Sesame Prices : संक्रातीच्या सणातही तीळाच्या दरात तेजीच, काय आहेत कारणे?

ऐन संक्रातीच्या सणाच्या दरम्यानच तीळाची आवक मोठ्या प्रमाणात होते. त्यामुळे सणात मोठ्या प्रमाणात मागणी असली तरी तीळाचे दर मात्र, नियंत्रणातच असतात. पण यंदाचे चित्र हे वेगळे आहे. कारण बदलत्या वातावरणाचा परिणाम तीळाच्या उत्पादनावरही झालेला आहे. हवामानातील बदलामुळे तीळाच्या उत्पन्नामध्ये 25 टक्के घट होणार असल्याचा अंदाज वर्तवण्यात आला आहे.

Sesame Prices : संक्रातीच्या सणातही तीळाच्या दरात तेजीच, काय आहेत कारणे?
संग्रहीत छायाचित्र

पुणे : ऐन संक्रातीच्या सणाच्या दरम्यानच तीळाची आवक मोठ्या प्रमाणात होते. त्यामुळे सणात मोठ्या प्रमाणात मागणी असली तरी ( Sesame price) तीळाचे दर मात्र, नियंत्रणातच असतात. पण यंदाचे चित्र हे वेगळे आहे. कारण बदलत्या (Climate Change) वातावरणाचा परिणाम तीळाच्या उत्पादनावरही झालेला आहे.  हवामानातील बदलामुळे तीळाच्या उत्पन्नामध्ये 25 टक्के घट होणार असल्याचा अंदाज वर्तवण्यात आला आहे. त्यामुळे सणात वाढती मागणी आणि घटलेले उत्पादन यामुळे दर हे तेजीतच राहणार आहेत. गेल्या 4 महिन्यामध्ये तीळाच्या दरात 40 ते 50 रुपयांची वाढ झाली आहे. ती कायम राहून अणखीन दर वाढतील का हेच पहावे लागणार आहे.

उत्पादनात घट अन् दर्जाही ढासाळला

हवामातील बदलाचा परिणाम प्रत्येक पिकांवर झालेला आहे. त्याच प्रमाणे तीळ उत्पन्नामध्ये काही प्रमाणात का होईना घट ही झालेली आहे. शिवाय जे उत्पन्न शेतकऱ्यांच्या पदरी पडलेले आहे ते ही दर्जेदार नाही. पावसामुळे तीळ हलका आणि कमी दर्जाचा, डागी तीळाचे उत्पादन जास्त निघाले आहे. असे असले तरी वाढत्या मागणीमुळे दर हे टिकून आहेत. तीळापेक्षा इतर पिकांची उत्पादकता ही अधिकची असते. मुळात तीळाचे एकरी उत्पन्न हे कमी असते तर यंदा अवकाळी पाऊस आणि हवामानातील बदलामुळे ते अधिकच कमी झाले आहे.

गतवर्षीपेक्षा उत्पादनात मोठी घट

बदलत्या शेती पध्दतीमुळे दिवसेंदिवस शेती उत्पन्नामध्ये वाढ होत आहे. पण यंदा निसर्गाच्या लहरीपणाचा फटका सर्वच पिकांना बसलेला आहे. गतवर्षी देशात तीळाचे उत्पन्न हे 4 लाख 39 हजार 75 मेट्रीक टन झाले होते. शिवाय गतवर्षीपेक्षा यंदा अधिकच्या क्षेत्रावर हे पीक असूनही केवळ अनियमित पाऊस आणि बदललेल्या वातावरणामुळे तब्बल 8 लाख मेट्रीक टन उत्पादनात घट झाली आहे. याचा परिणाम आता वर्षभर दरावर राहणार आहे.

सर्व प्रकारच्या तीळाचे असे आहे  उत्पादन

वर्ष                 तीळ उत्पादन मेट्रिक टन 2014-15                 8,27,839

2015-16                 8,50,070

2016-17                 7,47,030

2017-18                7,55,430

2018-19               6,89,310

2019-20              5,13,750

2020-21              6,39,075

2021-22              3,25,000

दर्जानुसार तीळाचे दर

महिना                एक किलोचे दर

जुलै                   95 – 125 रुपये

ऑगस्ट               100 – 130 रुपये

सप्टेंबर                110 – 140 रुपये

ऑक्टोंबर           125 – 160 रुपये

नोव्हेंबर             130 – 165 रुपये

डिसेंबर             130 – 170 रुपये

संबंधित बातम्या

हमीभाव केंद्र 10 दिवसापुरतेच, आधारभूत किंमतीपेक्षा खुल्या बाजारपेठेत अधिकचा भाव, कसे बदलले तूरीचे दर?

Solapur : 1 हजार 54 ट्रक अन् 1 लाख 5 हजार क्विंटल कांदा बाजारपेठेत, कशामुळे झाली विक्रमी आवक?

Seed Production : हवामानातील बदलाचा परिणाम बिजोत्पादनावर, महाबीजकडून ‘या’ पर्यायाचा अवलंब

Click on your DTH Provider to Add TV9 MARATHI