लेट पण थेट : उन्हाळी सोयाबीन फुलोऱ्यात, काय आहे कृषी विभागाचा सल्ला?

यंदा प्रथमच सोयाबीनची काढणी झाल्यानंतर पुन्हा सोयाबीन शेत शिवारामध्ये बहरु लागले आहे. मराठवाड्यात तर हंगाम खरीप आहे का रब्बीचा असा प्रश्न निर्माण झाला आहे. कारण उन्हाळी हंगामातही सोयाबीनचेच क्षेत्र वाढले आहे. हंगामाच्या सुरवातीला अवकाळी, गारपीट आणि नंतर कडाक्याच्या थंडीत रब्बी हंगामातील पिकांबाबतही शंका उपस्थित झाली होती. पण आता सर्वकाह सुरळीत असून सर्वाधिक क्षेत्रावर असलेले सोयाबीन मोठ्या डौलाने बहरू लागले आहे.

लेट पण थेट : उन्हाळी सोयाबीन फुलोऱ्यात, काय आहे कृषी विभागाचा सल्ला?
यंदा उन्हाळी हंगामातील सोयाबीनमुळे खरिपातील बियाणांची चिंता मिटली आहे.
Follow us
| Updated on: Feb 23, 2022 | 9:42 AM

औरंगाबाद : यंदा प्रथमच सोयाबीनची काढणी झाल्यानंतर पुन्हा सोयाबीन शेत शिवारामध्ये बहरु लागले आहे. मराठवाड्यात तर हंगाम खरीप आहे का रब्बीचा असा प्रश्न निर्माण झाला आहे. कारण (Summer Season) उन्हाळी हंगामातही सोयाबीनचेच क्षेत्र वाढले आहे. हंगामाच्या सुरवातीला (Untimely Rain) अवकाळी, गारपीट आणि नंतर कडाक्याच्या थंडीत रब्बी हंगामातील पिकांबाबतही शंका उपस्थित झाली होती. पण आता सर्वकाह सुरळीत असून सर्वाधिक क्षेत्रावर असलेले सोयाबीन मोठ्या डौलाने बहरू लागले आहे. उन्हाळी हंगामातील (Soybean Crop) सोयाबीन उतारा हा कमी असतो हा अंदाज यंदा चुकीचा ठरतो की काय असे सोयाबीन बहरले आहे. मात्र, फुलोऱ्यात असलेल्या सोयाबीनला रस शोषणाऱ्या किडींचा प्रादुर्भाव वाढत आहे. यावर शेतकऱ्यांनी नियंत्रण मिळवले तर वाढीव उत्पादनापासून कोणी रोखू शकत नाही अशी अवस्था आहे.

रस शोषणाऱ्या अळीवर असे मिळवा नियंत्रण

सध्या फुलोऱ्यात असलेल्या सोयाबीनची शेतकऱ्यांना सातत्याने पाहणी करावी लागणार आहे. जर रस शोषणाऱ्या अळीचा प्रादुर्भाव आढळून आल्यास सर्वप्रथम वनस्पतिजन्य किंवा जेंचिक कीटकनाशकांना प्राधान्य द्यावे. त्यासाठी पहिली फवारणी निंबोळी अर्क 5 टक्के किंवा ऑझंड़ीरेंक्टीन 300 पीपीएम 50 मिलि. प्रति 10 लिटर पाण्यात मिसळून फवारावे लागणार आहे. मात्र, अधिकाचा प्रादुर्भाव झाला असल्यास कृषी सहायकाच्या सल्ल्याने नियंत्रण करावे लागणार असल्याचे कृषी अधिकारी संतोष घसिंग यांनी सांगितले आहे.

यामुळे वाढला सोयाबीनचा पेरा

यंदा खरिपातील सोयाबीने पावसामुळे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले होते. त्यामुळे उत्पादनात घट तर झालीच पण पावसामुळे रब्बी हंगाम हा दीड महिन्याने लांबणीवर पडलेला होता. त्यामुळे ज्वारी शिवाय शेतकऱ्यांकडे पर्याय नसल्याने शेतकऱ्यांनी पीक पध्दतीमध्ये बदल करुन सोयाबीनलाच प्राधान्य दिले. शिवाय खरिपात बियाणाची टंचाई भासू नये व सोयाबीनसाठी पोषक वातावरण असल्याने कृषी विभागानेही याबाबत जनजागृती केली होती. त्यामुळे मराठावड्यातच नाही तर सबंध राज्यात यंदा उन्हाळी हंगामात सोयाबीनचे क्षेत्र वाढले आहे. औरंगाबाद आणि जालना जिल्ह्यामध्ये तर 6 हजार 500 हेक्टरावर सोयाबीनचा पेरा झाला आहे.

खरिपातील बियाणाचा प्रश्न मार्गी

दरवर्षी शेतकऱ्यांना खरीप हंगामाच्या तोंडावर सोयाबीन बियाणांचा प्रश्न भेडसावत होता. बाजारपेठेतील बियाणांची उगवण होत नसल्याच्या तक्रारी ह्या वाढत आहेत तर याकरिता अधिकचा पैसाही खर्च करावा लागत होता. पण आता उन्हाळी सोयाबीनमुळे हा प्रश्न मार्गी लागणार आहे. योग्य ते प्रमाण राखून सोयाबीनची जोपासणा केलेल्या शेतकऱ्यांनी घरगुतीच बियाणे वापरण्याचा सल्ला कृषी विभागाने दिला आहे. त्यामुळे यंदा योग्य वेळी खरितातील पेरण्या होऊन उत्पादन वाढीसाठी त्याचा उपयोग होणार आहे.

संबंधित बातम्या :

देशातील शेतकऱ्यांना हमीभावाचा ‘आधार’, महाराष्ट्रातील शेतकरी मात्र पिछाडीवर

उन्हाळी हंगामात तेलबियांवर भर, दुर्लक्षित करडईचा कशामुळे वाढला पेरा? कारण साधे पण परिणाम मोठा

अमिर खानच्या ‘सोयाबीन शाळेत’ महाराष्ट्रातील शेतकरी होणार का पास? नेमका उद्देश काय?

Non Stop LIVE Update
पुन्हा मरायला तयार... मतदानासाठी निघालेले जरांगे पाटील काय म्हणाले?
पुन्हा मरायला तयार... मतदानासाठी निघालेले जरांगे पाटील काय म्हणाले?.
हातांची झोळी केली...सोपे नव्हते मला हरविणे म्हणून...तुपकरांचा हल्लाबोल
हातांची झोळी केली...सोपे नव्हते मला हरविणे म्हणून...तुपकरांचा हल्लाबोल.
मतदार निघाले मतदान करायला पण EVM मशीनच बंद, कुठं घडला प्रकार?
मतदार निघाले मतदान करायला पण EVM मशीनच बंद, कुठं घडला प्रकार?.
लोकसभेच्या मतदानाचा आज दुसरा टप्पा, महाराष्ट्रात या 8 मतदारसंघात मतदान
लोकसभेच्या मतदानाचा आज दुसरा टप्पा, महाराष्ट्रात या 8 मतदारसंघात मतदान.
नो खैरे ओन्ली भूमरे...शिंदेंचं आवाहन, फडणवीसांनी काढली विरोधकांची औकात
नो खैरे ओन्ली भूमरे...शिंदेंचं आवाहन, फडणवीसांनी काढली विरोधकांची औकात.
भरसभेत पवारांनी लावला मोदींचा व्हिडीओ, तर शिंदे-फडणवीसांकडून पलटवार
भरसभेत पवारांनी लावला मोदींचा व्हिडीओ, तर शिंदे-फडणवीसांकडून पलटवार.
बीडमध्ये जातीचं कार्ड कोण खेळतंय? कुणबीपत्रावरून धनंजय मुंडेंचं विधान
बीडमध्ये जातीचं कार्ड कोण खेळतंय? कुणबीपत्रावरून धनंजय मुंडेंचं विधान.
लोकसभा निवडणुकीत लातूरमध्ये कोणाला लागणार ठसका? पाहा छोटा पुढारी
लोकसभा निवडणुकीत लातूरमध्ये कोणाला लागणार ठसका? पाहा छोटा पुढारी.
फेअरप्ले ॲप प्रकरणी तमन्ना भाटियाच्या अडचणीत वाढ
फेअरप्ले ॲप प्रकरणी तमन्ना भाटियाच्या अडचणीत वाढ.
ठाकरेंनी 18 जागा जिंकून दाखवाव्यात, भाजप नेत्याचं ठाकरेंना आव्हान
ठाकरेंनी 18 जागा जिंकून दाखवाव्यात, भाजप नेत्याचं ठाकरेंना आव्हान.