15 दिवसांपासून सोयाबीनचे दर स्थिर, काय आहेत कारणे? शेतकऱ्यांची भूमिका निर्णायक

15 दिवसांपासून सोयाबीनचे दर स्थिर, काय आहेत कारणे? शेतकऱ्यांची भूमिका निर्णायक
लातूर कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये शेतीमालाची आवक वाढली आहे.

नववर्षाच्या सुरवातीपासून (Soybean Rate) सोयाबीनचे दर हे 6 हजार ते 6 हजार 300 च्या आसपास आहेत. आवक सरासरीएवढी असतानाही हे दर टिकून राहिलेले आहेत. यामध्ये (Farmer) शेतकऱ्यांची भूमिका महत्वाची राहिली असली तरी या दरम्यानच्या काळात सोयापेंडच्या मागणीतही वाढ झाली नसल्याने हे दर टिकून राहिल्याचे (Traders) व्यापाऱ्यांनी सांगितले आहे.

टीव्ही 9 मराठी डिजीटल टीम

| Edited By: राजेंद्र खराडे

Jan 19, 2022 | 11:15 AM

पुणे : नववर्षाच्या सुरवातीपासून (Soybean Rate) सोयाबीनचे दर हे 6 हजार ते 6 हजार 300 च्या आसपास आहेत. आवक सरासरीएवढी असतानाही हे दर टिकून राहिलेले आहेत. यामध्ये (Farmer) शेतकऱ्यांची भूमिका महत्वाची राहिली असली तरी या दरम्यानच्या काळात सोयापेंडच्या मागणीतही वाढ झाली नसल्याने हे दर टिकून राहिल्याचे (Traders) व्यापाऱ्यांनी सांगितले आहे. सोयापेंडची मागणी सोयाबीन विक्राीबाबत शेतकऱ्यांची भूमिका यावरच सध्या सोयाबीनचे दर अवलंबून आहेत. सोयाबीनला वायदे बाजारातून वगळल्यानंतर बाजारातील दर मागणी आणि होणाऱ्या पुरवठ्यावरच ठरत आहेत. दिवसाकाठी थोड्याबहुत प्रमाणात दरात बदल होत असले तरी एका विशिष्ट्य दराभोवतीच सोयाबीने आहे.

सोयाबीनच्या दरात वाढ होऊनही सोयापेंडच्या मागणीत घट

गत महिन्याच्या तुलनेत सोयाबीनचे दर हे वाढलेले आहेत. 5 हजार 800 वर असलेले सोयाबीन जानेवारी महिन्याच्या सुरवातीपासून 6 हजार 300 वर स्थिरावलले आहे. 400 ते 500 रुपायांची वाढ होऊन देखील सोयापेंडला सर्वसामान्यच मागणी राहिल्याने बाजारपेठेत हे चित्र पाबवयास मिळत आहे. देशांतर्गतच सोयापेंडचे दर अधिक असल्याने येथील बाजारात आणि निर्यातीसाठीही सोयापेंडला मागणी ही सरासरीच राहिलेली आहे.

शेतकऱ्यांची भूमिकाही महत्वाची

सोयाबीनचे दर टिकवून ठेवण्यात किंवा त्यामध्ये थोडीफार वाढ करण्यामध्ये शेतकऱ्यांची भूमिकाही महत्वाची राहिलेली आहे. कारण अपेक्षित दर मिळाल्याशिवाय सोयाबीनची विक्रीच नाही असा पवित्रा शेतकऱ्यांनी घेतला होता. यामध्ये टप्प्याटप्प्याने केलेली विक्री ही फायद्याची ठरलेली आहे. आता हंगामाच्या अंतिम टप्प्यात जरी सोयाबीनची आवक वाढली असली तरी दरावर लक्ष केंद्रीत करुनच विक्री केली जात आहे.

अशी होत आहे आवक

सोयाबीन उत्पादनात महाराष्ट्र आणि मध्यप्रदेश ही दोन राज्य महत्वाची आहेत. हंगाम अंतिम टप्प्यात असतानाही शेतकऱ्यांच्या भूमिकेमुळे आवक ही टिकून आहे. महाराष्ट्रात 1 लाख 10 हजार तर मध्यप्रदेशमध्ये 1 लाख 25 हजार पोत्यांची आवक होत आहे. मागणीनुसारच सोयाबीनची आवक होत असून हेच मुख्य कारण आहे जर टिकून राहण्याचे. हंगामाच्या सुरवातीपासून बाजारपेठेचा अभ्यास करुनच शेतकऱ्यांनी आवक सुरु ठेवल्याने शेतकऱ्यांचे नुकसान झालेले नाही.

संबंधित बातम्या :

Grape Rate : दर निश्चित होऊनही द्राक्ष उत्पादकांची कोंडी, काय आहेत निर्यातदारांच्या मागण्या?

Grape : द्राक्षे विक्रीपेक्षा बेदाणा निर्मितीवरच शेतकऱ्यांचा भर, कशामुळे झाला हा बदल?

पीक पध्दतीमध्ये बदल हाच उत्पादन वाढीचा मार्ग, काय आहे कृषितज्ञांचा शेतकऱ्यांना सल्ला?

Follow us on

Related Stories

Most Read Stories

Click on your DTH Provider to Add TV9 MARATHI

राज्य चुनें