AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

Turmeric Crop : हळद पीक एक अन् समस्या अनेक, यंदा उत्पादन निम्म्यावरच, काय आहेत कारणे ?

मराठवाड्यात हिंगोली पाठोपाठ नांदेड जिल्ह्यामध्ये हळदीचे पीक घेतले जाते. केळी बागांची जागा आता हळद पिकांने घेतली आहे. याच हळदीमुळे अनेक शेतकऱ्यांच्या जीवनामध्ये रंग भरले असले तरी आता निसर्गाच्या लहरीपणामुळे हळदीचा रंगही फिक्कट होताना पाहवयास मिळत आहे. यंदाच्या अतिवृष्टी आणि बेमोसमी पावसाचा परिणाम थेट उत्पादनावर होत आहे. सध्या हळद काढणीची कामे सुरु असून काढणी दरम्यान, कंदच सडून गेले असल्याचे शेतकऱ्यांच्या निदर्शणास येत आहे.

Turmeric Crop : हळद पीक एक अन् समस्या अनेक, यंदा उत्पादन निम्म्यावरच, काय आहेत कारणे ?
नांदेड जिल्ह्यामध्ये हळदीची काढणी सुरु आहे पण कंद सडल्यामुळे उत्पादनात मोठी घट होत आहे.
| Edited By: | Updated on: Feb 23, 2022 | 10:19 AM
Share

नांदेड : मराठवाड्यात हिंगोली पाठोपाठ नांदेड जिल्ह्यामध्ये (Turmeric Crop) हळदीचे पीक घेतले जाते. केळी बागांची जागा आता हळद पिकांने घेतली आहे. याच हळदीमुळे अनेक शेतकऱ्यांच्या जीवनामध्ये रंग भरले असले तरी आता निसर्गाच्या लहरीपणामुळे हळदीचा रंगही फिक्कट होताना पाहवयास मिळत आहे. यंदाच्या (Heavy Rain) अतिवृष्टी आणि बेमोसमी पावसाचा परिणाम (Reduce Rain) थेट उत्पादनावर होत आहे. सध्या हळद काढणीची कामे सुरु असून काढणी दरम्यान, कंदच सडून गेले असल्याचे शेतकऱ्यांच्या निदर्शणास येत आहे. यामुळे थेट उत्पादनावर परिणाम होत आहे. त्यामुळे हळदीला वाढीव दर मिळत असला तरी उत्पादनातच घट होत असल्याने त्याचा काय उपयोग ? असा सवाल शेतकऱ्यांसमोर आहे. खरिपातील सोयाबीन, कापूस, उडीद, मूग आणि आता हळदीची ही अवस्था असल्याने शेतकरी चिंतेत आहे. शिवाय हळद हे शासकीय अनुदानाच्या वर्गवारीत येत नसल्याने या शेतकऱ्यांनी दाद मागावी तरी कुणाकडे हा प्रश्न आहे.

नेमके कंद सडण्याचे कारण काय ?

पारंपरिक पिकांना फाटा देत हिंगोलीनंतर नांदेड जिल्ह्यातील शेतकऱ्यांनी पीक पध्दतीमध्ये बदल करुन हाळद लागवडीवर भर दिला आहे. यंदा निसर्गाच्या लहरीपणाचे परिणाम अजून पिकांवर जाणवत आहेत. खरिपाच्या अंतिम टप्प्यात झालेल्या पावसाचे पाणी हे शेत जमिनीमध्ये साचून राहिले होते. पाण्याचा निचरा होण्यासाठीही पावसाने मोकळीक दिली नाही. तब्बल महिनाभर पाणी हळदीमध्ये साचून राहल्याने कंदच सडले. कंद हे जमिनीतच सडल्यामुळे न भरुन निघणारे नुकसान झाले आहे. आता काढणीची कामे सुरु आहेत. या दरम्यान, किती नुकसान झाले याचा अंदाज शेतकऱ्यांना येऊ लागला आहे.

21 हजार हेक्टरावर हळदीचे पीक

गेल्या आठ ते दहा वर्षांमध्ये हळदीमधून शेतकऱ्यांचे उत्पन्न वाढले आहे.शिवाय हिंगोली जिल्ह्यातील वसमत येथील बाजारपेठही जवळ असल्याने शेतकऱ्यांनी पारंपरिक पिकांपेक्षा हळदीवरच भर दिला आहे. त्यामुळे नांदेड जिल्ह्यामध्ये तब्बल 21 हजार हेक्टरावर लागवड केली जात आहे. पण यंदा क्षेत्र वाढले अन् उत्पादन घटले अशी स्थिती झाली आहे. सध्या हळदीला 9 ते 10 हजार क्विंटलचा दर असून घटलेल्या उत्पादनामुळे शेतकऱ्यांना अधिकचा फायदा झालेला नाही.

ना अनुदानाचा लाभ ना पीकविमा

हळद पीक हे अनुदानाच्या वर्गवारीत येत नाही. त्यामुळे नुकसान होऊनही भरपाई मिळेल अशी कोणतीच शक्यता नाही. तर दुसरीकडे हळदीला पीकविमाही लागू नाही. त्यामुळे उत्पादन घटले आणि वाढले तरी लाभ-तोटा हा शेतकऱ्यांनाच सहन करावा लागतो. या दोन्ही बाबींचा फायदा शेतकऱ्यांना घेता येत नसल्याने अधिकचे नुकसान होत आहे. त्यामुळे शासनाने यामधून मार्ग काढावा अशी मागणी शेतकऱ्यांची आहे.

संबंधित बातम्या :

लेट पण थेट : उन्हाळी सोयाबीन फुलोऱ्यात, काय आहे कृषी विभागाचा सल्ला?

देशातील शेतकऱ्यांना हमीभावाचा ‘आधार’, महाराष्ट्रातील शेतकरी मात्र पिछाडीवर

उन्हाळी हंगामात तेलबियांवर भर, दुर्लक्षित करडईचा कशामुळे वाढला पेरा? कारण साधे पण परिणाम मोठा

कल्याण-डोंबिवलीत जागावाटपावरून महायुतीत तणाव; तातडीची बैठक
कल्याण-डोंबिवलीत जागावाटपावरून महायुतीत तणाव; तातडीची बैठक.
बारामतीकरांनी बरेच चिमटे काढले; अजितदादांचा मंचावरून उपरोधिक टोला
बारामतीकरांनी बरेच चिमटे काढले; अजितदादांचा मंचावरून उपरोधिक टोला.
गौतम अदानी माझे मोठे भाऊ! सुप्रिया सुळेंचं वक्तव्य
गौतम अदानी माझे मोठे भाऊ! सुप्रिया सुळेंचं वक्तव्य.
शरद पवार माझे मार्गदर्शक; गौतम अदानींकडून पवारांचं कौतुक
शरद पवार माझे मार्गदर्शक; गौतम अदानींकडून पवारांचं कौतुक.
युत्या होतात तुटतात; मुंबई कुणी हिसकावू शकले नाही - उद्धव ठाकरे
युत्या होतात तुटतात; मुंबई कुणी हिसकावू शकले नाही - उद्धव ठाकरे.
आमचं स्वप्न पूर्ण होणार! शिरसाटांनी व्यक्त केला विश्वास
आमचं स्वप्न पूर्ण होणार! शिरसाटांनी व्यक्त केला विश्वास.
वंचित बहुजन आघाडी आणि काँग्रेसमध्ये 62 जागांवर शिक्कामोर्तब!
वंचित बहुजन आघाडी आणि काँग्रेसमध्ये 62 जागांवर शिक्कामोर्तब!.
काका पुतण्या एकाच मंचावर! शरद पवार-अजित पवारांमध्ये चर्चा
काका पुतण्या एकाच मंचावर! शरद पवार-अजित पवारांमध्ये चर्चा.
अदानींच्या हस्ते शरद पवार AI सेंटरचे उद्घाटन!
अदानींच्या हस्ते शरद पवार AI सेंटरचे उद्घाटन!.
मुंबईत फक्त ठाकरे ब्रँडच चालेल! अविनाश जाधव यांनी व्यक्त केला विश्वास
मुंबईत फक्त ठाकरे ब्रँडच चालेल! अविनाश जाधव यांनी व्यक्त केला विश्वास.