Weather Alert : कोकण-पश्चिम महाराष्ट्रात विजांच्या कडकडाटांसह पाऊस, हवामान विभागाचा ताजा अंदाज

भंडारा जिल्ह्यात 12 मार्च ते 13 मार्च दरम्यान मध्यम स्वरूपाच्या पावसाचे संकेत हवामान विभागानं दिले आहेत. weather alert IMD Bhandara

Weather Alert : कोकण-पश्चिम महाराष्ट्रात विजांच्या कडकडाटांसह पाऊस, हवामान विभागाचा ताजा अंदाज
पावसाचा इशारा भंडाऱ्यात पावसाची शक्यता

मुंबई: हवामान विभागानं महाराष्ट्रातील कोकण आणि पश्चिम महाराष्ट्राबाबत मोठा अंदाज वर्तवला आहे. हवामान विभागाचे अधिकारी होसाळीकर यांनी कोकणातील रत्नागिरी, सिंधुदुर्ग आणि पश्चिम महाराष्ट्रातील सातारा, सांगली, सोलापूर आणि कोल्हापूरमध्ये आज विजांच्या कडकडाटासह पावसाचा इशारा दिला आहे.  पूर्व विदर्भामध्ये भंडारा जिल्ह्यात 12 मार्च ते 13 मार्च दरम्यान मध्यम स्वरूपाच्या पावसाचे संकेत हवामान विभागानं दिले आहेत. हवामान विभागानं पावासची शक्यता वर्तवल्यानं गहू उत्पादक शेतकऱ्यांची चिंता वाढली आहे. भारतीय हवामान खात्याने दिलेल्या निर्देशानुसार पूर्व विदर्भातील भंडारा जिल्ह्यातील शेतकऱ्यांसमोर नवं संकट उभं राहिलं आहे. दुसरीकडे दिल्लीतील वातावरण देखील बदललं असून काही ठिकाणी पाऊस झाला आहे. (Weather alert IMD says rain shower in Bhandara rain showers in Delhi NCR)

कोकणासह पश्चिम महाराष्ट्रातील जिल्ह्यांमध्ये पावसाचा इशारा

हवामान विभागानं महाराष्ट्रातील कोकण आणि पश्चिम महाराष्ट्राबाबत मोठा अंदाज वर्तवला आहे. हवामान विभागाचे अधिकारी होसाळीकर यांनी कोकणातील रत्नागिरी, सिंधुदुर्ग आणि पश्चिम महाराष्ट्रातील सातारा, सांगली, सोलापूर आणि कोल्हापूरमध्ये विजांच्या कडकडाटासह पावसाचा इशारा दिला आहे.  हवामान विभागानं आज दिवसभरात शेतकऱ्यांना आणि इतरांना काळजी घेण्याचं आवाहन केले आहे.

चक्रीवादळामुळं कमीदाबाचा पट्टा

हवामान खात्याच्या माहितीनुसार पश्चिम राजस्थान, अरबी समुद्र, बंगालची खाडी या दरम्यान निर्माण झालेल्या हलक्या स्वरुपाच्या चक्रीवादळाच्या पट्ट्यामुळे मध्य भारतात कमी दाबाचा पट्टा निर्माण झाला आहे. पूर्व विदर्भात विशेषता भंडारा जिल्ह्यात 12 मार्च ते 13 मार्च दरम्यान हलक्या स्वरुपाचा पाऊस पडण्याची शक्यता आहे. जिल्ह्यातील गहू उत्पादक शेतकऱ्यांची चिंता वाढली आहे. कापणीला आलेल्या गहू पिकाचं नुकसान होण्याची शक्यता आहे. हवामान बदल होणार असल्याने वायरल आजार डोके वर काढू शकतात. त्यामुळे जिल्ह्यातील सामान्य जनतेनी आपल्या आरोग्याची काळजी घेण्याचे आवाहन जिल्हा आपत्ती व्यवस्थापन अधिकारी अभिषेक नामदास यांनी केलं आहे.

दिल्लीतही पाऊस

राजधानी नवी दिल्लीमध्ये आज सकाळी वातावरणात अचानक बदल झाला. दिल्लीमध्ये पावसाच्या सरी बरसल्या. पावसामुळे वातावरणात गारवा निर्माण झाला आहे. दिल्लीतील कनॉट परिसरात, नोएडा आणि इतर ठिकाणी पाऊस झाला आहे. दिल्लीमध्ये आज दिवसभर पाऊस होण्याचा अंदाज हवामान विभागानं वर्तवला आहे. हवामान विभागानं यापूर्वीचं हवामानाचा अंदाज वर्तवला होता. जम्मू काश्मीर, पंजाब आणि उत्तराखंड, पश्चिम उत्तर प्रदेशमध्ये वातावरण बदललं असून दोन दिवस ढगाळ वातावरण राहण्याची शक्यता आहे.

दिल्लीतील तापमान घटलं

प्रादेशिक हवामान विभागानं वर्तवलेल्या अंदाजानुसार राजधानी दिल्लीमध्ये तापमान 6 डिग्री सेल्सियस ते 20.4 डिग्री सेल्सियस दरम्यान असेल, असा अंदाज वर्तवण्यात आला आहे. हवामान विभागानं नवी दिल्लीत दिवसभर हलक्या स्वरुपाचा पाऊस होईल, असं म्हटलं आहे.

संबंधित बातम्या :

Weather Alert : राज्यातील तापमानात मोठी वाढ; येत्या काही दिवसांत हलक्या सरींच्या पावसाचा अंदाज

Zomato | महिलेचं नाक फोडल्याच्या प्रकरणाला नवं वळण, डिलीव्हरी बॉयचा धक्कादायक दावा

(Weather alert IMD says rain shower in Bhandara rain showers in Delhi NCR)

Published On - 11:58 am, Fri, 12 March 21

Click on your DTH Provider to Add TV9 MARATHI