AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

साखर कारखाने विक्री, अनियमितता आणि अण्णा हजारेंची तक्रार, विधानसभेत विरोधकांनी सत्ताधाऱ्यांना फैलावर घेतलं, ते प्रकरण नेमकं काय?

राज्यातील सहकारी साखर कारखान्यांची कवडीमोल दराने विक्री करुन राजकीय नेत्यांनी सहकार क्षेत्राला उतरती कळा लावलेली आहे. राज्यातील 15 लाख शेतकऱ्यांचे 49 साखर कारखाने हे कायद्याचा भंग करुन विक्रीच्या नावाखाली राजकीय नेत्यांनी ताब्यात घेतले आहेत. एवढेच नाही तर यामध्ये 25 हजार कोटींचा घोटाळा झाला आहे. त्यामुळे सहकार चळवळीला धोका निर्माण झाला असू याची चौकशी करण्याची मागणी सामाजिक कार्यकर्ते अण्णा हजारे यांनी केंद्रीय सहकार मंत्री अमित शहा आणि मुख्यमंत्री उध्दव ठाकरे यांच्याकडे केली होती.

साखर कारखाने विक्री, अनियमितता आणि अण्णा हजारेंची तक्रार, विधानसभेत विरोधकांनी सत्ताधाऱ्यांना फैलावर घेतलं, ते प्रकरण नेमकं काय?
राज्यातील साखर कारखाने विक्रीतील अपहाराबद्दल विरोधी पक्षनेते देव्ंद्र फडणवीस यांनी सत्ताधाऱ्यांना फैलावर घेतले.
| Updated on: Mar 14, 2022 | 2:48 PM
Share

मुंबई:  राज्यातील सहकारी (Sugar Factory) साखर कारखान्यांची कवडीमोल दराने विक्री करुन राजकीय नेत्यांनी सहकार क्षेत्राला उतरती कळा लावलेली आहे. राज्यातील 15 लाख शेतकऱ्यांचे 49 साखर कारखाने हे (Breach of law) कायद्याचा भंग करुन विक्रीच्या नावाखाली राजकीय नेत्यांनी ताब्यात घेतले आहेत. एवढेच नाही तर यामध्ये 25 हजार कोटींचा घोटाळा झाला आहे. त्यामुळे सहकार चळवळीला धोका निर्माण झाला असू याची चौकशी करण्याची मागणी सामाजिक कार्यकर्ते (Anna Hajare) अण्णा हजारे यांनी केंद्रीय सहकार मंत्री अमित शहा आणि मुख्यमंत्री उध्दव ठाकरे यांच्याकडे केली होती. आता तक्रार करुन दीड महिन्याचा कालावधी लोटला असतानाही राज्य सरकारने कोणतीही कारवाई केलेली नाही. त्यामुळे अण्णा हजारे यांच्या तक्रारीचे पडसाद आज विधीमंडळात पाहवयास मिळाले. किमान चौकशी सुरु आहे का? सहकार मंत्री यावर काय भूमिका घेणार यावरुन विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी सत्ताधारांना चांगेलच धारेवर धरले. अखेर उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी सहकार क्षेत्राची अवस्था आणि औढावलेली परस्थिती मांडली

अण्णा हजारेंच्या पत्रात नेमके काय?

राज्यातील सहकार क्षेत्रातील अपहार काय आहे? यासंदर्भात 24 जानेवारी 2022 रोजी सामाजिक कार्यकर्ते अण्णा हजारे यांनी सहकार मंत्री अमित शहा आणि राज्याचे मुख्यमंत्री उध्दव ठाकरे यांना पत्र लिहले होते. राज्यातील राजकीय नेत्यांनी कायद्याचा भंग करुन सहकारी संस्थांकडून कवडीमोल दराने कारखाने खरेदी केले आहेत. यामध्ये तब्बल 25 हजार कोटींचा अपहार झाला आहे. याची चौकशी करण्याची मागणी त्यांनी पत्राद्वारे तर केली आहेच शिवाय यासाठी उच्च न्यायाधिशांच्या अध्यक्षतेखाली उच्चधिकार समिती नेमावी असाही उल्लेख पत्रात करण्यात आला आहे. मात्र, कारवाईकडे राज्याचे दुर्लक्ष होत असल्याने त्यांनी पुन्हा आंदोलनाचा इशारा दिला होता.

विरोधी पक्षनेते विधानसभेत आक्रमक

राज्यातील सहकार क्षेत्राचे काय चित्र आहे याची मांडणी सामाजिक कार्यकर्ते अण्णा हजारे यांनी केंद्राच्या आणि राज्य सरकारच्या निदर्शनात आणून दिलेले आहे. शिवाय उच्च न्यायालयाने चौकशीचे आदेशही दिले असताना राज्य सरकारकडून दुर्लक्ष होत आहे. किमान सामाजिक कार्यकर्ते अण्णा हजारे यांच्या तक्रारीची तरी दखल घेणे गरजेचे असल्याचेन विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी सांगितले. किमान यासंदर्भातील कारवाई कशी सुरु आहे याची माहिती सहकार मंत्री यांनी अण्णा हजारे यांना देण्याची मागणी केली आहे. तर काखाने चालविणे किती जिकीरीचे झाले असल्याचे सांगत उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी विरोधी पक्षनेत्यांच्या प्रश्नाला उत्तर दिले.

कारखाने घेणारे सगळे पावर यांचे निकटवर्तीय : माणिकराव जाधव

सहकार क्षेत्रात मोठा अपहार झाला आहे. एवढेच नाही तर 49 साखर कारखाने हे कायद्याचा भंग करुन खरेदी केले आहेत.आता 20 साखर कारखाने हे दीर्घ मुदतीवर चालवण्यात दिले आहेत. ते सुध्दा भविष्यात हडप करण्याचा राजकीय नेत्यांचा डाव आहे. तर राज्यातील 36 साखर कारखाने हे सध्या बंद आहेत. राज्यात 106 कारखान्यांचा प्रश्न असून यामध्ये 25 हजार कोटींचा भ्रष्टाचार झाला आहे. कारखाने हडप करण्यामागे राष्ट्रवादी कॉंग्रेसचे अध्यक्ष शरद पवार व त्यांचे सगेसोयरे असल्याचा आरोप माजी आमदार माणिकराव जाधव यांनी केला आहे.

संबंधित बातम्या :

Rabi Season : लगबग पीक काढणीची, शेतकऱ्यांनी नेमकी काय काळजी घ्यावी? वाचा सविस्तर

Cotton Crop : आवक कमी होऊनही पांढऱ्या सोन्याचीच चर्चा, हंगामाच्या अंतिम टप्प्यातही ‘ऐ नहीं झुकेगा’

Grape Damage : ऐकावे ते नवलच, कीडनाशकात आढळले तणनाशकाचे अवशेष, नेमका प्रकार काय?

तपोवन वृक्षतोडीविरोधात मनसे नाशिककरांच्या सोबतीला, चित्रपट सेना आक्रमक
तपोवन वृक्षतोडीविरोधात मनसे नाशिककरांच्या सोबतीला, चित्रपट सेना आक्रमक.
फडणवीस सरकारच 1 वर्ष, मुख्यमंत्र्यांना किती मार्क? काय सांगतो सर्व्हे?
फडणवीस सरकारच 1 वर्ष, मुख्यमंत्र्यांना किती मार्क? काय सांगतो सर्व्हे?.
फोडाफोडीन नाराजी, वाक् युद्धानंतर आज शिंदे-रवींद्र चव्हाण एकाच मंचावर?
फोडाफोडीन नाराजी, वाक् युद्धानंतर आज शिंदे-रवींद्र चव्हाण एकाच मंचावर?.
फडणवीसांच्या इशाऱ्याने इतर पक्ष चालतात, कुणाच्या वक्तव्याची होते चर्चा
फडणवीसांच्या इशाऱ्याने इतर पक्ष चालतात, कुणाच्या वक्तव्याची होते चर्चा.
CM सह शिंदे दादांची महत्त्वाची बैठक; पक्षांतर्गत प्रवेशबंदीवर तोडगा?
CM सह शिंदे दादांची महत्त्वाची बैठक; पक्षांतर्गत प्रवेशबंदीवर तोडगा?.
इंडिगोच्या विस्कळीत सेवेविरोधात प्रवाशांना मनस्ताप, थेट कोर्टात याचिका
इंडिगोच्या विस्कळीत सेवेविरोधात प्रवाशांना मनस्ताप, थेट कोर्टात याचिका.
रूपाली ठोंबरेंकडून बाळासाहेब अन् पवारांसोबत फोटो शेअर, चर्चांना उधाण
रूपाली ठोंबरेंकडून बाळासाहेब अन् पवारांसोबत फोटो शेअर, चर्चांना उधाण.
मुंबईत भाजपच्या महापौरामुळं कॉलर टाईट होणार! लोढांचं मोठं वक्तव्य काय?
मुंबईत भाजपच्या महापौरामुळं कॉलर टाईट होणार! लोढांचं मोठं वक्तव्य काय?.
चैत्यभूमीवर जनसागर... बाबासाहेबांच्या महापरिनिर्वाण दिनी मोठी गर्दी
चैत्यभूमीवर जनसागर... बाबासाहेबांच्या महापरिनिर्वाण दिनी मोठी गर्दी.
डॉ. आंबेडकरांना राज्यपाल, मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्र्यांकडून आदरांजली
डॉ. आंबेडकरांना राज्यपाल, मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्र्यांकडून आदरांजली.