AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

आनंदवार्ता : 42 वर्षानंतर शेती पाण्याचा मार्ग मोकळा, कथा डोंगरगावच्या तलावाची..!

प्रकल्प आणि लहान-मोठ्या तलावांची उभारणी ही शेतीला पाणी मिळावे म्हणूनच केली आहे. मात्र, काळाच्या ओघात अगोदर पिण्याच्या पाण्याला प्राधान्य आणि नंतर मग शेतीचा विचार करण्यात आला. त्यामुळेच गेल्या 42 वर्षापासून येवला तालुक्यातील डोंगरगावचे शेतकरी हे लघु तलावातील पाण्याच्या प्रतिक्षेत होते. गेल्या दहा वर्षापासून तर तलाव पूर्ण क्षमतेने भरुनही येथील पाण्याचा वापर केवळ पिण्यासाठीच केला जावा अशी मागणी परिसरातील ग्रामस्थांनी लावून धरली होती.

आनंदवार्ता : 42 वर्षानंतर शेती पाण्याचा मार्ग मोकळा, कथा डोंगरगावच्या तलावाची..!
लघु तलावातून चारीद्वारे शेतीसाठी पाणी सोडण्यात आले आहे. त्यामुळे येवला तालुक्यातील काही गावच्या शेतकऱ्यांची समस्या मिटलेली आहे.
| Edited By: | Updated on: Mar 14, 2022 | 11:35 AM
Share

लासलगाव : (Project) प्रकल्प आणि (Ponds) लहान-मोठ्या तलावांची उभारणी ही शेतीला पाणी मिळावे म्हणूनच केली आहे. मात्र, काळाच्या ओघात अगोदर पिण्याच्या पाण्याला प्राधान्य आणि नंतर मग शेतीचा विचार करण्यात आला. त्यामुळेच गेल्या 42 वर्षापासून येवला तालुक्यातील डोंगरगावचे (Farm Water) शेतकरी हे लघु तलावातील पाण्याच्या प्रतिक्षेत होते. गेल्या दहा वर्षापासून तर तलाव पूर्ण क्षमतेने भरुनही येथील पाण्याचा वापर केवळ पिण्यासाठीच केला जावा अशी मागणी परिसरातील ग्रामस्थांनी लावून धरली होती. त्यामुळे शेतकरी हे हक्काच्या पाण्यापासून दूर होते. त्यामुळे काळाच्या ओघात शेतीसाठी पाणी पुरवठा व्हावा या हेतूने खोदण्यात आलेली चरही बुजली गेली होती. मात्र, हक्काचे पाणी मिळावे याबाबत पिंपळखुटे बुद्रुक येथील काही शेतकऱ्यांनी उच्च न्यायालयात धाव घेतली होती. अखेर याबाबत निर्णय झाला असून सध्याची लघु तलावातील पाण्याची स्थिती पाहता चरद्वारे शेतीसाठी पाणी सोडण्याचे आदेश उच्च न्यायालयाने दिले आहेत. त्यामुळे शेतीसाठीच्या पाण्याचा मार्ग मोकळा झाला आहे.

1970 मध्ये लघु तलावाची झाली होती उभारणी

येवला तालुक्यातील डोंगरगाव व परिसरातील गावांचा शेती सिंचनाचा आणि जनावरांचा पाणी प्रश्न मिटावा यासाठी 1970 च्या सुमारास लघु तलाव मंजूर झाला होता.रोहयो अंतर्गत 1972 मध्ये लघुतलावाचे काम पूर्ण झाले. तर 1976,80 व 83 मध्ये चारीला पाणी सोडल्याचे बोलले जात आहे पण आता गेल्या दहा वर्षापासून तलाव पूर्ण क्षमतेने भरले जात असतानाही काही ग्रामस्थांच्या विरोधामुळे डोंगरगाव शिवारात या तलावाचे पाणी आलेच नाही. मात्र, आता उच्च न्यायालयाच्या निर्णयानंतर चरद्वारे पाणी सोडले जाणार आहे.

शेतीपाण्याचा मार्ग मोकळा

येवला तालुक्यातील पिंपळखुटे बुद्रुक येथील काही शेतकऱ्यांनी हक्काच्या पाण्यासाठी उच्च न्यायालयात धाव घेतली होती. शेतकऱ्यांनी आपली बाजू मांडत या तलावातील पाणी योजना नसल्याचे सांगितले. तर पाच किलोमीटर चर खोदण्याचा उद्देश हा शेतीला पाणी मिळावे हाच असल्याचे निदर्शनास आणून दिले. तसेच पाच किलोमीटरची बुजलेली चारी पालकमंत्री छगन भुजबळ यांनी खोदून देण्याच्या सूचनेनुसार खोदून मोकळी केल्याचे ही उच्च न्यायालयाच्या निदर्शनास आणून दिल्यानंतर न्यायालयाने पाणी सोडण्याचे आदेश दिले आहेत. त्यामुळे 42 वर्षानंतर का होईना शेतीसाठी पाणी मिळणार आहे.

या गावच्या शिवाराला होणार फायदा

उच्च न्यायालयाच्या आदेशामुळे डोंगरगाव तलावाच्या चारीला 42 वर्षानंतर पाणी सोडण्यात आले आहे.त्यामुळे पिंपळखुटे, भुलेगाव, देवठाण, तळवाडे आणि डोंगरगांव या पाच गावातील शंभर एकराहून अधिक शेतीपिकांना फायदा होणार आहे. पाणी सोडण्यात आले यावेळी शेकडोंच्या संख्येने शेतकरी चारीच्या अवतीभवती उपस्थित होते.

संबंधित बातम्या :

Grape Damage : ऐकावे ते नवलच, कीडनाशकात आढळले तणनाशकाचे अवशेष, नेमका प्रकार काय?

Pomegranate Garden : कीड-रोगाने डाळिंब बागांना घेरले, आता कृषी विभागाच्या मोहीमेने मिळणार का नवसंजीवनी!

Mango : फळांच्या राजा यंदा निसर्गाच्या कचाट्यात, उत्पादन घटल्याने चवही महागणार

ठाकरे बंधूंच्या मनोमिलनात पहिला मीठाचा खडा, कल्याण-डोंबिवलीतच सुरुंग
ठाकरे बंधूंच्या मनोमिलनात पहिला मीठाचा खडा, कल्याण-डोंबिवलीतच सुरुंग.
मुंबईचा महापौर कोण? आरक्षण सोडतीकडे राज्याचं लक्ष
मुंबईचा महापौर कोण? आरक्षण सोडतीकडे राज्याचं लक्ष.
कल्याण डोंबिवली महापालिकेत शिवसेनेचाच महापौर बसेल
कल्याण डोंबिवली महापालिकेत शिवसेनेचाच महापौर बसेल.
हर्षवर्धन पाटलांच्या कन्या घड्याळ चिन्हावर झेडपी निवडणूक लढणार?
हर्षवर्धन पाटलांच्या कन्या घड्याळ चिन्हावर झेडपी निवडणूक लढणार?.
लातूरमध्ये मोठ्या घडामोडी, ZP निवडणुकीसाठी शेवटचा दिवस असल्याने...
लातूरमध्ये मोठ्या घडामोडी, ZP निवडणुकीसाठी शेवटचा दिवस असल्याने....
KDMC मध्ये मोठा गेम? या पक्षाच्या मदतीने होणार शिंदेंचा महापौर?
KDMC मध्ये मोठा गेम? या पक्षाच्या मदतीने होणार शिंदेंचा महापौर?.
गणितं बदलू शकत नाही, पण चित्र बदलेल, संजय राऊतांचा सूचक इशारा
गणितं बदलू शकत नाही, पण चित्र बदलेल, संजय राऊतांचा सूचक इशारा.
दावोसमध्ये मुख्यमंत्र्यांची पिकनिक; संजय राऊतांची खोचक टीका
दावोसमध्ये मुख्यमंत्र्यांची पिकनिक; संजय राऊतांची खोचक टीका.
महाराष्ट्राचं पालघर गुजरातमध्ये विलीन झालं का?
महाराष्ट्राचं पालघर गुजरातमध्ये विलीन झालं का?.
पालघरमध्ये12 मागण्यांसाठी जिल्हाधिकारी कार्यालयासमोर ठिय्या आंदोलन
पालघरमध्ये12 मागण्यांसाठी जिल्हाधिकारी कार्यालयासमोर ठिय्या आंदोलन.