AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

cotton rate : कापसाच्या दरात घसरणीची काय आहे चीन कनेक्शन?

चीनमध्ये कोरोनाचा कहर कमी झाला नाही. यामुळे केंद्र सरकारने चीनमध्ये कापसाची निर्यात करण्यास बंदी घातली आहे. त्यामुळे स्थानिक बाजारपेठेतही कापसाचे दर गडगडले आहेत. गेल्या १५ दिवसांत त्याची किंमत १५०० ते २००० रुपयांपर्यंत घसरली आहे.

cotton rate : कापसाच्या दरात घसरणीची काय आहे चीन कनेक्शन?
कापसावर संकटImage Credit source: सोशल मीडिया
| Updated on: Jan 11, 2023 | 12:15 PM
Share

मुंबई : cotton rate : शेतकरी आणि बाजारभाव यांच गणित नेहमी जुळत नसतं. शेतकऱ्यांचा माल बाजारात येतो तेव्हा दर पडलेले असतात. शेतकऱ्यांचा शेतमाल विकला गेला असताना बाजारात चढे दर असतात. याचा फायदा व्यापाऱ्यांना अधिक होत असतो. आता कापूस उत्पादक शेतकरी अडचणीत आलंय. शेतकऱ्यांचा कापूस बाजारात येण्यापुर्वी दहा हजार क्विंटलचा दर होता.आता हा दर सात ते आठ हजारांवर आलाय.

का घसरताय कापसाचे दर :  चीनमध्ये कोरोनाचा कहर कमी झाला नाही. यामुळे केंद्र सरकारने चीनमध्ये कापसाची निर्यात करण्यास बंदी घातली आहे. त्यामुळे स्थानिक बाजारपेठेतही कापसाचे दर गडगडले आहेत. गेल्या १५ दिवसांत त्याची किंमत १५०० ते २००० रुपयांपर्यंत घसरली आहे. त्यामुळे शेतकऱ्यांची चिंता वाढली आहे. चीनमध्ये कोरोना रुग्णांची संख्या वाढल्याने केंद्र सरकारने चीनमधून होणाऱ्या निर्यातीवर बंदी घातली आहे. बड्या व्यापाऱ्यांनी आधीच खरेदी केलेला कापूस त्यांच्याकडे पडून आहे. आता तर छोट्या व्यापाऱ्यांनीही कापूस खरेदी बंद केली आहे. त्याचा परिणाम आता स्थानिक बाजारपेठेवरही दिसून येत आहे. त्यामुळे कापसाचे भावात घसरण झालीय.

यंदा उत्पादन कमी पण दर जास्त :  अतिवृष्टी आणि अवकाळी पावसामुळे कापूस पिकाचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले. त्यामुळे कापसाच्या उत्पादनात लक्षणीय घट झाली. यामुळे कापसाल चांगला भाव मिळण्याची अपेक्षा शेतकऱ्यांना होती. मागील वर्षी १२ हजारांपर्यंत कापसाचे दर होते. यंदा ते सात ते आठ हजारांवर आहे. शेतकऱ्यांना बियाणे, खते, औषधे, तण काढणी व कापूस वेचणीसाठी मोठा खर्च करावा लागतो. परंतु त्या तुलनेत दर मिळत नसल्याने शेतकऱ्यांचा उत्पादन खर्चही निघणे अवघड झाले आहे.

T20 विश्वचषक स्पर्धेतून मोठी बातमी; 'हा' संघ थेट बाहेर
T20 विश्वचषक स्पर्धेतून मोठी बातमी; 'हा' संघ थेट बाहेर.
एकाच वेळी 7 घरांमध्ये चोरी; लाखोंची रक्कम लंपास
एकाच वेळी 7 घरांमध्ये चोरी; लाखोंची रक्कम लंपास.
मुंबईच्या महापौरपदाचा मान महिलेला मिळताच भाजपची पहिली प्रतिक्रिया
मुंबईच्या महापौरपदाचा मान महिलेला मिळताच भाजपची पहिली प्रतिक्रिया.
महापौर आरक्षण सोडतीवरून ठाकरे गट नाराज, मिसाळ यांनी सांगितले नियम
महापौर आरक्षण सोडतीवरून ठाकरे गट नाराज, मिसाळ यांनी सांगितले नियम.
ST प्रवर्गाच्या चिठ्ठ्या का टाकल्या नाहीत? पेडणेकरांचा सवाल
ST प्रवर्गाच्या चिठ्ठ्या का टाकल्या नाहीत? पेडणेकरांचा सवाल.
महापौरपदाच्या आरक्षणाने इच्छुकांच्या आशांवर पाणी; पुण्यात मोठा ट्विस्ट
महापौरपदाच्या आरक्षणाने इच्छुकांच्या आशांवर पाणी; पुण्यात मोठा ट्विस्ट.
मुंबईत आवाज भाजपचाच... खुल्या प्रवर्गातील महिलांसाठी महापौरपद राखीव
मुंबईत आवाज भाजपचाच... खुल्या प्रवर्गातील महिलांसाठी महापौरपद राखीव.
29 महापालिकांच्या महापौरपदासाठी आरक्षण सोडत निघाली आहे
29 महापालिकांच्या महापौरपदासाठी आरक्षण सोडत निघाली आहे.
छत्रपती संभाजीनगरमध्ये भाजप–शिंदे सेनेची युती 24 तासांतच कोसळली?
छत्रपती संभाजीनगरमध्ये भाजप–शिंदे सेनेची युती 24 तासांतच कोसळली?.
ठाकरे बंधूंच्या मनोमिलनात पहिला मीठाचा खडा, कल्याण-डोंबिवलीतच सुरुंग
ठाकरे बंधूंच्या मनोमिलनात पहिला मीठाचा खडा, कल्याण-डोंबिवलीतच सुरुंग.