Kharif : बीबीएफ पेरणी यंत्राचा फायदा काय? खरिपाच्या तोंडावर शेतकऱ्यांसाठी महत्वाची बातमी

अधिकतर शेतकऱ्यांकडे बैलचलित बळीराम नांगर आहेत.तसेच बैलचलित तिफण वापरून शेतकरी पेरणी करतात. या दोन अवजाराने सुध्दा रुंद वरंबा सरी पद्धतीसारखी पेरणी करता येते.पेरणीपूर्वी पाऊस पडल्यानंतर शेतात 4.5 फूट अंतरावर बळीराम नांगराने सरी काढाव्यात. सरी काढताना फाळ एक फूट रुंद ठेवावेत. जेणेकरून एक ते सव्वा फुटाची सरी निघेल. पेरणीयोग्य पाऊस झाल्यानंतर बळीराम नांगराने तयार झालेल्या वरंब्यावर पेरणी करावी.

Kharif : बीबीएफ पेरणी यंत्राचा फायदा काय? खरिपाच्या तोंडावर शेतकऱ्यांसाठी महत्वाची बातमी
Follow us
| Updated on: May 25, 2022 | 6:49 AM

लातूर : हंगाम रब्बी असो की (Kharif Season) खरीप उत्पादन वाढीसाठी शेतकऱ्यांनी (BBF Technology) बीबीएफ पेरणी यंत्राचा वापर वाढवण्यासाठी (Agricultural Department) कृषी विभाग शेतकऱ्यांच्या बांधावर जाऊन मार्गदर्शन करतो. शिवाय यामध्ये शेतकऱ्यांबरोबरच यंत्र चालकाचीही भूमिका महत्वाची असल्याने काही गावांमध्ये तर शिबिरेही घेतली जातात. पण नेमकी ही पेरणी यंत्र पध्दत आणि तिचे फायदे काय आहेत याची माहिती शेतकऱ्यांना झाली तर त्याचा वापरही वाढणार आहे. शिवाय निती आयोग व कृषी यांत्रिकीकरण योजनेतून ट्रॅक्टर असणाऱ्या शेतकऱ्यांना हे यंत्र दिले जाते. त्यामुळे बीबीएफचा नेमका फायदा काय याची माहिती शेतकऱ्यांना मिळणे तेवढेच महत्वाचे आहे.

बीबीएफ यंत्राद्वारे अशी होते पेरणी

*ट्रॅक्‍टरचलित चार फणी यंत्राच्या सांगाड्यावर दोन सरी नांगर बसवलेले आहेत. यंत्राच्या सांगाड्यावर एक पेटी बसविलेली आहे. त्या पेटीचे खत व बियाणासाठी दोन मुख्य भाग आहेत. या मुख्य भागाचे फणाच्या संख्येनुसार प्रत्येकी चार उपभाग केले आहेत. अशा प्रकारे यंत्राच्या प्रत्येक फणासाठी स्वतंत्र बियाणे व खतपेटी आहे. त्यामुळे आंतरपिकाची पेरणी करता येते.

*बियाणे पेरणीसाठी तिरपी प्लेट तर खत पेरणीसाठी उभी प्लेट बसविलेली आहे. यंत्रासोबत विविध पिकांच्या पेरणीसाठी स्वतंत्र प्लेट दिलेल्या आहेत. यंत्रामध्ये आवश्‍यकतेप्रमाणे खताचे प्रमाण कमी जास्त करता येते.

हे सुद्धा वाचा

*टोकण यंत्राने सोयाबीन, तूर, मका, भुईमूग, ज्वारी, मूग, उडीद, कपाशी, बाजरी, कांदा इत्यादी पिकांची पेरणी करता येते.

उपलब्ध अवजाराने रुंद वरंबा सरी पद्धतीने पेरणी

अधिकतर शेतकऱ्यांकडे बैलचलित बळीराम नांगर आहेत.तसेच बैलचलित तिफण वापरून शेतकरी पेरणी करतात. या दोन अवजाराने सुध्दा रुंद वरंबा सरी पद्धतीसारखी पेरणी करता येते.पेरणीपूर्वी पाऊस पडल्यानंतर शेतात 4.5 फूट अंतरावर बळीराम नांगराने सरी काढाव्यात. सरी काढताना फाळ एक फूट रुंद ठेवावेत. जेणेकरून एक ते सव्वा फुटाची सरी निघेल. पेरणीयोग्य पाऊस झाल्यानंतर बळीराम नांगराने तयार झालेल्या वरंब्यावर पेरणी करावी.

रुंद वरंबा सरी टोकण यंत्राचे फायदे

यंत्राच्या साहाय्याने हव्या त्या रुंदीचे वरंबे आणि सऱ्या तयार करता येतात. रुंद वरंबे तयार करत असताना त्यावर बियाण्यांची टोकण करता येते. आंतर पीक पद्धतीनुसार दोन पिके एकाच वेळी घेता येतात. दोन फणांतील तसेच दोन रोपातील अंतर पिकानुसार बदलता येते. ठरावीक अंतरावर आणि खोलीवर बियाणांची टोकण होत असल्याने बियाणे बचत व उगवण चांगली होते. विरळणीची आवश्‍यकता नाही.

Non Stop LIVE Update
2017 ला कुठे बैठक झाली? हे सांगू शकतो, मुंडेंचा पवारांबाबत गौप्यस्फोट
2017 ला कुठे बैठक झाली? हे सांगू शकतो, मुंडेंचा पवारांबाबत गौप्यस्फोट.
मतदान करावं म्हणून न्हाव्याची भन्नाट ऑफर, बोटावरची शाई दाखवा आणि...
मतदान करावं म्हणून न्हाव्याची भन्नाट ऑफर, बोटावरची शाई दाखवा आणि....
बूथवर मतदारांच्या रांगा अन् मतदान बंद ठेऊन कर्मचारी करतायत जेवण
बूथवर मतदारांच्या रांगा अन् मतदान बंद ठेऊन कर्मचारी करतायत जेवण.
म्हातार लय खडूस, तिजोरीची किल्ली कंबरेला.., शरद पवारांवर कुणाचा निशाणा
म्हातार लय खडूस, तिजोरीची किल्ली कंबरेला.., शरद पवारांवर कुणाचा निशाणा.
मतदारच नाही, मतदान केंद्र पडली ओस; मतदारांचा मतदानावर का बहिष्कार?
मतदारच नाही, मतदान केंद्र पडली ओस; मतदारांचा मतदानावर का बहिष्कार?.
हे मोदीकृत भाजपाचे षडयंत्र, EVM वर शंका व्यक्त करत राऊतांचा गंभीर आरोप
हे मोदीकृत भाजपाचे षडयंत्र, EVM वर शंका व्यक्त करत राऊतांचा गंभीर आरोप.
राणा दाम्पत्याची बुलेटस्वारी, किती मतांनी विजय? नवनीत राणा म्हणाल्या..
राणा दाम्पत्याची बुलेटस्वारी, किती मतांनी विजय? नवनीत राणा म्हणाल्या...
दुसऱ्या टप्प्यात अनोख्या मतदाराची चर्चा, थेट माकड कडेवर घेऊन केल मतदान
दुसऱ्या टप्प्यात अनोख्या मतदाराची चर्चा, थेट माकड कडेवर घेऊन केल मतदान.
पुन्हा मरायला तयार... मतदानासाठी निघालेले जरांगे पाटील काय म्हणाले?
पुन्हा मरायला तयार... मतदानासाठी निघालेले जरांगे पाटील काय म्हणाले?.
हातांची झोळी केली...सोपे नव्हते मला हरविणे म्हणून...तुपकरांचा हल्लाबोल
हातांची झोळी केली...सोपे नव्हते मला हरविणे म्हणून...तुपकरांचा हल्लाबोल.