खरिपात नुकसान झालेलीच पिके आता ठरत आहेत फायद्याची, दोन महिन्यांमध्येच चित्र बदलले

पावसामुळे नुकसान झालेल्या खरिपातील दोन्ही मुख्य पिकांच्या दरात आता दिवसेंदिवस वाढ होत आहे. सोयाबीन आणि कापूस ही खरिपातील मुख्य पिके आहेत. मात्र, काढणीच्या दरम्यान पावसाचे थैमान आणि निर्माण झालेली परस्थिती यामुळे या पिकांचे काय होणार हा प्रश्न होता पण आता आवक सुरु झाल्यानंतर दोन महिन्यांनी परस्थिती पूर्ण बदललेली आहे. कापूस आणि सोयाबीनच्या दरात कमालीची वाढ झाली आहे.

खरिपात नुकसान झालेलीच पिके आता ठरत आहेत फायद्याची, दोन महिन्यांमध्येच चित्र बदलले
संग्रहित

लातूर : यंदाच्या वर्षात जसा पावसाचा भरवसा राहिलेला नाही अगदी त्याप्रमाणेच शेतीमालाच्या बाजारपेठेचे झालेले आहे. उत्पादनात वाढ झाली तरी आणि उत्पादन घटले तरी सर्वकाही बाजारपेठेवरच अवलंबून आहे. पावसामुळे नुकसान झालेल्या खरिपातील दोन्ही मुख्य पिकांच्या दरात आता दिवसेंदिवस वाढ होत आहे. सोयाबीन आणि कापूस ही खरिपातील मुख्य पिके आहेत. मात्र, काढणीच्या दरम्यान पावसाचे थैमान आणि निर्माण झालेली परस्थिती यामुळे या पिकांचे काय होणार हा प्रश्न होता पण आता आवक सुरु झाल्यानंतर दोन महिन्यांनी परस्थिती पूर्ण बदललेली आहे. कापूस आणि सोयाबीनच्या दरात कमालीची वाढ झाली आहे.

खरिपातील मुख्य पिकांना दर मिळाला नाही तर शेतकऱ्यांचे अर्थकारण हे धोक्यात होते. कारण, उत्पादनावर शेतकऱ्यांनी एकरी हजारो रुपये खर्ची केले होते. मात्र, आता या दोन्ही पिकांच्या दरात दिवसाकाठी वाढ होत आहे. शिवाय दोन्ही पिकांची दरवाढीची स्थितीही एकसारखीच आहे.

सोयाबीन, कापसाचे दर

दिवाळीपूर्वी सोयाबीनचे दर हे 4 हजार 500 येऊन ठेपले होते. उत्पादनात झालेली घट आणि बाजारपेठेतले दर यामुळे नेमके काय करावे या अवस्थेत शेतकरी होते. मात्र, दिवाळीनंतर सोयाबीनच्या दरात सुरु झालेली वाढ अद्यापही कायम आहे. सध्या सोयाबीनला 6 हजार 700 रुपयांपर्यंतचे दर मिळत आहेत. शेतकऱ्यांनी सोयाबीनची विक्री टप्प्याटप्प्याने केली तर अधिकचा फायदा होणार असल्याचे सांगितले जात आहे. सोयाबीन प्रमाणेच कापसाची अवस्था आहे. ऐन वेचणीच्या दरम्यान कापसाचे पावसामुळे नुकसान झाले होते. हंगामाच्या सुरवातीपासूनच कापसाची आवक ही कमी प्रमाणात होती. त्यामुळे दर हे टिकून होते. गेल्या काही दिवसांपासून हे दर स्थिर होते. पण आता 8 हजार प्रति क्विंटलप्रमाणे दर मिळत आहे. त्यामुळे काढणीच्या दरम्यान, नुकसान झालेल्या या मुख्य पिकांचा आता शेतकऱ्यांना आधार मिळत आहे.

अफवांमुळे कापसाचे दर स्थिर

दिवाळीनंतर कापसाच्या दरावरुन अफवा पसरु लागल्या होत्या. आता कापसाची निर्यात बंद करुन आयात केली जाणार आहे. वाढत्या दरामध्ये सरकार हस्तक्षेप करुन दर कमी करणार असल्याचा अफवा होत्या त्याच प्रमाणे सोयाबीनबाबत ही झाले होते. दर वाढले की आता सोयापेंडची आयात केली जाणार असल्याची अफवा पसरवली जात होती. मात्र, ऑगस्टनंतर पुन्हा सोयापेंडची आयात केलेली नाही. त्यामुळे सोयाबीनच्याही दरावर काही परिणाम होणार नाही.

शेतकऱ्यांनी काय काळजी घ्यावी

खरिपातील कापूस आणि सोयाबीनच्या दरामध्ये दिवसाकाठी वाढ होत आहे. शिवाय बाजारपेठेत मागणी ही कायम आहे. त्यामुळे शेतकऱ्यांनी ही पिके विक्रीची गडबड न करता टप्प्याटप्प्याने विक्री करणे आवश्यक आहे. अन्यथा आवक अधिक झाली की त्याचा परिणाम हा दरावर होणार आहे. त्यामुळे शेतकऱ्यांनी गरज निर्माण झाल्यावरच विक्री करणे फायद्याचे राहणार आहे. कापसाला 8 हजार तर सोयाबीनला 6 हजार 800 चा दर मिळत आहे. आता हे दर कायम ठेवण्यासाठी शेतकऱ्यांनी संयम दाखवून पिकाच्या साठवणूकीवर भऱ देणे फायद्याचे राहणार आहे.

संबंधित बातम्या :

रब्बी हंगाम : उत्पादन वाढीसाठी हरभरा पिकाचे ‘असे’ करा व्यवस्थापन, शेतकऱ्यांना सल्ला

सोयाबीनच्या दरवाढीत बियाणे कंपनीचाही वाटा, अकोल्यात सर्वाधिक दर

तीन जिल्ह्यातील रब्बी पिकांना जायकवाडी धरणातील पाणी, प्रथमच शेती सिंचनासाठी पाण्याचा विसर्ग

Click on your DTH Provider to Add TV9 MARATHI