शेतजमिनीत साठलेल्या पाण्याचा काय होतो पिकांवर परिणाम ? पाण्याचा निचरा हाच एकमेव पर्याय

जमिन ही पिकांना लागणारी अन्नद्रव्ये, हवा, पाणी पुरवण्याचे सर्वात महत्वाचे माध्यम आहे. या तीन्हीही बाबी योग्य वेळी योग्य प्रमाणात पुरवल्या तरच पिकांची वाढ होते. पिकांच्या उत्तम वाढीसाठी मातींच्या कणाभोवतालचा भागात हवा आणि पाणी यांचा समतोल आवश्यक आहे. याकरिता जमिनीतील पाण्याचा निचरा होणे गरजेचे आहे.

शेतजमिनीत साठलेल्या पाण्याचा काय होतो पिकांवर परिणाम ? पाण्याचा निचरा हाच एकमेव पर्याय
संग्रहीत छायाचित्र
टीव्ही 9 मराठी डिजीटल टीम

| Edited By: राजेंद्र खराडे

Dec 17, 2021 | 8:00 AM

लातूर : जमिन ही पिकांना लागणारी अन्नद्रव्ये, हवा, पाणी पुरवण्याचे सर्वात महत्वाचे माध्यम आहे. या तीन्हीही बाबी योग्य वेळी योग्य प्रमाणात पुरवल्या तरच पिकांची वाढ होते. पिकांच्या उत्तम वाढीसाठी मातींच्या कणाभोवतालचा भागात हवा आणि पाणी यांचा समतोल आवश्यक आहे. याकरिता (Agricultural land) जमिनीतील पाण्याचा निचरा होणे गरजेचे आहे. यंदा अधिकच्या पावसामुळे पाणी शेत जमिनीमध्येच साचून राहिले. त्यामुळे आंब्याच्या मुळांना हवा योग्य वेळी मिळाली नाही व मोहोरच फुटला नाही. (water drains,) पाण्याचा निचरा ही दुर्लक्षित बाब असली तरी किती महत्वाची आहे हे यंदा शेतकऱ्यांच्या लक्षात आले आहे. त्यामुळे पाण्याचा निचरा केव्हा काढायचा व त्याचे फायदे काय आहेत हे शेतकऱ्यांना माहिती असणे गरजेचे आहे.

पाणी निचरा करण्याच्या कोणत्या पध्दती आहेत

1) रेडॅम डिच पद्धत – शेतात असणारी पाण्याची डबकी एक दुसऱ्याला जोडणाऱ्या नाल्या काढाव्या लागतात. त्यामुळे एका डबक्यातील पाणी दुसऱ्या डबक्यात, दुसऱ्या डबक्यातील पाणी तिसऱ्या डबक्यात व शेवटी सांडवाटे ते बाहेर काढले जाते. 2) पाइपद्वारे निचरा – ज्या ठिकाणी नाल्या काढणे शक्य होत नाही, त्या ठिकाणी पाइपद्वारे शेतातील पाणी बाहेर काढतात. डबक्यापासून मुख्य सांडनालीपर्यंत विशिष्ट प्रकारे उतार देऊन पाईप बसवतात. पाईपद्वारे डबक्यातील पाणी शेताबाहेर काढतात. जमिनीचा पृष्ठभाग अगदी सखल ठेवल्यास शेतातील पाणी सरळ उतार असलेल्या भागातून शेताच्या बाहेर निघून जाते.

शेतामध्ये नाल्या काढून पाणी बाहेर काढणे –

1) सारा पध्दत : या पद्धतीमध्ये पूर्ण शेतामध्ये सात ते दहा मीटर रुंदीचे सारे तयार केले जातात. वाफ्याच्या बाजूला नाल्या काढतात. नाल्यांची खोली 45 सें.मी. पर्यत असून लांबी साधारण : 90 ते 300 मीटर असते. नाल्यांना विशिष्ट उतार दिला जातो. या वाफ्यातील पाणी बाजूच्या नालीत उतरून उपसांड नालीत व मुख्य सांडनालीत जाते.

भूमिगत निचरा पद्धती –

भूमिगत निचरा म्हणजे जमिनीचा पोटातील अनावश्यक पाणी बाहेर काढणे. या पाण्याचा निचरा करण्यासाठी जमिनीच्या पोटात कृत्रिम नाल्या तयार कराव्या लागतात. या नाल्यांमधून पाण्याचा निचरा होण्यासाठी 10 सें.मी. व्यासाच्या चिनी मातीच्या नळ्या, छिद्रे असलेले कोरुगेटेड पीव्हीसी पाइप अंथरतात.

पाण्याचा निचरा न केल्यास काय होते

जमिनीतील क्षारांचे वाढते प्रमाण – पाण्याचा निचरा नसलेल्या जमिनीत क्षारांचे प्रमाण बहुधा जास्त असते. या क्षारांचे प्रत्यक्ष आणि अप्रत्यक्षरित्या मुळांवर अनिष्ट परिणाम होत असतात. सोडिअम अन्नांशांचे प्रमाण मुळांत जास्त झाल्यास मुळे आखुड राहतात आणि ती कार्यरत राहत नाहीत. निचरा नसलेल्या जमिनीतील मुळे खालून कुजतात व त्यांची उगवणही कालावधीही मर्यादित असतो.

जमिनीच्या तापमानातील थंडावा- जमिनिचा निचरा बिघडला, तर जमिनीचे तापमान कमी होते व त्या थंड राहतात. अशा जमिनीत ऊसासारख्या पिकांची उगवण बरोबर होत नाही आणि उगवण झाल्यानंतरही त्यांच्या मुळांची वाढ चांगली होत नाही. पिकांची वाढ मुख्यतः मुळा जवळच्या जमिनीच्या तापमानावर अवलंबून असते. काही पिकांची रोगप्रतिकारक क्षमता कमी होते. या परिस्थितीमध्ये मर, मुळ्या कुजणे हे रोग उद्भवतात. त्यामुळे उत्पादन वाढीसाठी देखील शेतजमिनीतील पाण्याचा निचरा महत्वाचा आहे.

संबंधित बातम्या :

आता एकच पर्याय..! शेतकरीच ठरवणार शेतीमालाचा दर, द्राक्ष बागायत शेतकऱ्यांची एकजूट

सोयाबीनची आवक वाढतेय दर मात्र चिंताजनक, शेतकऱ्यांसाठी काय आहे सल्ला ?

पंतप्रधान मोदींनी दिला कमी खर्चात अधिकच्या शेती उत्पादनाचा कानमंत्र..! 80 टक्के शेतकऱ्यांना होणार फायदा

Follow us on

Related Stories

Most Read Stories

Click on your DTH Provider to Add TV9 MARATHI

राज्य चुनें