Weather Report : अवकाळीचा मुक्काम वाढणार, रब्बी पीके बचावली मग धोका कशाला?

कोकण, उत्तर महाराष्ट्र आणि पश्चिम महाराष्ट्रात अवकाळी पाऊस बरसणार असा अंदाज सुरवातीला हवामान विभागाने वर्तवला होता. त्यानुसार आता झालेल्या पावसामुळे फळबागांचे मोठे नुकसान झाले आहे. मात्र, आता अवकाळीचा फटका विदर्भासह मराठवाड्यालाही बसणार आहे. विदर्भ, मराठवाडा ते कर्नाटक या भागापर्यंत हवेचा कमी दाबाचा पट्टा निर्माण झाला आहे. त्यामुळे कोकण किनारपट्टीसह पश्चिम महाराष्ट्रामध्ये आगामी दोन दिवस ढगाळ वातावरणासह हलका ते मध्यम स्वरुपाचा पाऊस होणार असल्याचा अंदाज आहे.

Weather Report : अवकाळीचा मुक्काम वाढणार, रब्बी पीके बचावली मग धोका कशाला?
अवकाळी पावसामुळे मराठवाड्यातील हंगामी पिकांचे नुकसान झाले आहे.
Follow us
| Updated on: Apr 12, 2022 | 12:51 PM

रत्नागिरी : कोकण, उत्तर महाराष्ट्र आणि पश्चिम महाराष्ट्रात (Untimely Rain) अवकाळी पाऊस बरसणार असा अंदाज सुरवातीला (Meteorological Department,) हवामान विभागाने वर्तवला होता. त्यानुसार आता झालेल्या पावसामुळे (Orchard) फळबागांचे मोठे नुकसान झाले आहे. मात्र, आता अवकाळीचा फटका विदर्भासह मराठवाड्यालाही बसणार आहे. विदर्भ, मराठवाडा ते कर्नाटक या भागापर्यंत हवेचा कमी दाबाचा पट्टा निर्माण झाला आहे. त्यामुळे कोकण किनारपट्टीसह पश्चिम महाराष्ट्रामध्ये आगामी दोन दिवस ढगाळ वातावरणासह हलका ते मध्यम स्वरुपाचा पाऊस होणार असल्याचा अंदाज आहे. भर उन्हाळ्यामध्ये पावसाळ्याची अनुभती येत आहे. मराठवाड्यासह पश्चिम महाराष्ट्रातील रब्बी हंगामातील पिकांची काढणी झाल्यावर पावसाने हजेरी लावली आहे. त्यामुळे नुकसान टळले असले तरी कोकणात आंबा फळबागांचे नुकसान हे सुरुच आहे.

कोकणाच उर्वरीत फळबागाही धोक्यात

अवकाळीची अवकृपा ही कोकण आणि उत्तर महाराष्ट्रामध्येच अधिक झाली आहे. निसर्गाच्या लहरीपणामुळे केवळ 40 टक्के आंबा फळपिक शेतकऱ्यांच्या पदरी पडलेले आहे. आता तिसऱ्या हंगामातील आंबा झाडावर आहे. 15 एप्रिलपासून याची तोड होणार असे सांगितले जात होते पण अवकाळी पावसामुळे पुन्हा फळगळती सुरु झाली आहे. फळगळतीमुळे उत्पादनावर तर परिणाम झालाच आहे पडलेला आंबाही डागाळत आहे. त्यामुळे आंबा उत्पादक शेतकऱ्यांना ना अपेक्षित उत्पादन पदरी पडलेले आहे ना दर. यंदाचा हंगाम नुकसानीचाच ठरत आहे.

कोकणासह मध्य महाराष्ट्रात धोका कायम

मध्य महाराष्ट्रासह कोकणातील काही भागात पावसासाठी अनुकूल वातावरण निर्माण झाले आहे. त्यामुळे अणखी दोन दिवस मध्य महाराष्ट्र आणि कोकणामध्ये तुरळक ठिकाणी मध्यम स्वरुपाचा पाऊस बरसणार आहे. 13 एप्रिलपर्यंत अशीच स्थिती राहणार आहे. तर 14 एप्रिलपासून हवामान कोरडे आणि आकाश हे निरभ्र राहणार असल्याचा अंदाज व्यक्त करण्यात आला आहे. रत्नागिरीमध्ये ढगाळ वातावरण निर्माण झाल्याने तापमानात काही अंशी घट झाली आहे.

मराठवाड्यातही ढगाळ वातावरण

मराठवाड्यातही अवकाळी पावसाने हजेरी लावलेली आहे. सुरवातीला औरंगाबादसह जिल्ह्यात तर आता उर्वरित भागात पावसाने हजेरी लावलेली आहे. सोमवारी उस्मानाबाद, लातूर, परभणी जिल्ह्यात अवकाळीची अवकृपा झाली तर अद्यापही ढगाळ वातावरण कायम आहे. मराठवाड्यात जरा उशिराने पावसाला सुरवात झाल्याने रब्बी हंगामातील पिकांना जीवदान मिळाले आहे. सध्या ज्वारी, गहू, हरभरा या मुख्य पिकांची काढणी कामे अंतिम टप्प्यात आहेत. मात्र, कोकणासह उत्तर महाराष्ट्रातील फळपिकांना अवकाळीचा सर्वाधिक फटका बसला आहे.

संबंधित बातम्या :

Sugarcane Sludge : ऊस फडातच, गाळप बंद, सांगलीत साखर आयुक्तांच्या आदेशालाही केराची टोपली

Nanded : नांदेडमध्ये जनावरांचे सहा गोठे आगीच्या भक्ष्यस्थानी, शेतकऱ्यांच्या काळजाचं पाणी-पाणी, आता रोजीरोटीचा प्रश्न

Nanded : पीक विम्याचा प्रश्न चिघळला, कृषिमंत्र्यांचे भाकीत अखेर खरे ठरले, नांदेडमध्ये असे काय घडले?

Non Stop LIVE Update
26 पक्षांची खिचडी, खिचडीचे लोक त्यांना नेता मानत नाहीत,फडणवीसांची टीका
26 पक्षांची खिचडी, खिचडीचे लोक त्यांना नेता मानत नाहीत,फडणवीसांची टीका.
बायकोची कामं ऐकावीच लागतील, नाहीतर... अजित दादांची फटकेबाजी
बायकोची कामं ऐकावीच लागतील, नाहीतर... अजित दादांची फटकेबाजी.
भाषण सुरू अन् नितीन गडकरी स्टेजवरच कोसळले, यवतमाळच्या पुसदमधील घटना
भाषण सुरू अन् नितीन गडकरी स्टेजवरच कोसळले, यवतमाळच्या पुसदमधील घटना.
EVM-VVPAT च्या याचिकेवर सुप्रीम कोर्टात नेमकं काय घडल? काय दिला निकाल?
EVM-VVPAT च्या याचिकेवर सुप्रीम कोर्टात नेमकं काय घडल? काय दिला निकाल?.
त्यांच्या सुरक्षेत रणगाडे...पार्थ पवारांच्या सुरक्षेवरून ठाकरेंची टीका
त्यांच्या सुरक्षेत रणगाडे...पार्थ पवारांच्या सुरक्षेवरून ठाकरेंची टीका.
निवडणुकीत 'जय श्रीराम' घोषणाबाजीचा फायदा होणार? राणांनी दिलं थेट उत्तर
निवडणुकीत 'जय श्रीराम' घोषणाबाजीचा फायदा होणार? राणांनी दिलं थेट उत्तर.
भारताचं संविधान बदलणार? 'भाजप पुन्हा सत्तेत आल्यास...', ठाकरेंची टीका
भारताचं संविधान बदलणार? 'भाजप पुन्हा सत्तेत आल्यास...', ठाकरेंची टीका.
बच्चू कडू पब्लिसिटी स्टंट करणारा..., रवी राणांचा हल्लाबोल काय?
बच्चू कडू पब्लिसिटी स्टंट करणारा..., रवी राणांचा हल्लाबोल काय?.
'केसरकरांच्या कुंडलित राहू बसलाय, त्यासाठी यज्ञ घाला',कुणाची खोचक टीका
'केसरकरांच्या कुंडलित राहू बसलाय, त्यासाठी यज्ञ घाला',कुणाची खोचक टीका.
'उद्धव ठाकरेंचं संतुलन बिघडलंय...', एकनाथ शिंदे यांची खोचक टीका
'उद्धव ठाकरेंचं संतुलन बिघडलंय...', एकनाथ शिंदे यांची खोचक टीका.