Wheat Crop : तुर्कस्तानने नाकारले मात्र, इतर देशांची भारतीय गव्हाला पसंती, निर्यातीबाबतचा निर्णय काय ?

Wheat Crop : तुर्कस्तानने नाकारले मात्र, इतर देशांची भारतीय गव्हाला पसंती, निर्यातीबाबतचा निर्णय काय ?
गव्हाचे उत्पादन

सध्या देशातून गहू निर्यातीला परवानगी नसली तरी 13 जूनपर्यंत 30 लाख टन गव्हाची निर्यात झाली आहे. आता निर्यात बंदी असली तरी काही देशांनी केलेल्या धान्य पुरवठ्याच्या मागणीचा विचार केला जाणार आहे. शिवाय सीमालगतच्या देशांमध्ये गव्हाच्या निर्यातीला प्राधान्य दिले जाणार आहे. त्याच अनुशंगाने बांग्लादेशात दीड लाख टन गव्हाची निर्यात झाली आहे.

राजेंद्र खराडे

|

Jun 23, 2022 | 4:47 PM

मुंबई : यंदा भारतीय (Wheat Export) गव्हाच्या निर्यातीला घेऊन एक ना अनेक प्रश्न उपस्थित झाले होते. एवढेच नाही तर तुर्कस्तानने भारतातून आयात केलेल्या गव्हाची निर्यात करण्यास सुरवात केली होती. (Wheat Quality) गव्हाच्या दर्जाबाबत प्रश्न उपस्थित करीत हे पाऊल तुर्कस्तानने उचलले होते. मात्र, ज्या गव्हाबाबत तुर्कस्तानने सवाल उपस्थित केला त्याच (Demand for wheat) गव्हाला आता जगभरातून मागणी होत आहे. मात्र, देशभरातील अन्नधान्याच्या वाढत्या किंमती पाहता 13 मे पासून निर्यातीला बंदी घालण्यात आली आहे. अजूनही निर्यातीवर बंदी आहे. मात्र, सध्याच्या मागणीमुळे सरकार हे गहू निर्यातीला परवानगी देणार का हे पहावे लागणार आहे. गतवर्षीही भारतामधूनच विक्रमी गव्हाची निर्यात झाली होती. शिवाय यंदाही 3 कोटी टन गव्हाची निर्यात झालेली आहे. यामध्ये भविष्यात वाढ होईल असेच संकेत आहे.

गव्हाच्या निर्यातीबाबत केंद्र घेणार निर्णय

गही निर्यातीमधून भारताला चांगले उत्पन्न मिळत आहे. गेल्या काही वर्षापासून याची प्रचिती ही आलेली आहे. सध्या गहू निर्यातीला बंदी असली तरी देशातीलच गव्हाला अधिकची मागणी आहे. गव्हाच्या निर्यातीबाबत माहिती देताना अन्न मंत्रालयाचे संयुक्त सचिव पार्थ एस. दास म्हणाले की, अनेक देशांकडून गव्हासाठी विनंत्या प्राप्त झाल्या आहेत.त्यावर विचार करून आम्ही निर्णय घेऊ. मात्र गव्हासाठी विनंती करणाऱ्या देशांचे नाव सहसचिवांनी जाहीर केले नाही. असे असले तरी देशांतर्गत निर्माण झालेल्या परस्थितीमुळे काही काळ निर्यात ही बंदच राहणार आहे.

यंदाही 30 लाख टन गव्हाची निर्यात

सध्या देशातून गहू निर्यातीला परवानगी नसली तरी 13 जूनपर्यंत 30 लाख टन गव्हाची निर्यात झाली आहे. आता निर्यात बंदी असली तरी काही देशांनी केलेल्या धान्य पुरवठ्याच्या मागणीचा विचार केला जाणार आहे. शिवाय सीमालगतच्या देशांमध्ये गव्हाच्या निर्यातीला प्राधान्य दिले जाणार आहे. त्याच अनुशंगाने बांग्लादेशात दीड लाख टन गव्हाची निर्यात झाली आहे. उत्पादन आणि मागणी याचा विचार करुन निर्यातीबाबतचा निर्णय़ लवकरच घेतला जाणार असल्याचे अन्न सचिव सुधांशू पांडे यांनी सांगितले. त्यामुळे तुर्कस्तानने भारतीय गव्हाला नाकारले असले तरी इतर देशातून मागणी कायम आहे.

हे सुद्धा वाचा

भारतामधून कुठे होते अधिकची निर्यात?

गहू निर्यातीमध्ये भारताचे जागतिक पातळीवर वेगळे असे स्थान आहे. असे असले तरी सध्याची स्थिती पाहता केंद्राने कठोर निर्णय घेतला आहे. 13 जूनपासून निर्यात बंद झाली आहे. इंडोनेशियासह अनेक आखाती देशांकडून गव्हासाठी भारताला विनंत्या केल्या जात आहेत. मात्र, अद्याप याबाबत अधिकृत दुजोरा मिळालेला नाही. इंडोनेशिया आणि बांगलादेश भारताकडून सर्वाधिक गहू खरेदी करतात. त्याचबरोबर यूएईच्या गव्हाच्या आयातीत भारताचा वाटा मोठा राहिला आहे. ओमान आणि येमेनसारख्या देशांनीही आपल्या देशांतर्गत गरजा भागवण्यासाठी भारताला गहू निर्यात करण्याची विनंती केली असल्याची चर्चा आहे.

Follow us on

Related Stories

Most Read Stories

Click on your DTH Provider to Add TV9 MARATHI

राज्य चुनें