AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

वाशीम जिल्ह्यातील करडई पीकाचे लागवड क्षेत्र वाढले, करडई पीकाचा आरोग्यासाठी काय आहे फायदा ?

करडईत पोषकद्रव्ये अधिक असल्याचे लक्षात आल्यानंतर अनेक शेतक-यांनी त्यांच्या शेतात करडई पिकाची लागवड केली आहे. शिवाय कमी खर्चात हे पीक येत असल्याने सध्या दरही चांगला मिळत आहे.

वाशीम जिल्ह्यातील करडई पीकाचे लागवड क्षेत्र वाढले, करडई पीकाचा आरोग्यासाठी काय आहे फायदा ?
करडई पीकाची लागवड
| Edited By: | Updated on: Feb 25, 2022 | 12:39 PM
Share

वाशिम – कोरोनाच्या (corona) प्रभावानंतर आरोग्यासाठी पोषक असलेल्या खाद्योत्पादनाची मागणी वाढली आहे. साधारणतः २० वर्षापूर्वी करडई या पिकाचे उत्पादन वाशीम (washim) जिल्ह्यात मोठ्या प्रमाणात घेतले जाई मात्र दरम्यानच्या काळात सोयाबिनच्या वाढत्या पेऱ्यानंतर करडई पिक जिल्ह्यातुन नामशेष होण्याच्या मार्गावर होते. मात्र कोरोनाच्या प्रादुर्भावानंतर नागरिकांमध्ये आरोग्यविषयक जागृती निर्माण झाली आहे. त्यामुळे आरोग्यासाठी पोषक असणाऱ्या करडईच्या तेलाची वाढती मागणी लक्षात घेता रब्बी हंगामात करडईच्या उत्पादनाकडे वाशीम जिल्ह्यातील शेतकऱ्यांचा (farmer) कल वाढला आहे. कोरोनाच्या काळात अनेकांनी नोकरी सोडून शेतीकडे वळले असल्याचे आपण पाहिले कारण कोरोनाच्या काळात अनेकांच्या नोक-या गेल्याने पर्याय नव्हता. अनेकांना नोकरी गेल्यानंतर शेतीने त्यांच्या संसाराला हातभार लावला. प्रत्येकाला आरोग्याची काळजी आहे, त्यामुळे आपल्याला शेतीमधून पोषक खायला मिळणार असल्याने अनेकांनी आपल्या शेतीमध्ये करडई पिकाचं उत्पन्न घेतलं आहे.

रब्बी हंगामात ७२० हेक्टर क्षेत्र करडई लागवडीखाली

वाशीम जिल्ह्यात यावर्षी रब्बी हंगामात ७२० हेक्टर क्षेत्र करडई लागवडीखाली आले असुन महाराष्ट्र शासनाच्या महाज्योती अभियानाअंतर्गत करडई लागवडीसाठी जिल्हयातील ६०५ शेतकऱ्यांची प्रोत्साहन अनुदानासाठी नोंद झाली आहे. करडई हे पीक नामशेष होण्याच्या मार्गावर असल्याने कृषी विद्यापीठांनीही करडई पिकाचे क्षेत्र वाढविण्यावर भर देणे सुरू केले. विदर्भातील काही जिल्ह्यांतील शेतकऱ्यांनी करडई पेरणीकडे पाठ फिरविली मात्र आहारातील पोषक घटकांची उपयुक्तता लक्षात घेता वाशीम जिल्हयातील शेतकऱ्यांनी पुन्हा एकदा कमी खर्चात येणाऱ्या करडई पीकाची निवड केलीय. वाशिम जिल्हयात करडई पिकाचं उत्पन्न पुढच्या काळात आपल्याला वाशिम जिल्ह्यात अधिक दिसेल असं चित्र आहे. आधुनिक शेतीकडे वळलेला शेतकरी पुन्हा एकदा पारंपारीक शेती करीत असल्याने वाशिममध्ये आंनंदाच वातावरण आहे.

करडईत पोषकद्रव्ये अधिक

करडईत पोषकद्रव्ये अधिक असल्याचे लक्षात आल्यानंतर अनेक शेतक-यांनी त्यांच्या शेतात करडई पिकाची लागवड केली आहे. शिवाय कमी खर्चात हे पीक येत असल्याने सध्या दरही चांगला मिळत आहे. विदर्भातील अन्य जिल्ह्यात करडई तेलबिया पिकाचे क्षेत्र कमी होत असताना यंदा वाशीम जिल्ह्यात लागवड क्षेत्र वाढल्याने आगामी काळात रब्बी हंगामात करडई पीकांच्या रंगीबेरंगी फुलांनी शेतशिवार बहरलेला दिसणार आहे. कोरोनाच्या काळात अनेकांनी आरोग्याची काळजी घेतली. त्याचबरोबर आरोग्यासाठी कोणता घटक गरजेचा आहे हेही अनेकांना समजल्याने अनेकांनी करडईची लागवड केली आहे.

Yashwant Jadhav: कोण आहेत शिवसेनेचे यशवंत जाधव, जे आयटीच्या रडारवर आलेले आहेत?

प्रभाग रचनेविरोधात उच्च न्यायालयात याचिका; नाशिक महापालिकेला कोर्टाची नोटीस

IND vs SL: श्रीलंकेविरुद्ध इशान किशन चांगला खेळला, पण… सुनील गावस्करांनी दाखवून दिला मोठा फरक

फडणवीसांचा दरिंदा, जल्लाद अन् गजनी उल्लेख, काँग्रेस नेता पुन्हा बरळला
फडणवीसांचा दरिंदा, जल्लाद अन् गजनी उल्लेख, काँग्रेस नेता पुन्हा बरळला.
इंदू मिल स्मारकाबाबत CM फडणवीसांची मोठी घोषणा, थेट सांगितली डेडलाईन
इंदू मिल स्मारकाबाबत CM फडणवीसांची मोठी घोषणा, थेट सांगितली डेडलाईन.
तपोवन वृक्षतोडीविरोधात मनसे नाशिककरांच्या सोबतीला, चित्रपट सेना आक्रमक
तपोवन वृक्षतोडीविरोधात मनसे नाशिककरांच्या सोबतीला, चित्रपट सेना आक्रमक.
फडणवीस सरकारच 1 वर्ष, मुख्यमंत्र्यांना किती मार्क? काय सांगतो सर्व्हे?
फडणवीस सरकारच 1 वर्ष, मुख्यमंत्र्यांना किती मार्क? काय सांगतो सर्व्हे?.
फोडाफोडीन नाराजी, वाक् युद्धानंतर आज शिंदे-रवींद्र चव्हाण एकाच मंचावर?
फोडाफोडीन नाराजी, वाक् युद्धानंतर आज शिंदे-रवींद्र चव्हाण एकाच मंचावर?.
फडणवीसांच्या इशाऱ्याने इतर पक्ष चालतात, कुणाच्या वक्तव्याची होते चर्चा
फडणवीसांच्या इशाऱ्याने इतर पक्ष चालतात, कुणाच्या वक्तव्याची होते चर्चा.
CM सह शिंदे दादांची महत्त्वाची बैठक; पक्षांतर्गत प्रवेशबंदीवर तोडगा?
CM सह शिंदे दादांची महत्त्वाची बैठक; पक्षांतर्गत प्रवेशबंदीवर तोडगा?.
इंडिगोच्या विस्कळीत सेवेविरोधात प्रवाशांना मनस्ताप, थेट कोर्टात याचिका
इंडिगोच्या विस्कळीत सेवेविरोधात प्रवाशांना मनस्ताप, थेट कोर्टात याचिका.
रूपाली ठोंबरेंकडून बाळासाहेब अन् पवारांसोबत फोटो शेअर, चर्चांना उधाण
रूपाली ठोंबरेंकडून बाळासाहेब अन् पवारांसोबत फोटो शेअर, चर्चांना उधाण.
मुंबईत भाजपच्या महापौरामुळं कॉलर टाईट होणार! लोढांचं मोठं वक्तव्य काय?
मुंबईत भाजपच्या महापौरामुळं कॉलर टाईट होणार! लोढांचं मोठं वक्तव्य काय?.