Car : महिंद्राच्या या कारवर मिळतेय तब्बल 2.2 लाखांची सूट… स्कॉर्पियो, बोलेरा अन्‌ एक्सयुव्ही 300 वरही ऑफर

जर तुम्ही देखील नवीन एसयुव्ही खरेदी करण्याच्या विचारात असाल तर, ही तुमच्यासाठी एक चांगली संधी ठरु शकते. महिंद्रा आपल्या ग्राहकांना 2.2 लाख रुपयांपर्यंतची कॅश डिस्काउंट ऑफर करत आहे.

Car : महिंद्राच्या या कारवर मिळतेय तब्बल 2.2 लाखांची सूट... स्कॉर्पियो, बोलेरा अन्‌ एक्सयुव्ही 300 वरही ऑफर
Mahindra Scorpio-N
Image Credit source: Facebook
टीव्ही 9 मराठी डिजीटल टीम

| Edited By: राजेंद्र खराडे

Jul 18, 2022 | 1:57 PM

मुंबई : भारतीय एसयुव्ही स्पेशलिस्ट ब्रँड महिंद्राच्या (Mahindra car) अनेक कार्सना सध्या ग्राहकांकडून मागणी वाढली आहे. महिंद्रा एक्सयुव्ही 300, बोलेरो आणि स्कॉर्पियोसारख्या (Scorpio) कार्स सर्वाधिक विक्री होणार्या एक्सयुव्ही कारच्या यादीमध्ये सहभागी आहेत. कंपनी जास्तीत जास्त ग्राहकांना आपल्याकडे आकर्षित करण्यासाठी भरघोस डिस्काउंट ऑफर करत आहे. ही बंपर सूट जुलैसाठी लागू करण्यात आली आहे. जर तुम्ही देखील नवीन एसयुव्ही (XUV) खरेदी करण्याच्या विचारात असाल तर, ही तुमच्यासाठी एक चांगली संधी ठरु शकते. महिंद्रा आपल्या ग्राहकांना 2.2 लाख रुपयांपर्यंतची कॅश डिस्काउंट ऑफर करत आहे. महिंद्राच्या डिस्काउंट ऑफरमध्ये स्कॉर्पियो, एक्सयुव्ही 300, मराजो, अल्टुरस जी4 सारख्या कार्सचा समावेश आहे.

बोलेरो

महिेंद्रा बोलेरो कारच्या खरेदीवर ग्राहकांना कॅशबॅक ऑफर मिळत नसली तरी बोलेरोच्या खरेदीने ग्राहकांना 7,500 रुपये किमतीची ॲक्सेसरीज फ्रीमध्ये मिळत आहे. या शिवाय ग्राहकांना 10 हजार रुपयांचा एक्सचेंज बोनस आणि 3 हजार रुपये कार्पोरेट डिस्काउंट मिळत आहे. बोलेरो नियोवर 15000 रुपये एक्सजेंच बोनस आणि 4 हजार रुपये कॉर्पोरेट डिस्काउंट शिवाय कुठलाही अन्य डिस्काउंट मिळत नाही.

एक्सयुव्ही 300

यावर ग्राहकांना 23 हजार रुपयांपर्यंतचा कॅश डिस्काउंट मिळत आहे. याशिवाय 25 हजार रुपये एक्सचेंज बोनस आणि 4 हजार रुपयांपर्यंतचा कॉर्पोरेट डिस्काउंटदेखील मिळत आहे. महिंद्रा मराजोच्या खरेदीवर 20 हजार रुपयांचा कॅशबॅक डिस्काउंट मिळत आहे. तर एक्सचेंज बोनसच्या स्वरुपात 15 हजार रुपये आणि कॉर्पोरेट डिस्काउंटच्या स्वरुपात 5,200 रुपयांचा फायदा मिळू शकतो.

स्कॉर्पियो

या कारच्या खरेदीवर तब्बल 1,40,000 रुपयांचा सरळ कॅश डिस्काउंट मिळत आहे. यात 20 हजार रुपये किंमतीच्या ॲक्सेसरीज देखील मोफत मिळत आहे. या शिवाय 10 हजार रुपयांचा एक्सचेंज बोनस मिळत्र आहे. 4 हजार रुपयांचा कॉर्पोरेट डिस्काउंट देखील मिळतोय.

अल्टुरस जी4

या कारच्या खरेदीवर ग्राहकांना सर्वाधिक फायदा होत आहे. यावर ग्राहकांना 2,20,000 रुपयांचा कॅश डिस्काउंट मिळत आहे. एक्सचेंज बोनसच्या स्वरुपामध्ये 50 हजार रुपये आणि कॉर्पोरेट डिस्काउंट म्हणून 11500 रुपयांची सूट मिळत आहे. 20 हजार रुपयांपर्यंतच्या ॲक्सेसरीज मोफत मिळत आहेत.

Follow us on

Related Stories

Most Read Stories

Click on your DTH Provider to Add TV9 MARATHI

राज्य चुनें