गरजेचे आहे. हे तुकडे एवढे वाढवावे लागणार की त्याचा खळखळ असा आवाज येणे गरजेचे आहे.
  • ब्लेंडर आणि मिक्सरमध्ये हळू हळू केळीचे बारीक करुन घ्यावी लागणार आहे. जोपर्यंत त्याची बारीक पावडर होत नाही तोपर्यंत ही प्रक्रिया पूर्ण करावी लागणार आहे. यानंतर केळी जर पिवळ्या रंगाची असेल आणि केळीचा हलका सुगंध असेल. तयार होणारी पावडर पॉलिथिलीनच्या पिशव्या, शिशाच्या बाटल्यांमध्ये पॅक करून 20- 25 अंश सेल्सिअसच्या तापमानात साठवणे गरजेचे आहे. या पद्धतीनं केळीची पावडर तयार होईल. केळीपासून तयार केलेल्या पावडरमध्ये किंमत आणि नफ्याचे प्रमाण हे अधिक आहे.त्यामुळे शेतकऱ्यांचे उत्पन्न दोनपटीहून अधिक होणार असून त्याचा फायदा होणार आहे.
  • केळीची पावडर ही मधुमेहींसाठी उत्तम पर्याय आहे, मुलांसाठी उपयुक्त, हृदयाची काळजी घेण्यासाठी, त्वचेसाठी उपयुक्त, पचनशक्ती मजबूत करणे, वजन कमी करणे आणि वाढवणे या दोन्हीसाठी कार्य करते. एवढेच नाही तर ऑनलाईनच्या माध्यमातून केळी पावडरची विक्री व्हावी यासाठी योग्य धोरण ठरवावे लागणार आहे.
  • शेतीमालाची आयात सुरु होताच कंपन्यांकडून दररोज येथे तुम्ही मोफत नोंदणी करून तुमच्या मालाची विक्री करू शकता, या सर्व कंपन्यांकडून दररोज 1 किलोची ऑर्डर आली तरी रोज किमान 7 किलो उत्पादनांची विक् करता येते.
  • विद्यापीठातील केळीपासून तयार करण्यात आलेल्या केळी पावडरचे प्रमाणीकरण कृषी महाविद्यालय येथील हॉर्टिकल्चर विभागाचे सहाय्यक प्राध्यापक डॉ. के. प्रसाद यांनी अखिल भारतीय समन्वित संशोधन प्रकल्प, फळांचे प्रधान अन्वेषक व सहसंचालक संशोधन डॉ. संजयकुमार सिंह यांच्या मार्गदर्शनाखाली अन्न विज्ञान तंत्रज्ञान प्रयोगशाळेत केले आहे. तसेच, केळीची पावडर तयार करण्यासाठी ज्या जातींची लागवड केली जात आहे, त्या सर्व प्रकारच्या केळीचे काम सुरू आहे, अशी माहितीही त्यांनी दिली.

संबंधित बातम्या :

दुष्काळात तेरावा : युध्दजन्य परस्थितीमुळे खतांचा तुटवडा भासणार? इतर पर्यायाच्या शोधात केंद्र सरकार

उत्सुकता शिघेला, दोन दिवस बाजार समित्या बंद नंतर सोयाबीन दराचे चित्र काय? तज्ञांचे शेतकऱ्यांना सल्ला

Photo: हौसेला नाही मोल..! गायीच्या डोहाळे जेवणात गावाचा सहभाग, संस्कृतीचे जतन अन् वेगळेपणही

Follow us on

Related Stories

Most Read Stories

Click on your DTH Provider to Add TV9 MARATHI

राज्य चुनें