अतोनात खर्च करुन कांदा पिकवला, पण कवडीचाही भाव नाही, धुळ्यात उभ्या कांद्यावर शेतकऱ्याने रोटाव्हीटर फिरवला

अवकाळी पाऊस आणि वेळोवेळी येणारी कंडावरील रोगराई या दोन्ही गोष्टीतून सावरत धुळ्यातील साक्री तालुक्यातील शेतकऱ्यांनी कांदा पिकावर अतोनात खर्च करुन कांदा पीकवला. पण, पावसाळी कांद्याला खर्च करुन देखील बाजारात कांद्याला भाव मिळत नाहीये. म्हणून शेतकऱ्यांनी कांद्यावर थेट रोटाव्हीटर फिरविला आहे.

अतोनात खर्च करुन कांदा पिकवला, पण कवडीचाही भाव नाही, धुळ्यात उभ्या कांद्यावर शेतकऱ्याने रोटाव्हीटर फिरवला
Dhule Farmer

धुळे : अवकाळी पाऊस आणि वेळोवेळी येणारी कंडावरील रोगराई या दोन्ही गोष्टीतून सावरत धुळ्यातील साक्री तालुक्यातील शेतकऱ्यांनी कांदा पिकावर अतोनात खर्च करुन कांदा पिकवला. पण, पावसाळी कांद्याला खर्च करुन देखील बाजारात कांद्याला भाव मिळत नाहीये. म्हणून शेतकऱ्यांनी कांद्यावर थेट रोटाव्हीटर फिरविला आहे.

धुळ्यातील साक्री तालुक्यातील आमखेल गावात सुभाष नांद्रे या शेतकऱ्याने 1 एकर पावसाळी कांदा लावला होता. पण मार्केटमध्ये पावसाळी कांद्याला भावच नाही त्या अनुषंगाने शेतात उभ्या असलेल्या कांद्यावर त्यांनी रोटाव्हीटर फिरवला आहे.

मार्केटमध्ये कांदा न्यायचा जाला तर त्याला काढणी आणि वाहतुकीचा खर्च हा येत असतो. पण, गेल्या काही दिवसांपासून बऱ्याच मार्केटमध्ये पावसाळी कांद्याचा लिलाव होत नव्हता. आता लिलाव होतो, पण आलेला व्यापारी हा 2 ते 6 रुपये किलो या दराने कांदा मागतो. मग त्यात काढणी आणि वाहतुकीचा देखील खर्च निघत नाही म्हणून शेतकऱ्याने शेतातच कांद्यावर रोटाव्हीटर फिरवून पुढील येणाऱ्या पिकासाठी शेत तयार करुन घेतलं असेल.

पण, अद्यापाही शासनाकडून शेतकऱ्यांच्या शेताची कुठलीही पाहणी झालेली नाही. मदत मिळणे ही तर दूरची बाब आहे.

पिंपळगाव बसवंतमधील कांदा लिलाव आजपासून सुरू

पिंपळगाव बसवंत कृषी उत्पन्न बाजार समितीतील कांदा व्यापाऱ्यांकडे कांद्याच्या गोदामावर काम करणाऱ्या टोळी दोनच्या माथाडी कामगारांनी मंगळवारी अचानक संप पुकारला होता. त्यामुळे व्यापाऱ्यांनी पुढील सूचना मिळेपर्यंत कांदा लिलाव बंद राहणार असल्याची घोषणा केली. ऐन दिवाळीनंतर हे आंदोलन सुरू झाले. खरे तर दिवाळी आणि साप्ताहिक सुट्ट्या मिळून नाशिक जिल्ह्यातील बाजार समित्या अगोदरच दहा दिवस बंद होत्या. त्यानंतर हे आंदोलन सुरू झाल्याने शेतकऱ्यांची चांगलीच कोंडी झाली.

मात्र, या आंदोलनावर तोडगा निघत नव्हता. शेवटी नाशिक येथे कामगार आयुक्तांनी तातडीने दखल घेत कांदा व्यापारी आणि टोळी क्रमांक दोनच्या माथाडी कामगारांची बैठक घडवून आणली. या बैठकीत कामगांरांच्या विविध मागण्यांवर तोडगा काढण्यात आला. त्यामुळे संपावर गेलेल्या जवळपास साडेतीनशे माथाडी कामगारांनी कामावर येणार असल्याची घोषणा केली आहे. त्यानंतर पिंपळगाव बसवंत कृषी उत्पन्न बाजार समितीनेही आज शुक्रवारपासून कांद्याचे लिलाव सुरळीत सुरू होतील, अशी माहिती दिली. या आंदोलनाचा तिढा सुटल्याने कांद्याच्या लिलावाच्या प्रतीक्षेत असलेल्या कांदा उत्पादक शेतकऱ्यांना मोठा दिलासा मिळाला आहे.

संबंधित बातम्या :

संशोधन समितीच शोधणार आता फळगळतीवर उपाय, संत्रा उत्पादकांचे मोठे नुकसान

थकीत ‘एफआरपी’ वरुन लातूरात आता भाजप-काँग्रेस आमने-सामने

खरिपातील तूर फुलोऱ्यात, काय आहे मराठवाडा कृषी विद्यापीठाचे आवाहन ?

Click on your DTH Provider to Add TV9 MARATHI