दुष्काळात तेरावा : ‘ओमिक्रॉन’चा परिणाम फळबाग लागवडीवरही, शेतकरी साधणार का मंदीत संधी?

आगोदरच केळीचे दर घसरल्याने शेतकऱ्यांमध्ये केळीचे उत्पादन घ्यावे की नाही अशी परस्थिती असतानाच आता वाढत्या ‘ओमिक्रॉन’च्या प्रादुर्भावामुळे केळी नकोच अशी स्थिती निर्माण झाली आहे. मात्र, भविष्यात केळीची मोठी टंचाई निर्माण होणार असून दरातही वाढ होणार आहे. पण सध्याच्या प्रतिकूल परस्थितीमध्ये शेतकरी केळी लागवडीचे धाडस करणार का हा प्रश्न निर्माण आहे.

दुष्काळात तेरावा : ‘ओमिक्रॉन’चा परिणाम फळबाग लागवडीवरही, शेतकरी साधणार का मंदीत संधी?
संग्रहीत छायाचित्र
Follow us
| Updated on: Dec 22, 2021 | 3:02 PM

कोल्हापूर : यंदा नैसर्गिक आपत्ती कमी होती की, काय म्हणून आता ‘ओमिक्रॉन’चा परिणाम शेती व्यवसयावर होऊ लागला आहे. आगोदरच केळीचे दर घसरल्याने शेतकऱ्यांमध्ये केळीचे उत्पादन घ्यावे की नाही अशी परस्थिती असतानाच आता वाढत्या ‘ओमिक्रॉन’च्या प्रादुर्भावामुळे केळी नकोच अशी स्थिती निर्माण झाली आहे. मात्र, भविष्यात केळीची मोठी टंचाई निर्माण होणार असून दरातही वाढ होणार आहे. (Farmer) पण सध्याच्या प्रतिकूल परस्थितीमध्ये शेतकरी ( Banana cultivation,) केळी लागवडीचे धाडस करणार का हा प्रश्न निर्माण आहे. सध्या केवळ 3 हजार रुपये टन असा दर सुरु आहे. त्यामुळे अधिकचा खर्च करुन भविष्यातील नुकसान टाळण्यासाठी शेतकरी थेट पीकपध्दतीमध्येच बदल करीत आहेत.

केळी विक्रीनंतर पैसे द्या पण रोपे घेऊन जा

केळीच्या दरातील अस्थिरता आणि वातावरणातील बदल यामुळे केळी लागवड करायची की नाही हा प्रश्न शेतकऱ्यांच्या मनात कायम आहे. या प्रतिकूल परस्थितीमुळे केळी रोपांची मागणीच नाही. त्यामुळे मातब्बर लॅबचालक ही धास्तावले असून, लाखो रुपयाची केळी रोपे फेकून द्यावी लागत आहेत. अनेक लॅब चालकांनी पैसे केळी विक्री नंतर द्या, पण रोपे घेऊन जावा, अशी विनंती करूनही शेतकरी लागवडीस तयार नाहीत. हंगामाच्या सुरवातीपासून केळीला अपेक्षित दर नाही. त्यामुळे मराठवाड्यात देखील अनेकांनी बाग मोडली आहे. यातच आता ओमिक्रॉनचा वाढता प्रादुर्भाव यामुळे शेतकऱ्यांच्या समस्यांमध्ये वाढ झाली आहे.

महापुराचा परिणाम अद्यापही

जुलै महिन्याच्या दरम्यान पश्चिम महाराष्ट्रातील केळी पट्ट्यात महापुरामुळे बागांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले होते. यामध्ये केळीच्या पूर्णत: उध्वस्त झाल्या होत्या. त्यानंतर या भागातील शेतकऱ्यांनी खोडवा उत्पादनही घेतले नाही. केळीचे व्यवस्थापन आणि बाजारातील दर याचा ताळमेळच लागत नसल्याने केळी जोपासण्यापेक्षा काढणीवरच शेतकऱ्यांनी भर दिला होता. केळीची लागवड ही वर्षभर केव्हाही होत असली तरी मुख्य हंगाम हा जून ते ऑगस्टचा असतो. या दरम्यानच्या काळात लागवडीला शेतकऱ्यांनी प्रतिसादच दिलेला नाही. त्यामुळे क्षेत्र घटणार आहे तर रोपांचे मोठ्या प्रमाणावर नुकसान होणार आहे.

शेतकऱ्यांचे नियोजन मात्र, अवस्था पाहून निर्णय लांबणीवर

पश्चिम महाराष्ट्रातील केळीच्या पट्ट्यात नविन क्षेत्रावर केळी लागवडीचे नियोजन शेतकऱ्यांनी केले होते. मात्र, बाजारपेठेतील अवस्था आणि ओमिक्रॉनचा वाढता प्रादुर्भाव यामुळे शेतकऱ्यांनी आपले नियोजन बदलले आहे. लाखोंचा खर्च करुनही केळीची लागवड केली तरी अपेक्षित दर आणि ओमिक्रॉनमुळे बाजारातील दरात सुधारणा होईल का मोठा प्रश्न आहे. त्यामुळे शेतकरी इतर उत्पादनाकडे वळत आहेत पण केळी लागवडीचे धाडस करीत नाहीत. रोपांची विक्री होत नाही म्हणून राज्यातील 35 पैकी 7 लॅब ह्या बंद पडलेल्या आहेत.

संबंधित बातम्या :

Marathwada | दरात उच्चांक मोडणाऱ्या मोसंबीची यंदा मराठवाड्यात काय अवस्था ? शेतकरी म्हणतात…

Assembly Session | राज्यातील 41 लाख शेतकऱ्यांनी घेतला पीकविमा योजनेचा लाभ, अन् मिळाला परतावाही

Pik Vima : पीकविमा मिळाला नाही, मग आता गावातच तोडगा ..!

Non Stop LIVE Update
लोकसभा निवडणुकीत लातूरमध्ये कोणाला लागणार ठसका? पाहा छोटा पुढारी
लोकसभा निवडणुकीत लातूरमध्ये कोणाला लागणार ठसका? पाहा छोटा पुढारी.
फेअरप्ले ॲप प्रकरणी तमन्ना भाटियाच्या अडचणीत वाढ
फेअरप्ले ॲप प्रकरणी तमन्ना भाटियाच्या अडचणीत वाढ.
ठाकरेंनी 18 जागा जिंकून दाखवाव्यात, भाजप नेत्याचं ठाकरेंना आव्हान
ठाकरेंनी 18 जागा जिंकून दाखवाव्यात, भाजप नेत्याचं ठाकरेंना आव्हान.
मोदींच्या काळात महिलांना मंगळसूत्र विकावी लागली, राऊतांची मोदींवर टीका
मोदींच्या काळात महिलांना मंगळसूत्र विकावी लागली, राऊतांची मोदींवर टीका.
शरद पवार गटाच्या जाहीरनाम्यातील दोन प्रमुख मुद्दे, वाचा सविस्तर
शरद पवार गटाच्या जाहीरनाम्यातील दोन प्रमुख मुद्दे, वाचा सविस्तर.
शरद पवार यांच्या 'लाव रे तो व्हिडीओ'वर देवेंद्र फडणवीस यांचा पलटवार
शरद पवार यांच्या 'लाव रे तो व्हिडीओ'वर देवेंद्र फडणवीस यांचा पलटवार.
26 पक्षांची खिचडी, खिचडीचे लोक त्यांना नेता मानत नाहीत,फडणवीसांची टीका
26 पक्षांची खिचडी, खिचडीचे लोक त्यांना नेता मानत नाहीत,फडणवीसांची टीका.
बायकोची कामं ऐकावीच लागतील, नाहीतर... अजित दादांची फटकेबाजी
बायकोची कामं ऐकावीच लागतील, नाहीतर... अजित दादांची फटकेबाजी.
भाषण सुरू अन् नितीन गडकरी स्टेजवरच कोसळले, यवतमाळच्या पुसदमधील घटना
भाषण सुरू अन् नितीन गडकरी स्टेजवरच कोसळले, यवतमाळच्या पुसदमधील घटना.
EVM-VVPAT च्या याचिकेवर सुप्रीम कोर्टात नेमकं काय घडल? काय दिला निकाल?
EVM-VVPAT च्या याचिकेवर सुप्रीम कोर्टात नेमकं काय घडल? काय दिला निकाल?.