Solapur : 1 हजार 54 ट्रक अन् 1 लाख 5 हजार क्विंटल कांदा बाजारपेठेत, कशामुळे झाली विक्रमी आवक?

कांद्याचे दर, कांद्याचे उत्पादन आणि आता कांद्याची आवक या पिकाबाबत सर्वकाही लहरीपणाचेच आहे. आहो खरंच असंच म्हणण्याची वेळ आली आहे. कारण एकाच दिवशी सोलापूरातील सिध्देश्वर कृषी उत्पन्न बाजार पेठेत तब्बल 1 हजार 54 ट्रकमधून 1 लाख 5 हजार 400 क्विंटल कांद्याची आवक झाली आहे.

Solapur : 1 हजार 54 ट्रक अन् 1 लाख 5 हजार क्विंटल कांदा बाजारपेठेत, कशामुळे झाली विक्रमी आवक?
संग्रहीत छायाचित्र

सोलापूर : (Onion Rate) कांद्याचे दर, कांद्याचे उत्पादन आणि आता कांद्याची आवक या पिकाबाबत सर्वकाही लहरीपणाचेच आहे. आहो खरंच असंच म्हणण्याची वेळ आली आहे. कारण एकाच दिवशी (Solapur) सोलापूरातील सिध्देश्वर कृषी उत्पन्न बाजार पेठेत तब्बल 1 हजार 54 ट्रकमधून 1 लाख 5 हजार 400 क्विंटल कांद्याची आवक झाली आहे. राज्यात एवढ्या मोठ्या प्रमाणात आवक होणारी ही पहिलीच बाजार समिती असल्याचे सांगितले जात आहे. लासलगाव कांद्यासाठी मुख्य बाजारपेठ मानली जात असली तरी त्याचेही रेकॉर्ड सोलापूरच्या सिध्देश्वर कृषी उत्पन्न बाजार समितीने मोडीत काढले आहेत. त्यामुळे बाजार समितीच्या आवारात ट्रकांच्या रांगा आणि बाजार समितीमध्ये कांदाच कांदा अशी अवस्था झाली आहे.

यामुळे वाढत आहे कांद्याची आवक

सध्या खरीप हंगामातील कांदा काढणीची कामे सुरु आहेत. कांदा हे साठवणूक करण्याचे पीक नाही म्हणून काढणी झाली की, बाजारपेठेत विक्री केले जाते. यातच बुधवारपासून सोलापूर येथील सिध्देश्वर कृषी उत्पन्न बाजार समितीमधील व्यवहार हे सिध्देश्वर यात्रेमुळे बंद राहणार आहेत तर दुसरीकडे अवकाळी पावसाचा धोका कायम असल्याने छाटणी झाली की कांदा बाजारपेठेत आणला जात आहे. या दोन कारणांमुळे विक्रमी आवक झाली आहे.

आतापर्यंक सर्वाधिक झालेली आवक

आतापर्यंत कांदा हा दरावरुन चर्चेत राहत होता. मात्र, सोलापूरमध्ये झालेल्य़ा विक्रमी आवक नंतर आता वेगळीच चर्चा रंगू लागली आहे. लासलगावच्या दोन बाजार समित्यांमध्ये 51 हजार क्विंटल, नाशिकमध्ये 3 हजार 200 तर पुणे बाजार समितीत 15 हजार 900 क्विंटल कांद्याची आवक झाली. लासलगाव बाजार समितीमध्ये आतापर्यंत एकाच दिवशी सर्वाधिक 45 हजार क्विंटल आवक झाली असून, सोलापूर बाजार समितीमध्ये एकाच दिवशी त्याच्या दुपटीपेक्षा अधिक आवक झाली आहे.

दोन वर्षापूर्वी दरही विक्रमी

सोलापूर येथील सिद्धेश्वर कृषी उत्पन्न बाजार समिती ही कांदा मार्केटसाठी प्रसिध्द आहे. या बाजारपेठेत मराठवाडा तसेच पश्चिम महाराष्ट्रातून कांद्याची आवक होत असते. सध्या खरीप हंगामातील कांद्याची आवक सुरु आहे. लाल कांदा मोठ्या प्रमाणात दाखल होत असून आतापर्यंत सरासरी 1700 रुपायांप्रमाणे दर मिळत होता. मात्र, आवक मोठ्या प्रमाणात झाल्याने आता दरात घट होणार मानले जात आहे. दोन वर्षांपूर्वी बाजार समितीत कांद्याला 20 हजार रुपये प्रतिक्विंटल इतका सर्वोच्च दर मिळाला होता, आता त्यानंतर आवकेतही बाजार समितीने विक्रम केला आहे.

संबंधित बातम्या :

Seed Production : हवामानातील बदलाचा परिणाम बिजोत्पादनावर, महाबीजकडून ‘या’ पर्यायाचा अवलंब

Rabi Season : ढगाळ वातावरणामुळे खर्चही वाढला अन् शेतकऱ्यांची चिंताही, काय आहे उपापयोजना?

Winter Season: थंडीमध्ये जनावरांना 5 आजारांचा धोका, काय आहे उपाययोजना?

Click on your DTH Provider to Add TV9 MARATHI