AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

गोष्ट पडद्यामागची : राज्य सरकारचा मदतनिधी बॅंकेत, खात्यावर येण्यास का होतोय विलंब ?

ग्रामीण भागात गेल्या चार दिवसांपासून एकच चर्चा आहे ती नुकसान भरपाई रक्कम खात्यावर जमा झाली की नाही. एकीकडे राज्य सरकारकडून नुकसानभरपाईच्या अनुशंगाने रक्कम अदा केल्याचे सांगण्यात येत आहे तर दुसरीकडे बुधवारपर्यंतही ही रक्कम शेतकऱ्यांच्या प्रत्यक्ष खात्यावर जमा झालेली नव्हती.

गोष्ट पडद्यामागची : राज्य सरकारचा मदतनिधी बॅंकेत, खात्यावर येण्यास का होतोय विलंब ?
संग्रहीत छायाचित्र
| Updated on: Nov 03, 2021 | 12:56 PM
Share

राजेंद्र खराडे : लातूर : ग्रामीण भागात गेल्या चार दिवसांपासून एकच चर्चा आहे ती नुकसान भरपाई रक्कम खात्यावर जमा झाली की नाही. एकीकडे राज्य (State Gocernment) सरकारकडून नुकसानभरपाईच्या ( Compensation) अनुशंगाने रक्कम अदा केल्याचे सांगण्यात येत आहे तर दुसरीकडे बुधवारपर्यंतही ही रक्कम शेतकऱ्यांच्या प्रत्यक्ष खात्यावर जमा झालेली नव्हती. त्यामुळे राज्य सरकारने अदा केलेली रक्कम शेतकऱ्यांच्या खात्यावर जमा होत असताना नेमकी काय प्रक्रिया होते हे पाहणे महत्वाचे ठरणार आहे.

अतिवृष्टीने खरिपातील पिकांचे नुकसान झाल्याने राज्य सरकारने 10 हजार कोटी रुपयांच्या मदतीचे पॅकेज जाहीर केले होते. शिवाय ही मदत दिवाळीपूर्वी शेतकऱ्यांना मिळणार असल्याचा दावाही करण्यात आला होता. त्यानुसार 75 टक्के रक्कम ही अदा केली आहे पण अद्यापही काही शेतकऱ्यांच्या खात्यावर ही रक्कम जमा झालेली नाही. राज्य सरकारने जमा केलेले पैसे नेमके आहेत तरी कुठे हे आम्ही तुम्हाला सांगणार आहोत.

राज्य सरकारने मदतनिधी जमा केला म्हणजे काय?

राज्य सरकारच्या मदतीमुळे ‘शेतकऱ्यांची दिवाळी होणार गोड’ हे फक्त ऐकायला बरं वाटत. राज्य सरकार जनतेची सहानभुती मिळवण्यासाठी मदत केल्याची घोषणा करीत असले तरी यामागे मोठी प्रक्रिया असल्याने सरकारने जाहीर केलेली मदत थेट शेतकऱ्यांच्या खात्यावर येण्यास किमान चार ते पाच दिवसाचा कालावधी लागतो. नुकसानभरपाईची मदत जाहीर होते म्हणजे राज्य सरकार हे त्यांच्या मुख्य बॅंकेत मदतीचे पैसे वर्ग करते. त्यानंतर त्या मुख्य बॅंकेतून राज्यातील शेतकऱ्यांची ज्या बॅंकेत खाती आहेत त्या बॅंकेमध्ये ठरवून दिल्यानुसार रक्कम अदा केली जाते. मात्र, हे करताना शेतकऱ्यांची यादी, खाते क्रमांक, नाव, बॅंकेचे नाव, रक्कम याची तपासणी करावी लागते. त्यामुळे सरकारने रक्कम जाहीर केली, नुकसानीची रक्कम अदा केली तरी त्यानंतरच्या प्रक्रियेला किमान चार ते पाच दिवसाचा कालावधी लागतो. म्हणूनच घोषणा करुन चार दिवस उलटले तरी प्रत्यक्षात अद्यापही मदतनिधी हा शेतकऱ्यांच्या खात्यावर जमा झालेला नाही.

‘बॅच पोस्टींग’ प्रक्रिया म्हणजे काय?

सरकारची जी बॅंक आहे त्या बॅंकेतील ही नुकसानभरपाईची मदतनिधी आहे तो शेतकऱ्यांची खाते असलेल्या सर्व बॅंकेत वर्ग करणे म्हणजेच बॅंक पोस्टींग होय. या दरम्यान, सराकरकडून संबंधित बॅंकेकडे रक्कम आणि शेतकऱ्यांची यादी ही सपूर्द केली जाते. त्यानंतर शेतकऱ्याची सर्व माहिती ही बरोबर आहे का नाही हे तपासून त्या-त्या बॅंकेत शेतकऱ्यांची एक संख्या ठरवून हे पैसे जमा केले जातात. यामध्ये काही चुकीचे झाले तर पैसे वर्ग होत नाहीत. जोपर्यत काय चुकले आहे याचा शोध लागत नाही तोपर्यंत पैसे हे वर्ग होत नाहीत. या तपासणीला आणि पैसे जमा करण्यास तीन ते चार दिवसाचा कालावधी लागतो. त्यामुळे प्रत्यक्ष मदत शेतकऱ्यांच्या पदरी पडण्यास विलंब होत आहे.

मराठवाड्यात 47 लाख शेतकऱ्यांच्या खात्यावर होणार मदत जमा

अतिवृष्टीने मराठवाड्यातील खरीप पिकाचे मोठ्या प्रमाणात नुकसान केले होते. पिकांचेच नाही तर शेतकऱ्यांची शेतजमिनही खरडून गेली होती. त्यामुळे या विभागातील तब्बल 47 लाख शेतकऱ्यांना या नुकसानभरपाईचा लाभ मिळणार आहे. मराठवाड्यातील 36 लाख 62 हजार हेक्टरावरील पिकाचे नुकसान झाले होते. राज्य सरकारने 10 हजार कोटी रुपयांचे पॅकेजची घोषणा केली असली तरी पहिल्या टप्प्यात 75 टक्केच रक्कम देण्यात आली आहे. शिवाय ही रक्कमही प्रक्रियेत असल्याने अजूनही प्रत्यक्षात शेतकऱ्यांच्या खात्यावर पैसे जमा झालेले नाहीत.

संबंधित बातम्या :

‘पांढऱ्या सोन्या’च्या खरेदीसाठी परराज्यातील व्यापारी खानदेशात

खरीपातील पिकांना ढगाळ वातावरणाचा धोका, शेतकऱ्यांसाठी काय आहे कृषितज्ञांचा सल्ला ?

अनुदानित बियाणे विक्रेत्यांकडे उपलब्ध, या कागदपत्रांची पूर्तता करा अन् बियाणे घ्या..!

रूपाली ठोंबरेंकडून बाळासाहेब अन् पवारांसोबत फोटो शेअर, चर्चांना उधाण
रूपाली ठोंबरेंकडून बाळासाहेब अन् पवारांसोबत फोटो शेअर, चर्चांना उधाण.
मुंबईत भाजपच्या महापौरामुळं कॉलर टाईट होणार! लोढांचं मोठं वक्तव्य काय?
मुंबईत भाजपच्या महापौरामुळं कॉलर टाईट होणार! लोढांचं मोठं वक्तव्य काय?.
चैत्यभूमीवर जनसागर... बाबासाहेबांच्या महापरिनिर्वाण दिनी मोठी गर्दी
चैत्यभूमीवर जनसागर... बाबासाहेबांच्या महापरिनिर्वाण दिनी मोठी गर्दी.
डॉ. आंबेडकरांना राज्यपाल, मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्र्यांकडून आदरांजली
डॉ. आंबेडकरांना राज्यपाल, मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्र्यांकडून आदरांजली.
बहरीनमध्ये जय पवार यांची हळदी, बघा दिमाखदार सोहळ्याचे फोटो
बहरीनमध्ये जय पवार यांची हळदी, बघा दिमाखदार सोहळ्याचे फोटो.
पार्थ पवारांच्या कंपनीचा 42 कोटी भरण्यास नकार, बावनकुळेंनी ठणकावलं
पार्थ पवारांच्या कंपनीचा 42 कोटी भरण्यास नकार, बावनकुळेंनी ठणकावलं.
रविंद्र चव्हाणांकडून समझोता, पण निलेश राणे तयार नाही!
रविंद्र चव्हाणांकडून समझोता, पण निलेश राणे तयार नाही!.
महायुतीतील मतभेद दूर, आगामी निवडणुका एकत्र लढणार! बघा कोण काय म्हणालं?
महायुतीतील मतभेद दूर, आगामी निवडणुका एकत्र लढणार! बघा कोण काय म्हणालं?.
राणीच्या बागेतील दोन्ही वाघांचा मृत्यू, कारण लपवण्याचं कारण काय?
राणीच्या बागेतील दोन्ही वाघांचा मृत्यू, कारण लपवण्याचं कारण काय?.
'अडीच वर्षाचा स्पीड ब्रेकर सोडला, तर गेल्या 11 वर्षात प्रगतीचं...'
'अडीच वर्षाचा स्पीड ब्रेकर सोडला, तर गेल्या 11 वर्षात प्रगतीचं...'.