Seed Production : हवामानातील बदलाचा परिणाम बिजोत्पादनावर, महाबीजकडून ‘या’ पर्यायाचा अवलंब

हवामानातील बदलाचा परिणाम केवळ पिकांवरच झालेला नाही तर यामुळे आगामी हंगामातील बियाणांची समस्या देखील उद्भवणार आहे. आतापर्यंत बिजोत्पादन हे त्याच हंगामात घेतले जात होते. पण उत्पादनात घट झाल्याने महाबीज सारख्या कंपनीला देखील वेगळ्या पर्यायाची निवड करावी लागलेली आहे.

Seed Production : हवामानातील बदलाचा परिणाम बिजोत्पादनावर, महाबीजकडून 'या' पर्यायाचा अवलंब
सोयाबीन बिजोत्पादन
Follow us
| Updated on: Jan 11, 2022 | 11:04 AM

अकोला : हवामानातील बदलाचा परिणाम केवळ पिकांवरच झालेला नाही तर यामुळे आगामी हंगामातील बियाणांची समस्या देखील उद्भवणार आहे. आतापर्यंत (Seed Production) बिजोत्पादन हे त्याच हंगामात घेतले जात होते. पण उत्पादनात घट झाल्याने (Mahabij Company) महाबीज सारख्या कंपनीला देखील वेगळ्या पर्यायाची निवड करावी लागलेली आहे. म्हणूनच यंदा (Summer Season) उन्हाळी हंगामात बिजोत्पादन केले जात आहे. गेल्या अनेक दिवसांपासून याबाबत जनजागृती केल्यामुळे अखेर राज्यात 25 हजार हेक्टरावर बिजोत्पादनाचा कार्यक्रम राबविण्यात आलेला आहे.

कधी नव्हे ते उन्हाळी हंगामात बिजोत्पादन

पेरणीच्या दरम्यान बियाणांची कमतरता भासू नये यासाठी काही कंपन्या ह्या बिजोत्पादनाचा कार्यक्रम हाती घेतात. महाबीजकडूनही असा उपक्रम राबवला जातो. (Kharif Season) खरीप हंगामात पिकांचा झालेला पेरा याचा अंदाज बांधून बिजोत्पादन केले जाते. त्यामुळे बियाणांची कमतरता भासत नव्हती. पण वातावरणातील बदलाचा परिणाम बियाणांच्या उत्पादनावरही होत आहे. आगामी खरिपात बियाणांची कमतरता भासेल यामुळे प्रथमच उन्हाळी हंगामात बिजोत्पादन मोठ्या प्रमाणात घेतले जात आहे. त्यामुळे अतिवृष्टी आणि हवामानातील बदलाचा परिणाम केवळ त्या हंगामावरच नाही तर आगामी हंगामावरही झाला असल्याचे समोर आले आहे. त्यामुळेच उन्हाळी हंगामात तब्बल 25 हजार हेक्टरावर पेरा करण्यात आलेला आहे.

महाबिजकडून या वाणांची निवड

वाणांचा अभ्यास करुनच लागवड केली जाते. उन्हाळी हंगामासाठी 10 वर्षाच्या आतमधील वाणांची महाबिजने निवड केलेली आहे, यामध्ये प्रामुख्याने फुले संगम, फुले किमया, एमएयूएस 612, एमएयूएस 158, एमएयूएस 162, एमएयूएस 71, इत्यादी वाणांची निवड करण्यात आली आहे. गेल्या अनेक दिवसांपासून महाबिजने जनजागृती करुन शेतकऱ्यांना बिजोत्पादन घेण्याबाबत जनजागृती केली होती. शिवाय बिजोत्पादनाचे महत्व पटवून सांगून क्षेत्रात वाढ केली आहे. यंदा तब्बल 25 हजार हेक्टरावर बिजोत्पादनाचा कार्यक्रम हाती घेण्यात आला आहे. यामध्ये सर्वाधिक पेरा हा सोयाबीनचा आहे.

यामुळे घटतेय बियाणे

खरीप हंगामातील पिकांचा पेरा लक्षात घेऊनच बिजोत्पादनाचा कार्यक्रम हा राबवला जात असतो. मात्र, खरिपातील पिकांच्या उत्पादनावर यंदा वातावरण बदलाचा परिणाम झाला होता. त्यामुळे पिकांबरोबर बियाणांचे उत्पादनही घटले. आगामी खरीप हंगामात बियाणांची कमतरता भासू नये म्हणून महाबिजकडून उन्हाळी हंगामात बिजोत्पादन कार्यक्रम राबवला जात आहे. घटलेल्या बियाणांची कसर भरुन काढण्याचा महाबिजचा प्रयत्न आहे.

बिजोत्पादन केल्यावर शेतकऱ्यांना काय?

पायाभूत बियाण्यांची किंमत आणि प्रमाणित बियाणे उत्पादनासाठी शेतकऱ्यांना अनुदान दिले जाते. यामध्ये प्रत्यक्ष खर्चाच्या 100 टक्के किंवा कमी कमी 15 हजार रुपये प्रती हेक्टर इतके अनुदान शेतकऱ्यांना मिळते. त्यासाठी एका खातेदाराने कमाल 10 हेक्टर बिजोत्पादन क्षेत्रात बीजोत्पादन केले तर 1 लाख 50 हजार रुपये अनुदान हे योजनेअंतर्गत मिळते. बिजोत्पादक शेतकऱ्याला अनुदानाची मागणी ही संबंधित कृषी सहाय्यकाकडे करावी लागते. शिवाय आवश्यक कागदपत्रेही जोडावी लागणार आहेत. यामध्ये पायाभूत बियाणे खरेदी पावतीची मुळ प्रत. बीज प्रमाणीकरण यंत्रणे कडे शुल्क अदा केल्याच्या पावतीची मुळ प्रत, कृषी सहाय्यक यांचा प्रक्षेत्र पाहणी केलेला अहवाल जोडावा लागणार आहे.

संबंधित बातम्या :

Rabi Season : ढगाळ वातावरणामुळे खर्चही वाढला अन् शेतकऱ्यांची चिंताही, काय आहे उपापयोजना?

Winter Season: थंडीमध्ये जनावरांना 5 आजारांचा धोका, काय आहे उपाययोजना?

PM KISAN : 10 कोटी 50 लाख शेतकऱ्यांचा सन्मान, योजनेचा लाभ मिळाला नसेल तर असा अर्ज..!

Non Stop LIVE Update
2017 ला कुठे बैठक झाली? हे सांगू शकतो, मुंडेंचा पवारांबाबत गौप्यस्फोट
2017 ला कुठे बैठक झाली? हे सांगू शकतो, मुंडेंचा पवारांबाबत गौप्यस्फोट.
मतदान करावं म्हणून न्हाव्याची भन्नाट ऑफर, बोटावरची शाई दाखवा आणि...
मतदान करावं म्हणून न्हाव्याची भन्नाट ऑफर, बोटावरची शाई दाखवा आणि....
बूथवर मतदारांच्या रांगा अन् मतदान बंद ठेऊन कर्मचारी करतायत जेवण
बूथवर मतदारांच्या रांगा अन् मतदान बंद ठेऊन कर्मचारी करतायत जेवण.
म्हातार लय खडूस, तिजोरीची किल्ली कंबरेला.., शरद पवारांवर कुणाचा निशाणा
म्हातार लय खडूस, तिजोरीची किल्ली कंबरेला.., शरद पवारांवर कुणाचा निशाणा.
मतदारच नाही, मतदान केंद्र पडली ओस; मतदारांचा मतदानावर का बहिष्कार?
मतदारच नाही, मतदान केंद्र पडली ओस; मतदारांचा मतदानावर का बहिष्कार?.
हे मोदीकृत भाजपाचे षडयंत्र, EVM वर शंका व्यक्त करत राऊतांचा गंभीर आरोप
हे मोदीकृत भाजपाचे षडयंत्र, EVM वर शंका व्यक्त करत राऊतांचा गंभीर आरोप.
राणा दाम्पत्याची बुलेटस्वारी, किती मतांनी विजय? नवनीत राणा म्हणाल्या..
राणा दाम्पत्याची बुलेटस्वारी, किती मतांनी विजय? नवनीत राणा म्हणाल्या...
दुसऱ्या टप्प्यात अनोख्या मतदाराची चर्चा, थेट माकड कडेवर घेऊन केल मतदान
दुसऱ्या टप्प्यात अनोख्या मतदाराची चर्चा, थेट माकड कडेवर घेऊन केल मतदान.
पुन्हा मरायला तयार... मतदानासाठी निघालेले जरांगे पाटील काय म्हणाले?
पुन्हा मरायला तयार... मतदानासाठी निघालेले जरांगे पाटील काय म्हणाले?.
हातांची झोळी केली...सोपे नव्हते मला हरविणे म्हणून...तुपकरांचा हल्लाबोल
हातांची झोळी केली...सोपे नव्हते मला हरविणे म्हणून...तुपकरांचा हल्लाबोल.