महिला शेतकऱ्यांना कळाले गटशेतीचे महत्व, राज्य सरकारच्या निर्णयापूर्वीच परिवर्तनाची नांदी

महिला केवळ शेतकऱ्यांच्या बरोबरीने शेतामध्ये कष्टच करीत नाहीत तर आधुनिकतेची कास धरीत अमूलाग्र बदल घडवत आहेत. दोन दिवसांपूर्वीच राज्य सरकारने आगामी वर्ष हे महिला शेतकऱ्यांच्या सक्षमीकरणासाठी असल्याचे स्पष्ट केले आहे. मात्र, याची सुरवात तुळजापूर तालुक्यातील मसला खुर्द गावात यापूर्वीच झालेली आहे.

महिला शेतकऱ्यांना कळाले गटशेतीचे महत्व, राज्य सरकारच्या निर्णयापूर्वीच परिवर्तनाची नांदी
संग्रहीत छायाचित्र
Follow us
| Updated on: Dec 22, 2021 | 5:17 PM

उस्मानाबाद : महिला केवळ शेतकऱ्यांच्या बरोबरीने शेतामध्ये कष्टच करीत नाहीत तर आधुनिकतेची कास धरीत अमूलाग्र बदल घडवत आहेत. दोन दिवसांपूर्वीच राज्य सरकारने आगामी वर्ष हे महिला शेतकऱ्यांच्या सक्षमीकरणासाठी असल्याचे स्पष्ट केले आहे. मात्र, याची सुरवात तुळजापूर तालुक्यातील मसला खुर्द गावात यापूर्वीच झालेली आहे. येथील महिलांना गटशेतीचे महत्व कळाले असून गटाच्या माध्यमातून त्यांनी अॅग्रो प्रोड्युसर कंपनीची स्थापना केली आहे. यामाध्यमातून आता हजारो महिलांच्या हाताला कामही मिळालेले आहे. भाजीपाल्यापासू ते मुख्य पिकांचे उत्पादन ते देखील सेंद्रिय पध्दतीने. भाडेतत्वार घेतलेल्या शेतजमिनीच्या माध्यमातून उत्पादित केलेल्या शेतीमालाची विक्री आता मेट्रो शहरांमध्ये होत आहे हे विशेष.

अशी झाली शेतीची सुरवात

मसला खुर्द गावातील महिलांनी सुरवातीला पुरुष मंडळीकडून भाडे करारावर 20 गुंठे जमिन घेतली होती. नव्या तंत्रज्ञानाचा वापर पण त्याला सेंद्रिय शेतीची सांगड घालून शेतीचे प्रयोग केले आहेत. शेतीसोबतच पशूपालन, कुक्कुटपालन, बीज बॅंक याची उभारणी करुन हा शेतीगट सक्षम झाला आहे. महिलांचा हा उपक्रम पाहून आता पुरुष मंडळीने शेतजमिनही महिलांच्या नावावर केली आहे. शैलाजा नरलवडे यांनी पुढाकार घेऊन महिलांसाठीची पहिला अॅग्रो प्रोड्युसर कंपनी ही मसला खुर्द गावात उभारण्यात आली आहे. गटशेतीच्या माध्यमातून येथील महिलांनी शेती व्यवसयात अमूलाग्र बदल केला आहे.

बीज बॅंकेच्या माध्यमातून बियाणांचा पुरवठा

गेल्या 20 वर्षामध्ये येथील महिलांनी शेतामध्ये एक ना अनेक प्रयोग केले आहेत. सेंद्रिय पध्दतीने भाजीपाल्याचे उत्पादन घेत असताना त्यांनी जुने वाणही संरक्षित केले आहे. आतापर्यंत 40 प्रकारच्या भाज्यांच्या वाणाचे बियाणे तयार केले आहे. शिवाय त्याच्या कीट तयार करण्यात आले असून विक्रीसाठी उपलब्ध करुन देण्यात आल्या आहेत. बियाणांच्या 15 ते 20 ग्रॅमच्या कीट तयार करुन 250 रुपयांमध्ये विक्री केली जात आहे. केवळ उस्मानाबाद जिल्हाच नाही तर संपूर्ण महाराष्ट्रात या बियाणांची विक्री केली जात आहे.

महिलाच आता कारभारी

जेव्हा महिलांनी गटशेतीला सुरवात केली तेव्हा त्यांना निर्णय घेण्याचा अधिकार नव्हता. मात्र, महिला शेतकऱ्यांचे वेगवेगळे उपक्रम पाहून आता पुरुषांनी महिलांच्या नावावर शेतीही केली आहे. हा मोठा बदल असून 80 टक्के शेतीकामे ह्या महिलाच करीत आहेत. आतापर्यंत निर्णय घेण्याचे अधिकार नव्हते पण गटशेतीची उलाढाल पाहून महिलाच कारभारी झाल्या आहेत. त्यांच्यामध्ये निर्णयक्षमता असून आता गटातील महिला ह्या उद्योजिका झाल्या आहेत.

संबंधित बातम्या :

पिवळ्या हळदीला करपा रोगाचा डाग, उत्पादनात घट, काय दर आहेत हिंगोलीच्या बाजारपेठेत?

सोयाबीनचे दर स्थिर, आवकमध्ये मात्र चढ-उतार, शेतकऱ्यांची होतेय द्वीधा मनस्थिती

दुष्काळात तेरावा : ‘ओमिक्रॉन’चा परिणाम फळबाग लागवडीवरही, शेतकरी साधणार का मंदीत संधी?

Non Stop LIVE Update
फेअरप्ले ॲप प्रकरणी तमन्ना भाटियाच्या अडचणीत वाढ
फेअरप्ले ॲप प्रकरणी तमन्ना भाटियाच्या अडचणीत वाढ.
ठाकरेंनी 18 जागा जिंकून दाखवाव्यात, भाजप नेत्याचं ठाकरेंना आव्हान
ठाकरेंनी 18 जागा जिंकून दाखवाव्यात, भाजप नेत्याचं ठाकरेंना आव्हान.
मोदींच्या काळात महिलांना मंगळसूत्र विकावी लागली, राऊतांची मोदींवर टीका
मोदींच्या काळात महिलांना मंगळसूत्र विकावी लागली, राऊतांची मोदींवर टीका.
शरद पवार गटाच्या जाहीरनाम्यातील दोन प्रमुख मुद्दे, वाचा सविस्तर
शरद पवार गटाच्या जाहीरनाम्यातील दोन प्रमुख मुद्दे, वाचा सविस्तर.
शरद पवार यांच्या 'लाव रे तो व्हिडीओ'वर देवेंद्र फडणवीस यांचा पलटवार
शरद पवार यांच्या 'लाव रे तो व्हिडीओ'वर देवेंद्र फडणवीस यांचा पलटवार.
26 पक्षांची खिचडी, खिचडीचे लोक त्यांना नेता मानत नाहीत,फडणवीसांची टीका
26 पक्षांची खिचडी, खिचडीचे लोक त्यांना नेता मानत नाहीत,फडणवीसांची टीका.
बायकोची कामं ऐकावीच लागतील, नाहीतर... अजित दादांची फटकेबाजी
बायकोची कामं ऐकावीच लागतील, नाहीतर... अजित दादांची फटकेबाजी.
भाषण सुरू अन् नितीन गडकरी स्टेजवरच कोसळले, यवतमाळच्या पुसदमधील घटना
भाषण सुरू अन् नितीन गडकरी स्टेजवरच कोसळले, यवतमाळच्या पुसदमधील घटना.
EVM-VVPAT च्या याचिकेवर सुप्रीम कोर्टात नेमकं काय घडल? काय दिला निकाल?
EVM-VVPAT च्या याचिकेवर सुप्रीम कोर्टात नेमकं काय घडल? काय दिला निकाल?.
त्यांच्या सुरक्षेत रणगाडे...पार्थ पवारांच्या सुरक्षेवरून ठाकरेंची टीका
त्यांच्या सुरक्षेत रणगाडे...पार्थ पवारांच्या सुरक्षेवरून ठाकरेंची टीका.