‘संदीप’ शेतकऱ्याचे नाव अन् कांद्याचे वाणही; दौंडच्या तरुणाचा काय आहे अनोखा प्रयोग सविस्तर वाचा
दौंड तालुक्यातील पाटस गावचा तरुण शेतकरी यांने स्वत:च्याच नावाचा कांदा वाण विकसित केला आहे. या शेतकऱ्यांने कांद्याची नवीन जात शोधून काढली आहे. त्याला कांद्याच्या वाणाचे नाव आहे 'संदीप कांदा'. या वाणाची टिकवण क्षमता सात ते आठ महिने इतकी आहे. सोबतच याची रोगप्रतिकारक क्षमता देखील जास्त आहे. या संशोधनासाठी संदीप घोले यांना 2019 साली राष्ट्रपती रामनाथ कोविंद यांच्या हस्ते गौरविण्यात आले आहे.

पुणे : काळाच्या ओघात प्रयोगशील शेतकऱ्यांची संख्या वाढत आहे. त्यामुळे तरुणांमधील गुण तर समोर येतच आहेत पण ते किती फायद्याचेही आहेत हे दौंडच्या तरुणाच्या प्रयोग पाहिल्यानंतर लक्षात येते. दौंड तालुक्यातील पाटस गावचा तरुण शेतकरी यांने स्वत:च्याच नावाचा (Improved onion varieties) कांदा वाण विकसित केला आहे. या शेतकऱ्यांने कांद्याची नवीन जात शोधून काढली आहे. त्याला कांद्याच्या वाणाचे नाव आहे (Sandeep Onion) ‘संदीप कांदा’. या वाणाची टिकवण क्षमता सात ते आठ महिने इतकी आहे. सोबतच याची रोगप्रतिकारक क्षमता देखील जास्त आहे. या संशोधनासाठी संदीप घोले यांना 2019 साली राष्ट्रपती रामनाथ कोविंद यांच्या हस्ते गौरविण्यात आले आहे.
…. म्हणून लागला संदीप वाणाचा शोध
कांदा लागवड सुरु असताना अनेकांची बियाणे खरेदी करताना फसवणूक केली जाते. निकृष्ट दर्जाचे बियाणे शेतकऱ्यांना विकले जाते. संदीप घोले या शेतकऱ्यांने स्वतःच्या नावाची कांद्याची जात शोधून काढली आहे. कांदा टिकवण्यासाठी अनेक अडचणींचा सामना करावा लागत होता. कांदा लवकरच खराब होत असल्याने दर वाढीचा कधी फायदाच संदीप यांना झाला नाही. त्यावर पर्याय म्हणून त्यांनी आठ वर्षे संशोधन केले आणि संदीप कांदा या वाणाची निर्मिती केली. त्यामुळे त्यांच्या उत्पन्नात हेक्टरी 7 ते 8 टनाचा फरक पडला आहे.
मार्केटींगसाठी सोशल मिडीया
संदीप कांदा हे जरा संयुक्तिक वाटत नसले तरी तरी कांद्याच्या या नविन वाणाची सोशल मिडीयावर खूप चर्चा आहे. शिवाय या माध्यमातून मार्केटींगही होत आहे. संदीप कांदा ही कांद्याची जात शेतकऱ्यांना फायदेशीर असल्याने आठ राज्यातील जवळपास एक हजार पेक्षा जास्त शेतकरी त्यांना जोडले गेले आहेत. त्यामुळे बाकी शेतकरी देखील संदीप कांदा या वाणाची लागवड केली आहे. त्यामुळे त्यांच्या उत्पादन वाढले सोबतच उत्पादन खर्च देखील कमी झाला आहे.
संदीप कांद्याचे हे आहे वेगळेपण
संदीपच्या ह्या अनोख्या प्रयोगाची दखल नॅशनल इनोव्हेशन फाउंडेशनने घेतली आहे. शिवाय 2019 मध्ये राष्ट्रपती रामनाथ कोविंद यांच्या हस्ते देखील त्यांचा गौरव करण्यात आला होता. संदीप प्याज हा इतर कांद्या पेक्षा तीन ते चार महिने जास्त टिकतो. त्यांमुळे शेतकऱ्यांना त्याचा मोठा फायदा होतो. संदिप घोले यांनी केलेलं कांद्याचं संशोधन हे आगामी काळात शेतकऱ्यांच्या फायद्याचे ठरणार आहे. कारण सध्या गुणवत्तापूर्ण मालाला जास्त महत्त्व आहे.
