फळबाग शेतकऱ्यांसाठी महत्वाची बातमी, फळपिक विमा काढण्याचं कृषी विभागाचं आवाहन, अवघे काही दिवस शिल्लक

फळबाग असलेल्या शेतकाऱ्यांनी तात्काळ फळबाग पिक विमा अंतिम मुदतीच्या आत सादर करावा, असं आवाहन इंदापूरच्या कृषी विभागाकडून करण्यात आले आहे.

फळबाग शेतकऱ्यांसाठी महत्वाची बातमी, फळपिक विमा काढण्याचं कृषी विभागाचं आवाहन, अवघे काही दिवस शिल्लक
प्रातिनिधिक फोटो
Follow us
| Updated on: Jul 08, 2021 | 7:12 PM

पुणे: जिल्ह्यातील शेतकऱ्यांना कृषी विभागाकडून फळबाग शेतकऱ्यांना पिक विमा काढण्याचे आवाहन केलं जात आहे. विविध हवामानाच्या धोक्यामुळे फळपिकांच्या उत्पादनावर मोठ्यप्रमानावर परिणाम होत आहे, परिणामी शेतकरी अडचणीत येत आहे, त्यामुळे शासनाने सर्व गोष्टींचा विचार करून फळबाग पीकविमा राबविन्याचे ठरवले आहे. राज्य सरकारकडून 18 जून रोजी तसा आदेश ही काढण्यात आला आहे. फळबाग असलेल्या शेतकाऱ्यांनी तात्काळ फळबाग पिक विमा अंतिम मुदतीच्या आत सादर करावा, असं आवाहन इंदापूरच्या कृषी विभागाकडून करण्यात आले आहे. (Pune Indapur Agriculture department appeal to horticulture farmers participate in fruit crop insurance scheme)

योजना ऐच्छिक

पुनर्रचित हवामान आधारित फळविक विमा योजना मृग बहार 2021-22 साठी राज्य शासनाच्या शासन निर्णयानुसार विविध जिल्हानिहाय मोसंबी, डाळिंब, संत्रा, चिकू, पेरु, लिंबू व सिताफळ या पिकांकरिता राबली जाते. ही योजना शासनाच्या सुधारीत मार्गदर्शक सुचनानुसार यावर्षीपासुन कर्जदार शेतक-यांना ऐच्छिक करण्यात आली आहे. याबाबत कर्जदार शेतक-यांना योजनेत सहभागी न होण्यासाठी कर्ज घेतलेल्या अधिसुचित पिकांकरीता नोंदणीच्या अंतिम मुदतीच्या सात दिवस आधीपर्यंत संबंधित बँकेस त्या अनुषंगाने विमा हप्ता कपात न करण्याबाबत कळविणे आवश्यक राहील.

कुठे नोंदणी करायची

कर्जदार शेतकरी हे संबंधित बँक शाखा, प्राथमिक कृषि पतपुरवठा संस्था यांचेमार्फत योजनेत सहभाग नोंदवू शकतील. बिगर कर्जदार शेतकरी हे बँक, प्रादेशिक ग्रामीण बँक, विमा कंपनी प्रतिनिधी, विमा मध्यस्थी , आपले सरकार केंद्र अथवा स्वत: योजनेत सहभागी होण्याची अंतिम मुदत व त्यानुषंगाने भरावयाची विमा हप्ता रक्कम खालीलप्रमाणे राहील.

संत्रा, लिंबू, पेरु, मोसंबी व चिकु या पिकांसाठी विमा दावा भरावयाची अंतिम दिनांक 30 जुन 2021 असून डाळिंब पिकासाठी 14 जुलै 2021 तर सिताफळ या पिकासाठी 31 जुलै 2021 या अंतिम दिनांक आहेत. याबाबत अधिक माहितीसाठी या योजनेचा शासन निर्णय हा www.maharashtra.gov.in या संकेतस्थळावर उपलब्ध असल्याचे कृषी विभागाकडून कळवण्यात आलं आहे

इतर बातम्या:

आधुनिक तंत्रज्ञान शेतकऱ्यांच्या बांधापर्यंत पोहोचवण्याचा प्रयत्न, राज्यभर कृषी संजीवनी मोहीम सुरु, दादाजी भुसेंची माहिती

स्ट्रॉबेरी शेतीतून मोठ्या कमाईची हमी, शेतकऱ्यांना एक एकरात 8 लाखांच्या उत्पन्नाची संधी

(Pune Indapur Agriculture department appeal to horticulture farmers participate in fruit crop insurance scheme)

Non Stop LIVE Update
वर्ध्यात पंतप्रधान मोदींचं मराठीतून भाषण अन् सभास्थळी म्हटला अभंग
वर्ध्यात पंतप्रधान मोदींचं मराठीतून भाषण अन् सभास्थळी म्हटला अभंग.
अमोल कोल्हे हे महागद्दार, धोकेसम्राट आणि...; कुणी केली जहरी टीका?
अमोल कोल्हे हे महागद्दार, धोकेसम्राट आणि...; कुणी केली जहरी टीका?.
राज ठाकरे पहिल्यांदाच धनुष्यबाणाला मत देणार, राहुल शेवाळे काय म्हणाले?
राज ठाकरे पहिल्यांदाच धनुष्यबाणाला मत देणार, राहुल शेवाळे काय म्हणाले?.
नटीला नटी म्हणायचं नाही तर काय...राऊत-पाटलांमधील संवाद कॅमेऱ्यात कैद
नटीला नटी म्हणायचं नाही तर काय...राऊत-पाटलांमधील संवाद कॅमेऱ्यात कैद.
दोनशे रूपये घ्या, पण... ठाकरेंच्या सभेसाठी आलेल्या लोकांकडून विनंती
दोनशे रूपये घ्या, पण... ठाकरेंच्या सभेसाठी आलेल्या लोकांकडून विनंती.
ज्या आईने तुम्हाला जन्म... राऊतांच्या त्या टीकेवर राणांची प्रतिक्रिया
ज्या आईने तुम्हाला जन्म... राऊतांच्या त्या टीकेवर राणांची प्रतिक्रिया.
म्हणून योग्य नेत्याला मतदान करा, तृतीयपंथीयांचं मतदरांना आवाहन काय?
म्हणून योग्य नेत्याला मतदान करा, तृतीयपंथीयांचं मतदरांना आवाहन काय?.
गुलाबी मतदान केंद्र कधी पाहिलंय? पिंक पोलिंग बूथची खासियत काय?
गुलाबी मतदान केंद्र कधी पाहिलंय? पिंक पोलिंग बूथची खासियत काय?.
आधी बजावला मतदानाचा हक्क मगच चढला बोहल्यावर, त्या नवदेवाची होतेय चर्चा
आधी बजावला मतदानाचा हक्क मगच चढला बोहल्यावर, त्या नवदेवाची होतेय चर्चा.
लोकशाहीच्या उत्सवाला प्रारंभ,विदर्भात 5 जागांवर पहिल्या टप्प्यात मतदान
लोकशाहीच्या उत्सवाला प्रारंभ,विदर्भात 5 जागांवर पहिल्या टप्प्यात मतदान.