AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

पावसाचा आवाज बियांना ऐकू येतो, मग त्या अंकुरतात, MIT चे महत्वाचे संशोधन

पावसाचा टप..टप...असा आवाजा केवळ आपले मनोरंजन करत नाही तर मातीच्या आत लपलेल्या बियांना देखील जीवनाचा संदेश देतो. त्यामुळे रोपटी आपल्या आजूबाजूच्या ध्वनींना ऐकत असतात, त्यांना अनुभवू शकतात आणि त्यानुसार प्रतिक्रिया देखील देऊ शकतात !

पावसाचा आवाज बियांना ऐकू येतो, मग त्या अंकुरतात, MIT चे महत्वाचे संशोधन
seeds hear rain
| Updated on: May 08, 2026 | 7:29 PM
Share

झाडांना संवेदना असतात, झाडे सजिव असतात हे आपणाला माहिती आहे. मात्र, झाडांच्या बिया देखील प्रचंड संवेदनशील असतात. त्यांना पावसाच्या पहिल्या थेंबांचा आवाज देखील ऐकू येत असतो. त्यामुळे त्या जागे होतात आणि वेगाने अंकुरित होऊ लागतात असे नवीन संशोधनातून स्पष्ट झाले आहे. पावसाच्या थेंबांचा हा टप..टप…आवाज त्यांच्यासाठी जीवन सुरु करण्याचा संकेत बनतो असे संशोधकांनी उघड केले आहे.

अमेरिकेतील प्रतिष्ठीत मॅसाचुसेट्स इन्स्टिट्यूट ऑफ टेक्नोलॉजीच्या ( MIT ) संशोधकांनी हा रंजक शोध लावला आहे. एमआयटीच्या संशोधकांनी केलेल्या अभ्यासात खास करुन तांदुळाच्या बाबतीत असे आढळले की धानाच्या बिया पावसाचा आवाज ऐकून ३० ते ४० टक्के वेगाने अंकुरीत होतात. म्हणजे पावसाच्या थेंबांचा टप-टपचा आवाज त्यांना वेळेच्या आधीच अंकुरीत होण्यास मदत करते. हा शोध त्या समजूतीला बदलत आहे ज्यात आपण आधी रोपट्यांना निष्क्रिय आणि बेजीव मानत होतो.

बिया केवळ ओलावा आणि पाण्याची वाट पाहात नाहीत तर आपल्या आजू बाजूच्या परिसराचा अंदाज घेऊन त्यानुसार निर्णय घेतात आता अंकुरित होण्याची योग्य वेळ आली आहे की नाही असे संशोधकांचे म्हणणे आहे.

पावसाचे थेंब जेव्हा मातीवर किंवा पाण्यावर ध्वनी तरंगे निर्माण करतात. हे ध्वनी तरंग माती आणि पाण्याच्या आत व्हायब्रेशन निर्माण करतात आणि बिया या कंपनांचा अनुभव घेऊ शकतात आणि त्यांनी ती जाणवतात. संशोधकांच्या मते बियांच्या आता स्टॅटोलिथ नावाचे खूप छोटे कण असतात. हे कण स्टार्च पासून बनलेले असतात. जेव्हा पावसाच्या आवाजाने निर्माण झालेले व्हायब्रेशन या स्टॅटोलिथला हलवतात तेव्हा बियांना संकेत मिळतो की आता पुरेसे पाणी येणार आहे.आणि हा माहोल त्यांच्या उगवण्यासाठी अनुकूल आहे. त्यामुळेच मग बिया वेगाने अंकुरित होऊ लागतात.

MIT च्या संशोधकांनी या गोष्टीला सिद्ध करण्यासाठी धानाच्या सुमारे ८ हजार बियांवर प्रयोग केला. काही बियांना सामान्य ओलावा दिला. तर काही बियांना पावसासारखा आवाज आणि पाण्याचा थेंबाचा प्रभाव टाकला.

निकाल स्पष्ट होते, की ज्या बियांना पावसाचा आवाज ऐकायला दिला ते ३० -४० टक्के वेगाने अंकुरित झाले. पाण्यात ध्वनींचे तरंग जास्त चांगले पसरतात. त्यामुळे पाणी वा ओली मातीच्या आतील बिया या आवाजांना चांगल्या प्रकारे अनुभवू शकतात.

रोपटी किती संवेदनशील असतात?

हा अभ्यास सिद्ध करतो की रोपे आपल्या विचारांहून अधिक जास्त समजदार आणि संवेदनशील असतात. केवळ प्रकाश, पाणी आणि मातीवर ते अवलंबून नसतात, तर ते आवाज आणि कंपनांना देखील अनभवू शकतात.

आधीच्या अभ्यासात असे आढळले होते की रोपे किटकांच्या चावण्याच्या आवाज ऐकून आपल्या पानांत कडू रसायन बनवतात. काही रोपे स्पर्श केल्यावर बंद होतात. काही सुंगधांना रिएक्ट करतात. आता पावसाचा आवाज ऐकण्याची क्षमताही यात सामील झाली आहे.

हे संशोधन कृषी विज्ञानासाठी देखील खूप महत्वाची ठरु शकते. जर योग्य आवाज वा कंपने देऊन बियांना वेगाने अंकुरित केले जाऊ शकले तर पिके लवकर तयार होऊ शकतात आणि शेतकऱ्यांना फायदा होईल.

Follow Us
नाशिक धर्मांतर प्रकरणात मोठी घडामोड! धर्मांतर, हिजाब ट्रेनिंग.....
नाशिक धर्मांतर प्रकरणात मोठी घडामोड! धर्मांतर, हिजाब ट्रेनिंग......
अखेर ठरलं! हा नेता होणार पश्चिम बंगालचा मुख्यमंत्री
अखेर ठरलं! हा नेता होणार पश्चिम बंगालचा मुख्यमंत्री.
तामिळनाडूत राजकीय खळबळ! थलपती विजय सरकार स्थापनेच्या उंबरठ्यावर?
तामिळनाडूत राजकीय खळबळ! थलपती विजय सरकार स्थापनेच्या उंबरठ्यावर?.
मी पालकमंत्र्यांना काडीमात्र भाव देत नाही, पालकमंत्री पोलीस आहेत का?
मी पालकमंत्र्यांना काडीमात्र भाव देत नाही, पालकमंत्री पोलीस आहेत का?.
TCS धर्मांतर प्रकरणातील आरोपी निदा खान गरोदर?
TCS धर्मांतर प्रकरणातील आरोपी निदा खान गरोदर?.
निदा खान प्रकरणात सर्वात मोठा ट्विस्ट... एमआयएमचा नगरसेवक सहआरोपी
निदा खान प्रकरणात सर्वात मोठा ट्विस्ट... एमआयएमचा नगरसेवक सहआरोपी.
नाशिक TCS प्रकरणातील मास्टरमाईंडला बेड्या; 42 दिवस पोलिसांना गुंगारा..
नाशिक TCS प्रकरणातील मास्टरमाईंडला बेड्या; 42 दिवस पोलिसांना गुंगारा...
जय पवारांच्या एका वक्तव्याने महाराष्ट्राच्या राजकारणात नवा ट्विस्ट....
जय पवारांच्या एका वक्तव्याने महाराष्ट्राच्या राजकारणात नवा ट्विस्ट.....
बदलापूरनंतर गोवंडीत संतापजनक घटना; शाळेतील शिपायाकडून 6 वर्षीय....
बदलापूरनंतर गोवंडीत संतापजनक घटना; शाळेतील शिपायाकडून 6 वर्षीय.....
दहावीच्या निकालात कोकण विभाग पुन्हा अव्वल; राज्याचा निकाल 92.09 टक्के
दहावीच्या निकालात कोकण विभाग पुन्हा अव्वल; राज्याचा निकाल 92.09 टक्के.