Osmanabad : तेरणा कारखान्याचा वाद पुन्हा कोर्टात, यंदाच्या हंगामापूर्वी प्रश्न निघणार का मार्गी?

उस्मानाबाद जिल्हा मध्यवर्ती बॅंकेने तेरणा साखर कारखाना भाडेतत्वावर देण्यासंदर्भात मध्यंतरी टेंडर काढले होते. दरम्यान, टेंडरची रक्कम ही अमित देशमुख यांच्या ट्वेंटीवन शुगरनेही अदा केली होती पण टेंडर हे अंतिम मुदतीच्या शेवटच्या टप्प्यात भरले होते. त्यामुळे डीआरडीने आ.तानाजीराव सावंत यांच्या भैरवनाथ साखर समूहाचे टेंडर हे ग्राह्य धरुन त्यांना 25 वर्षासाठी कारखाना भाडेतत्वावर देण्याचे आदेश डीआरडी कोर्टांने दिले होते.

Osmanabad : तेरणा कारखान्याचा वाद पुन्हा कोर्टात, यंदाच्या हंगामापूर्वी प्रश्न निघणार का मार्गी?
तेरणा साखर कारखान्याचा वाद पुन्हा कोर्टात गेला आहे.
Follow us
| Updated on: Jul 11, 2022 | 1:55 PM

उस्मानाबाद : गेल्या काही दिवसांपासून (Terna Sugar Factory) तेरणा साखर कारखान्यावरुन चांगलेच (Politics) राजकारण पेटले आहे. 8 महिन्यापासून या कारखान्याबाबत वाद सुरु असून यंदाचा हंगाम सुरु होण्यापूर्वी तरी यावर काही तोडगा निघतो की नाही अशी स्थिती निर्माण झाली आहे. कारण माजी मंत्री अमित देशमुख यांच्या (TwentyOne Sugar) ट्वेंटीवन शुगर कारखान्याने पुन्हा एकदा डीएआरटी कोर्टात याचिका दाखल केली आहे. मध्यंतरी हा साखर कारखाना आ. तानाजी सावंत यांच्या भैरवनाथ साखर समूहाला तेरणा कारखाना भाडेतत्वावर देण्याचे आदेश डीआरटी कोर्टाने दिले होते. मात्र, पुन्हा हा वाद कोर्टात गेल्याने कारखाना सुरु होण्याचा मार्ग खडतर दिसून येत आहे.

नेमका काय आहे वाद?

उस्मानाबाद जिल्हा मध्यवर्ती बॅंकेने तेरणा साखर कारखाना भाडेतत्वावर देण्यासंदर्भात मध्यंतरी टेंडर काढले होते. दरम्यान, टेंडरची रक्कम ही अमित देशमुख यांच्या ट्वेंटीवन शुगरनेही अदा केली होती पण टेंडर हे अंतिम मुदतीच्या शेवटच्या टप्प्यात भरले होते. त्यामुळे डीआरडीने आ.तानाजीराव सावंत यांच्या भैरवनाथ साखर समूहाचे टेंडर हे ग्राह्य धरुन त्यांना 25 वर्षासाठी कारखाना भाडेतत्वावर देण्याचे आदेश डीआरडी कोर्टांने दिले होते. एवढेच नाही तर ट्वेंटीवन शुगरची याचिकाही फेटाळली होती. पण आता पुन्हा अमित देशमुख हे कोर्टात गेले आहेत. त्यामुळे कारखान्याचे भवितव्य काय असा सवाल उपस्थित होत आहे.

म्हणून तेरणावर राजकीय नेत्यांचे लक्ष

उस्मानाबाद जिल्ह्यातील सर्वात मोठा असलेला साखर कारखाना हा गेल्या काही वर्षापासून बंद अवस्थेत आहे. याकडे कायम दुर्लक्ष केले जात होते. हा साखर कारखाना लातूर आणि उस्मानाबाद या जिल्ह्यांच्या सीमेवरती आहे. आता दोन्ही जिल्ह्यामध्ये उसाचे क्षेत्र हे वाढत आहे. त्यामुळे हा कारखाना भाडेतत्वावर देऊन सुरु करण्याचा मानस असताना आता आ. तानाजी सावंत आणि दुसरीकडे आ. अमित देशमुख यांच्यात कारखाना ताब्यात घेण्यासाठी जणूकाही स्पर्धा लागली आहे. मात्र, कोर्टाच्या आदेशानंतर आता पुन्हा देशमुख यांनी कोर्टाचे दार ठोठावल्याने कारखाना कुणाच्या ताब्यात जाणार हे पहावे लागणार आहे.

हे सुद्धा वाचा

अडीच वर्षापासून वाद सुरु

उस्मानाबाद जिल्हा मध्यवर्ती बँकेने 25 नोव्हेंबर 2021 रोजी संचालक मंडळाच्या बैठकीत ठराव घेत आगामी 25 वर्षासाठी तेरणा कारखाना भैरवनाथ समूहाला भाडेतत्वावर दिला आहे तेव्हापासून हा वाद कोर्टात आहे. हा निर्णय होताच ट्वेंटीवन शुगरने या कारखान्यावर दावा करीत कोर्टात धाव घेतली होती. तेव्हापासून हा वाद सुरु आहे. त्यामुळे यंदाच्या हंगामात काय होणार हा प्रश्न आहे.

Non Stop LIVE Update
लोकसभा निवडणुकीत लातूरमध्ये कोणाला लागणार ठसका? पाहा छोटा पुढारी
लोकसभा निवडणुकीत लातूरमध्ये कोणाला लागणार ठसका? पाहा छोटा पुढारी.
फेअरप्ले ॲप प्रकरणी तमन्ना भाटियाच्या अडचणीत वाढ
फेअरप्ले ॲप प्रकरणी तमन्ना भाटियाच्या अडचणीत वाढ.
ठाकरेंनी 18 जागा जिंकून दाखवाव्यात, भाजप नेत्याचं ठाकरेंना आव्हान
ठाकरेंनी 18 जागा जिंकून दाखवाव्यात, भाजप नेत्याचं ठाकरेंना आव्हान.
मोदींच्या काळात महिलांना मंगळसूत्र विकावी लागली, राऊतांची मोदींवर टीका
मोदींच्या काळात महिलांना मंगळसूत्र विकावी लागली, राऊतांची मोदींवर टीका.
शरद पवार गटाच्या जाहीरनाम्यातील दोन प्रमुख मुद्दे, वाचा सविस्तर
शरद पवार गटाच्या जाहीरनाम्यातील दोन प्रमुख मुद्दे, वाचा सविस्तर.
शरद पवार यांच्या 'लाव रे तो व्हिडीओ'वर देवेंद्र फडणवीस यांचा पलटवार
शरद पवार यांच्या 'लाव रे तो व्हिडीओ'वर देवेंद्र फडणवीस यांचा पलटवार.
26 पक्षांची खिचडी, खिचडीचे लोक त्यांना नेता मानत नाहीत,फडणवीसांची टीका
26 पक्षांची खिचडी, खिचडीचे लोक त्यांना नेता मानत नाहीत,फडणवीसांची टीका.
बायकोची कामं ऐकावीच लागतील, नाहीतर... अजित दादांची फटकेबाजी
बायकोची कामं ऐकावीच लागतील, नाहीतर... अजित दादांची फटकेबाजी.
भाषण सुरू अन् नितीन गडकरी स्टेजवरच कोसळले, यवतमाळच्या पुसदमधील घटना
भाषण सुरू अन् नितीन गडकरी स्टेजवरच कोसळले, यवतमाळच्या पुसदमधील घटना.
EVM-VVPAT च्या याचिकेवर सुप्रीम कोर्टात नेमकं काय घडल? काय दिला निकाल?
EVM-VVPAT च्या याचिकेवर सुप्रीम कोर्टात नेमकं काय घडल? काय दिला निकाल?.