भाजीपाला रोपवाटिका काळाची गरज, असे करा व्यवस्थापन

रोपवाटिकेतील रोपे वापरल्यास उत्पादनवाढीसाठी फायदा होणार आहे. शिवाय शेतकऱ्यांसाठी तसेच सुशिक्षित बेरोजगारांसाठी भाजीपाला रोपवाटिका हे अल्प कालावधीत उत्पन्न मिळण्याचे एक उत्तम साधन होऊ शकते.

भाजीपाला रोपवाटिका काळाची गरज, असे करा व्यवस्थापन
संग्रहीत छायाचित्र

मुंबई : उत्पन्न वाढीचा सर्वात चांगला मार्ग शेतकऱ्यांसाठी भाजीपाल्याचा आहे. कमी कालावधीत आणि कमी खर्चात भाजीपाल्याचे उत्पन्न घेता येते. मात्र, काळाच्या ओघात यामध्ये देखील (management of nursery) शास्त्रशुद्ध पध्दतीचा अवलंब केला जात आहे. यामध्ये सर्वात महत्वाचे आहे ते सुधारित जातीचे बियाणे उपलब्ध होणे तसेच तांत्रिकदृष्ट्या (vegetable nursery) भाजीपाला रोपवाटिका तयार करणे खर्चिक आणि त्रासदायक असते. शिवाय याची पुरेशी माहिती नसल्याने रोपांना एक ते दोन आठवड्यांच्या कालावधीत मर रोग, पाने शोषणाऱ्या किडींना बळी पडणाची शक्यता असते. त्यामुळे रोपवाटिकेतील रोपे वापरल्यास उत्पादनवाढीसाठी फायदा होणार आहे. शिवाय शेतकऱ्यांसाठी तसेच सुशिक्षित बेरोजगारांसाठी भाजीपाला रोपवाटिका हे अल्प कालावधीत उत्पन्न मिळण्याचे एक उत्तम साधन होऊ शकते.

रोपवाटिकेसाठी गादीवाफे तयार करणे

रोपवाटिकेसाठी सुपीक तसेच पाण्याचा निचरा होणारी जमीन निवडावी लागणार आहे. रोपवाटिकेला भरपूर सूर्यप्रकाश मिळणे गरजेचे आहे. गादीवाफे तयार करण्यासाठी जमीन दोन वेळा उभी व आडवी नांगरून घ्यावी. त्यानंतर 3 मीटर लांब 1 मीटर रुंद आणि 15 ते 20 सें.मी. उंच अशा आकाराचे वाफे तयार करावेत. त्यावर बी पेरून रोपे तयार करण्याची पद्धत चांगली आहे. गादीवाफ्यामुळे रोपांच्या मुळाशी वाढ चांगली होते. रोपांची आंतरमशागत व इतर कामे व्यवस्थित करता येतात. मुळांचा पाण्याबरोबर प्रत्यक्ष संपर्क येत नसल्यामुळे बुरशीजन्य रोगापासून रोपांचे सरंक्षण होते.

बियाण्याची निवड

वाफ्यावर रोपे करून पुनर्लागण पद्धतीने मिचची, वांगी, टोमॅटो, कोबी, नवलकोन, कॉलिफ्लॉवर, कांदा इत्यादी पिकांची लागवड केली जाते. खात्रीशीर भाजीपाला बियाणे पुरवठादारांकडून किंवा कृषी विद्यापीठे व कृषी विभाग यांच्याकडूनच खरेदी करावे. बियाणे पेरणीपूर्वी छोट्याशा कुंडीत पीकनिहाय 10 बिया पेरून रुजण्याचे प्रमाण अजमावून पाहवे. सर्वसाधारण पणे 1 हेक्टर क्षेत्रावर 45 सेमी या अंतराने लावण्यासाठी 1 लाख 50 हजार रोपांची गरज असते .

बियाण्याची पेरणी

बियाणे पेरणीपूर्वी वाफ्यावर 300 ते 500 ग्रॅम सिंगल सुपर फॉस्फेट 150 ग्रॅम लिंडेन पावडर प्रति वाफा पसरुन, मातीत मिसळून घ्यावी. या व्यतिरिक्त कोणतेही खरत पेरताना देऊ नये. मिरचीसारख्या पिकांचे प्रति वाफा 30 ते 35 ग्रॅम बियाणे लागते. बियाणे खोलवर पेरले गेल्यास अपेक्षित रुजवा मिळत नाही त्यामुळे योग्य खोलीवर बियाणे रुजवणे गरजेचे आहे. पेरणीपासून 15 ते 20 दिवस पेरलेल्या वाफ्यावर किडींचा प्रादुर्भाव आढळून आल्यास एन्डोसल्कान दीड मि. लि. प्रति 1 लिटर पाण्यात मिसळून फवारणी करावी. साधारणतः तीन ते चार दिवसानंतर भाजीपाला रोपांना दुसरी पानांची जोडी येते. त्यानंतर पाण्याच्या गरजेनुसार नियमित पुरवठा करावा .

खताचा पुरवठा

रोपवाटिकेस माती परीक्षणानुसार रोपांच्या योग्य वाढीसाठी 15 दिवसांनी खताचा डोस द्यावा. यामध्ये प्रतेक वाक्याला 100 ग्रॅम युरिया, 500 ग्रॅम सिंगल सुपर फॉस्फेट, 100 ग्रॅम म्युरेट ऑफ पोटॅश व सुमारे 2 घमेली शेणखत दोन रांगांमध्ये रेषा ओढून टाकावे. यानंतर रोपवाटिकेस पाटाने पाणी घ्यावे. रोपांचे फुलकिडे, मावा, पांढरी माशी इत्यादी पानांतील रस शोषून घेणाऱ्या किडीपासुन संरक्षण करण्यासाठी आवश्यकतेनुसार मोनोक्रोटोफॉस व कार्बोन्डाझिम यांच्या पहिल्या आठवड्यानंतर 2 ते 3 फवारण्या तज्ञांच्या सल्यानेच करावेत.

रोपवाटिकेसाठी रोपांची काढणी

रोपांची काढणी शक्यतो दुपारनंतर करावी. रोप दूरच्या अंतरावर घेऊन जायचे असल्यास ऊनाची तीव्रता वाढण्याअगोदर त्याची काढणी करावी. रोपे उपटण्यापूर्वी वाफ्याला भरपूर पाणी घावे, त्यामुळे जमीन मऊ होऊन तुटण्याचे प्रमाण कमी होते. रोपे ही उपटावीत त्यामुळे मुळांना माती चिकटून राहते व वाहतुकीत रोपांचे नुकसान कमी होते.

संबंधित बातम्या :

बाजार समित्यांच्या बळकटीकरणासाठी राज्य सरकारचे महत्वाचे निर्णय, पणन मंडळाच्या नियमातही होणार बदल

Pik Vima Yojana : पीकांच्या विम्याची प्रीमियम रक्कम कशी ठरवली जाते? प्रत्येक शेतऱ्यासाठी महत्वाची बातमी

रब्बीत कपाशीची लागवड फायद्याची की नुकसानीची ? शिफारस नसतानाही शेतकऱ्यांचे धाडस

Click on your DTH Provider to Add TV9 MARATHI