पंतप्रधान पीक विमा योजनेत सहभागी व्हायचंय, विम्याचा हप्ता किती, नोंदणी कधीपर्यंत सुरु, वाचा सविस्तर

शेतकरी त्यांचं खातं असलेल्या बँकेच्या शाखा, प्राथमिक कृषी पतपुरठाव संस्था, पीक विमा पोर्टल आणि आपले सरकार सुविधा केंद्र या ठिकाणी पीक विम्याचा हप्ता भरु शकतात.

पंतप्रधान पीक विमा योजनेत सहभागी व्हायचंय, विम्याचा हप्ता किती, नोंदणी कधीपर्यंत सुरु, वाचा सविस्तर
शेतकरी प्रातिनिधिक फोटो

मुंबई: महाराष्ट्रात यंदा वेळे अगोदर मान्सून दाखल झाला. जून महिन्याच्या सुरुवातीला पाऊस झाल्यानं शेतकऱ्यांनी खरिपाच्या पेरण्यांच्या दृष्टीनं तयारी सुरु केली. सन 2021 च्या खरिप हंगामासाठी पीक विमा योजनेत सहभागी होण्यासाठी 15 जुलैपर्यंत मुदत देण्यात आली आहेत. महाराष्ट्र शासनाच्या कृषी विभागनं शेतकऱ्यांना पंतप्रधान पीक विमा योजनेत सहभागी होण्याचं आवाहन केलं आहे. (Prime Minister Crop Insurance Scheme Registration started farmer can submit insurance premium till 15 july)

योजनेची वैशिष्ट्ये

पंतप्रधान पीक विमा योजना ही सर्व शेतकऱ्यांसाठी ऐच्छिक योजना आहे. कर्जदार आणि बिगर कर्जदार शेतकरी त्यांच्या इच्छेनुसार यामध्ये सहभागी होऊ शकतात. शेतकऱ्यांनी खरिप हंगामातील पिकांच्या विमा संरक्षित रकमेच्या 2 टक्के रक्कम भरावी लागणार आहे. नैसर्गिक आपत्ती, कीड आणि रोगांमुळे पिकांचे नुकसान झाल्यास शेतकऱ्यांना विमा संरक्षण देणे हा उद्देश आहे. पिकांचं नुकसान झाल्यास शेतकऱ्यांना आर्थिक मदत व्हावी यासाठी ही योजना सुरु करण्यात आली आहे. खरिपातील सर्व पिकांसाठी जोखीम स्तर 70 टक्के निश्चित करण्यात आला आहे.

कोणत्या कारणामुळं नुकसान झाल्यास भरपाई

खरिप हंगामात पेरणी केल्यापासून काढणीपर्यंतच्या कालावधीत नैसर्गिक आग, वीज कोसळणे, गारपीट, वादळ, चक्रीवादळ, पूर , जमीन जलमय होणे, भुस्खलन होणं, पावसातील खंड, कीड,लरोग यामुळे उत्पादनात आलेली घटक, हवामान घटकांच्या प्रतिकूल परिस्थितीमुळे पिकांची पेरणी किंवा लावणी न झाल्यानं होणारं नुकसान याची जोखीम योजनेत घेतली जाते. खरिप हंगामातील हवामानातील प्रतिकूल परिस्थितीमुळे पिकांचं होणारं नुकसान, नैसर्गिक कारणांमुळे पिकांचं काढणीनंतर होणारं नुकसान आणि स्थानिक नैसर्गिक आपत्तीमुळे होणारं पिकांच नुकसानं याची जोखीम पीक विमा योजनेत घेतली जाते.

पीकनिहाय विमा संरक्षित रक्कम आणि विमा हप्ता रक्कम

भात पिकासाठी विमा संरक्षित रक्कम 33 हजार रुपये आहे. त्यानुसार शेतकऱ्यांना 2 टक्केनं विमा हप्ता भरावा लागेल. भात पिकासाठी शेतकऱ्यांना हेक्टरी 660 रुपये विमा हप्ता भरावा लागेल.

ज्वारी पिकासाठी विमा संरक्षित रक्कम 16 हजार रुपये आहे. त्यानुसार शेतकऱ्यांना 2 टक्केनं विमा हप्ता भरावा लागेल. ज्वारी पिकासाठी शेतकऱ्यांना हेक्टरी 320 रुपये विमा हप्ता भरावा लागेल.

भुईमुग पिकासाठी विमा संरक्षित रक्कम 31500 हजार रुपये आहे. त्यानुसार शेतकऱ्यांना 2 टक्केनं विमा हप्ता भरावा लागेल.भुईमुग पिकासाठी शेतकऱ्यांना हेक्टरी 630 रुपये विमा हप्ता भरावा लागेल.

सोयाबीन पिकासाठी विमा संरक्षित रक्कम 26 हजार रुपये आहे. त्यानुसार शेतकऱ्यांना 2 टक्केनं विमा हप्ता भरावा लागेल. सोयाबीन पिकासाठी शेतकऱ्यांना हेक्टरी 520 रुपये विमा हप्ता भरावा लागेल.

मुग आणि उडीद पिकासाठी विमा संरक्षित रक्कम 20 हजार रुपये आहे. त्यानुसार शेतकऱ्यांना 2 टक्केनं विमा हप्ता भरावा लागेल. मुग आणि उडीद पिकासाठी शेतकऱ्यांना हेक्टरी 400 रुपये विमा हप्ता भरावा लागेल.

विमा हप्त्याची रक्कम कुठे भरायची

शेतकरी त्यांचं खातं असलेल्या बँकेच्या शाखा, प्राथमिक कृषी पतपुरठाव संस्था, पीक विमा पोर्टल आणि आपले सरकार सुविधा केंद्र या ठिकाणी पीक विम्याचा हप्ता भरु शकतात.

इतर बातम्या:

PM Kisan : पीएम किसान सन्मान योजनेसाठी शेतकऱ्यांच्या नावाची निवड कशी होते? वाचा सविस्तर

रासायनिक खतांचा वापर न करता कांदा पिकवला, बाजारपेठेत मिळाला विक्रमी भाव

(Prime Minister Crop Insurance Scheme Registration started farmer can submit insurance premium till 15 july)

Read Full Article

Click on your DTH Provider to Add TV9 MARATHI