AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

Onion Rate : कांदा दराचा वांदा मिटणार! कांदा उत्पादक शेतकरी संघटनेची काय आहे रणनिती?

कांद्याचे दर हे अनिश्चित असले तरी उत्पादनासाठी मात्र, खर्च हा अनिवार्य आहे. शिवाय आतापर्यंत कांदा दराचा लहरीपणा शेतकऱ्यांच्याच अंगलट आला आहे. यंदाही खरिपातील कांद्याची आवक सुरु असताना सरासरीप्रमाणे दर मिळाला पण उन्हाळी कांद्याची आवक सुरु होताच दर कवडीमोल झाले आहेत. त्यामुळे दुहेरी संकटात सापडलेल्या कांदा उत्पादक शेतकऱ्यांना दिलासा देण्यासाठी आता कांदा उत्पादक शेतकरी संघटनाच मैदानात उतरली आहे.

Onion Rate : कांदा दराचा वांदा मिटणार!  कांदा उत्पादक शेतकरी संघटनेची काय आहे रणनिती?
कांदा दराच्या बाबतीत कांदा उत्पादक संघटनेच्या माध्यमातून शेतकऱ्यांशी संवाद साधला जात आहे.Image Credit source: TV9 Marathi
| Edited By: | Updated on: Apr 12, 2022 | 2:48 PM
Share

लासलगाव : (Onion Rate) कांद्याचे दर हे अनिश्चित असले तरी उत्पादनासाठी मात्र, खर्च हा अनिवार्य आहे. शिवाय आतापर्यंत कांदा दराचा लहरीपणा शेतकऱ्यांच्याच अंगलट आला आहे. यंदाही खरिपातील कांद्याची आवक सुरु असताना सरासरीप्रमाणे दर मिळाला पण (Summer Crop) उन्हाळी कांद्याची आवक सुरु होताच दर कवडीमोल झाले आहेत. त्यामुळे दुहेरी संकटात सापडलेल्या (Onion Production) कांदा उत्पादक शेतकऱ्यांना दिलासा देण्यासाठी आता कांदा उत्पादक शेतकरी संघटनाच मैदानात उतरली आहे. केवळ घोषणाच नाही तर अंमलबजावणीसाठी बाजार समितीमध्ये दाखल झालेल्या शेतकऱ्यांशी संवाद साधून दरात कशी सुधारणा केली जाईल याबाबत मत जाणून घेतले जात आहे. कांदा दराला घेऊन शेतकऱ्यांच्या मनात काय आहे हे जाणून घेण्याचा प्रयत्न संघटनेच्या माध्यमातून केला जात आहे.

शेतकऱ्यांसह बाजार समिती प्रशासनाशीही संवाद

कांद्याला किमान दर मिळावा यासाठी कांदा उत्पादक संघटनेकडून लोक चळवळ उभा केली जात आहे. लासलगाव कृषी उत्पन्न बाजार समिती ही कांदा मार्केटसाठी अशिया खंडात पहिल्या क्रमांकावर आहे. त्यामुळे कांद्याला किमान दर मिळवून देण्याचा लढा येथूनच सुरु करण्यात आला आहे. त्याच अनुशंगाने त महाराष्ट्र राज्य कांदा उत्पादक संघटनेचे अध्यक्ष भारत दिघोळे यांनी लासलगाव कृषी उत्पन्न बाजार समितीत भेट देऊन बाजार समिती प्रशासन,व्यापारी, शेतकऱ्यांची संवाद साधत कांदा भावात कशी सुधारणा करता येईल याबाबत चर्चा केली आहे.

कांदा दराचे धोरण नेमके असावे तरी कसे?

कांदा दरातील अनियमिततेचा फटका ग्राहकांपेक्षा शेतकऱ्यांनाच बसत आहे. एकीकडे उत्पादन खर्चात वाढ आणि दुसरीकडे दरात घट अशा दुहेरी संकटात शेतकरी आहे. त्यामुळे कांदा उत्पादक शेतकरी दुहेरी संकटात सापडला असून दुसऱ्या बाजूला लोडशेडिंग चालू झाले असून त्यामुळे कांद्याचे पीक शेतातच जळून चालले असून दिवसेंदिवस बाजार समितीत कांद्याचे बाजार भाव कमी होत असल्याने कांदा उत्पादक शेतकऱ्यांचा उत्पादन खर्चही भरून निघत नसल्याने शेतकऱ्याचे यामध्ये मोठ्या प्रमाणात नुकसान होत आहे. कांद्याला उत्पादन खर्च पेक्षा जास्त दर कसे देता येतील याबाबत चर्चा झाली करण्यात आली आहे. कांदा उत्पादक शेतकरी संघटना आणि बाजार समिती प्रशासनाच्या बैठकीनंतर संघटनेने घेतलेल्या विषयाला योग्य दिशा मिळेल असा आशावाद आहे.

लासलगाव बाजार समितीच्या दरावर सर्वकाही अवलंबून

लासलगाव कृषी उत्पन्न बाजार समिती ही कांदा मार्केटसाठी प्रसिध्द आहे. देशातच नव्हे तर अशिया खंडात सर्वाधिक कांद्याची उलाढाल ही याच बाजार समितीमध्ये होते. शिवाय येथील दरावरच अन्य बाजारपेठांचे दर हे ठरले जातात. त्यामुळे या बाजार समितीने पुढाकार घेऊन कांद्याचे बाजार भाव वाढवून द्यावे याबाबत बाजार समितीला महाराष्ट्र राज्य कांदा उत्पादक संघटनेच्या वतीने निवेदन देण्यात आले असल्याची प्रतिक्रिया भारत दिघोळे यांनी दिली आहे. गेल्या अनेक वर्षापासून कांद्याचे दर एका रात्रीतून कमी जास्त होतात. यावर आता काही तरी तोडगा काढला जाणार आहे.

संंबंधित बातम्या :

Prices of Pulses : डाळींचे दर शंभरीपार, उत्पादनात घट त्यात महागाईचा तडका

Sugarcane Sludge : ऊस फडातच, गाळप बंद, सांगलीत साखर आयुक्तांच्या आदेशालाही केराची टोपली

Nanded : नांदेडमध्ये जनावरांचे सहा गोठे आगीच्या भक्ष्यस्थानी, शेतकऱ्यांच्या काळजाचं पाणी-पाणी, आता रोजीरोटीचा प्रश्न

मुंबईचा महापौर उत्तर भारतीय होणार, सुनील शुक्ला यांचा दावा
मुंबईचा महापौर उत्तर भारतीय होणार, सुनील शुक्ला यांचा दावा.
दोन्ही राष्ट्रवादी एकत्र आली तर काँग्रेस स्वबळावर लढेल - वडेट्टीवार
दोन्ही राष्ट्रवादी एकत्र आली तर काँग्रेस स्वबळावर लढेल - वडेट्टीवार.
काँग्रेसमध्ये आलो तरी शरद पवार कायम श्रद्धास्थानी - प्रशांत जगताप
काँग्रेसमध्ये आलो तरी शरद पवार कायम श्रद्धास्थानी - प्रशांत जगताप.
जळगाव महापालिकेत प्रतिनिधीत्व द्या, बारा बुलतेदार महासंघाची मागणी
जळगाव महापालिकेत प्रतिनिधीत्व द्या, बारा बुलतेदार महासंघाची मागणी.
याक्षणी आम्ही मुंबई पालिकेत 115 जागा जिंकत आहोत, संजय राऊत यांचा दावा
याक्षणी आम्ही मुंबई पालिकेत 115 जागा जिंकत आहोत, संजय राऊत यांचा दावा.
पुण्यात दोन्ही राष्ट्रवादीची युती होणार की नाही? काकडे काय म्हणाले
पुण्यात दोन्ही राष्ट्रवादीची युती होणार की नाही? काकडे काय म्हणाले.
माझ्या कार्यकर्त्याकडे कोणी वाकडी मान.....सत्यजीत कदम यांचा इशारा
माझ्या कार्यकर्त्याकडे कोणी वाकडी मान.....सत्यजीत कदम यांचा इशारा.
सटोगे तो बचोगे वरना बटोगे तो पिटोगे , शिवसेना भवनासमोर बॅनरबाजी
सटोगे तो बचोगे वरना बटोगे तो पिटोगे , शिवसेना भवनासमोर बॅनरबाजी.
अमोल कोल्हे-अजित पवारांची भेट, राजकीय वर्तुळात चर्चांना उधाण
अमोल कोल्हे-अजित पवारांची भेट, राजकीय वर्तुळात चर्चांना उधाण.
मुंबईत हवेचा दर्जा खालावला, AQI थेट 195 वर
मुंबईत हवेचा दर्जा खालावला, AQI थेट 195 वर.