Prices of Pulses : डाळींचे दर शंभरीपार, उत्पादनात घट त्यात महागाईचा तडका

वाढत्या महागाईची झळ आता रोजच्या जेवणाच्या ताटापर्यंत येऊन ठेपली आहे. जीवनाश्यक वस्तूंच्या दरातही दिवसेंदिवस वाढ होत आहे. याकरिता केवळ उत्पादनात घट हाच मुद्दा कारणीभूत नाही तर इंधन दरवाढीमुळे वाहतूकीचा खर्च वाढला आहे. डाळींनाही महागाईचा तडका बसला असून मसूरडाळ वगळता सर्वच डाळीचे दरांनी शंभरी पार केली आहे. निसर्गाच्या लहरीपणामुळे उडीद आणि तूर डाळीच्या उत्पादनात घट झाली होती.

Prices of Pulses : डाळींचे दर शंभरीपार, उत्पादनात घट त्यात महागाईचा तडका
उत्पादनात घट झाल्याने डाळींच्या दरात वाढ झाली आहे.
Follow us
| Updated on: Apr 12, 2022 | 1:36 PM

मुंबई : वाढत्या (Inflation) महागाईची झळ आता रोजच्या जेवणाच्या ताटापर्यंत येऊन ठेपली आहे. जीवनाश्यक वस्तूंच्या दरातही दिवसेंदिवस वाढ होत आहे. याकरिता केवळ (Production reduction) उत्पादनात घट हाच मुद्दा कारणीभूत नाही तर (Fuel price hike) इंधन दरवाढीमुळे वाहतूकीचा खर्च वाढला आहे. डाळींनाही महागाईचा तडका बसला असून मसूरडाळ वगळता सर्वच डाळीचे दरांनी शंभरी पार केली आहे. निसर्गाच्या लहरीपणामुळे उडीद आणि तूर डाळीच्या उत्पादनात घट झाली होती. यातच आता इतर बाबींच्या वाढत्या किंमतीची परिणामही यावर होऊ लागला आहे. त्यामुळे सर्वसामान्यांना वर्षभराच्या साठवणूकीचा नाही तर रोजची गरज भागवायची कशी असा सवाल आहे?

डाळींच्या उत्पादनामध्येही घट

खरीप हंगामातील सर्वच पिकांवर निसर्गाच्या लहरीपणाचा परिणाम झाला होता. पीके जोमात असतानाच अवकाळी पावसाने हजेरी लावली होती तर महाराष्ट्रासह मध्यप्रदेशामध्येही अशीच परस्थिती असल्याने डाळींच्या उत्पादनात घट झाली आहे. सध्या बाजारपेठेत डाळींची आवक ही मर्यादित होत आहे. शिवाय अशीच परस्थिती राहिली तर भविष्यात अणखी दर वाढतील असा अंदाज आहे.

मुंबई एपीएमसी मध्ये कसे बदलले दराचे चित्र?

गेल्या दोन महिन्यांमध्येच डाळींच्या दराच झपाट्याने वाढ होत आहे. दोन महिन्यापूर्वी मुंबई बाजार समितीमध्ये 75 ते 95 रुपये किलो असा तूर डाळीचा दर होता. आता हेच दर 85 ते 105 रुपये किलोवर येऊन ठेपले आहेत. तर किरकोळ बाजारात तूरडाळ 110, उडीदडाळ 110 तर मूगडाळ 110 ते 120 च्या दरम्यान आहे. हे सर्व असाताना मसूरडाळीचे दर मात्र नियंत्रणात आहेत. मसूरडाळीचे दर हे 85 ते 95 च्या दरम्यान आहेत. तर हरभऱ्याचे उत्पादन वाढल्याने दर कमी झाले आहेत. किरकोळ मार्केटमध्ये मध्यंतरी चनाडाळ 60 ते 65 रुपये किलोने विकली जात होती तर आता 58 ते 63 रुपये असा दर आहे.

असे आहेत होलसेल आणि किरकोळ मार्केटचे चित्र

सध्या होलसेल मार्केटमध्ये तूरडाळ 85 ते 105 रुपये किलोने विकली जात आहे तर किरकोळ बाजारात 100 ते 110, मूगडाळ होलसेलमध्ये 87 ते 105 रुपयांपर्यंत तर किरकोळमध्ये 100 ते 120 तर उडीदडाळ होलसेलमध्ये 80 ते 100 व किरकोळमध्ये 100 ते 110 रुपये किलो विकली जात आहे. शिवाय भविष्यात अणखी दर वाढतील असे व्यापाऱ्यांचे म्हणणे आहे.

संबंधित बातम्या :

Sugarcane Sludge : ऊस फडातच, गाळप बंद, सांगलीत साखर आयुक्तांच्या आदेशालाही केराची टोपली

Photo Gallery : अवकाळीने द्राक्ष उत्पादनात घट, वादळी वाऱ्याने तर फळबागाच हिरावल्या

Weather Report : अवकाळीचा मुक्काम वाढणार, रब्बी पीके बचावली मग धोका कशाला?

Non Stop LIVE Update
शिवसेनेत गोविंदाची एन्ट्री अन् दादांचं 15 दिवसांपूर्वी वक्तव्य चर्चेत
शिवसेनेत गोविंदाची एन्ट्री अन् दादांचं 15 दिवसांपूर्वी वक्तव्य चर्चेत.
तर भाजपात पहिली उडी मारणारे सुनील तटकरे असतील रोहित पवार यांची टीका
तर भाजपात पहिली उडी मारणारे सुनील तटकरे असतील रोहित पवार यांची टीका.
शिवसेनेची पहिली यादी जाहीर, सात विद्यमान खासदारांना पुन्हा संधी
शिवसेनेची पहिली यादी जाहीर, सात विद्यमान खासदारांना पुन्हा संधी.
एका जागेसाठी कॉंग्रेसला देशाचे पंतप्रधान पद घालवायचं का ? - संजय राऊत
एका जागेसाठी कॉंग्रेसला देशाचे पंतप्रधान पद घालवायचं का ? - संजय राऊत.
आनंद दिघेंचा शिष्य यंदा मारणार हॅट्रीक, केदार दिघे यांचा विश्वास
आनंद दिघेंचा शिष्य यंदा मारणार हॅट्रीक, केदार दिघे यांचा विश्वास.
ओवेसी आणि इम्तियाझ यांनी चष्म्याचे नंबर बदलावे -केंद्रीय मंत्री भागवत
ओवेसी आणि इम्तियाझ यांनी चष्म्याचे नंबर बदलावे -केंद्रीय मंत्री भागवत.
लवकरच बरा होऊन... दिलीप वळसे पाटील यांचं दुखापतीनंतर पहिलं टि्वट काय?
लवकरच बरा होऊन... दिलीप वळसे पाटील यांचं दुखापतीनंतर पहिलं टि्वट काय?.
शिवसेनेत पक्ष प्रवेश करताच गोविंदाला हवी 'ही' जबाबदारी, शिंदे देणार?
शिवसेनेत पक्ष प्रवेश करताच गोविंदाला हवी 'ही' जबाबदारी, शिंदे देणार?.
जलील बोलका पोपट आणि चंद्रकांत खैरे नाकारलेला उमेदवार, कुणी केली टीका?
जलील बोलका पोपट आणि चंद्रकांत खैरे नाकारलेला उमेदवार, कुणी केली टीका?.
गोविंदाचा शिंदेंच्या शिवसेनेत प्रवेश, मुख्यमंत्र्यांच्या उपस्थित घोषणा
गोविंदाचा शिंदेंच्या शिवसेनेत प्रवेश, मुख्यमंत्र्यांच्या उपस्थित घोषणा.