AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

16GB रॅम आणि 320GB स्टोरेजसह Mercedes Benz S Class 2021 भारतात लाँच, किंमत…

मर्सिडीज बेंझ (Mercedes Benz) कंपनीने आज (17 जून) भारतात त्यांची फुल्ली लोडेड S क्लास 2021 (Mercedes Benz S Class 2021) ही सेडान कार लाँच केली आहे.

16GB रॅम आणि 320GB स्टोरेजसह Mercedes Benz S Class 2021 भारतात लाँच, किंमत...
Mercedes Benz S Class 2021
| Edited By: | Updated on: Jun 17, 2021 | 11:48 PM
Share

मुंबई : मर्सिडीज बेंझ (Mercedes Benz) कंपनीने आज (17 जून) भारतात त्यांची फुल्ली लोडेड S क्लास 2021 (Mercedes Benz S Class 2021) ही सेडान कार लाँच केली आहे. ही कार AMG लाईन ट्रेनवर आधारित असून या कारची किंमत भारतात 2.17 कोटी रुपये इतकी आहे. दुसरीकडे या कारच्या डिझेल व्हेरिएंटसाठी तुम्हाला 2.19 कोटी रुपये मोजावे लागतील. (2021 Mercedes-Benz S-Class Launched In India; Prices Start At Rs 2.17 Crore)

2021 एस क्लास ही कार लोवर ट्रिममध्येदेखील लाँच केली जाईल. परंतु अद्याप या कारची लाँचिंग डेट जाहीर झालेली नाही. एस क्लास 2020 ही कार गेल्या वर्षी सप्टेंबरमध्ये जागतिक बाजारात सादरर करण्यात आली होती. आता ही कार भारतात लाँच करण्यात आली आहे. मर्सिडीज एस क्लास मधील गाड्या नेहमीच खास ठरल्या आहेत. दरम्यान, सध्याच्या एसयूव्ही जमान्यातही या कारची क्रेझ खूप जास्त आहे.

एस-क्लास लॉन्च एडिशनमध्ये बरेच हायलाइट्स देण्यात आले आहेत. ही एक लक्झरी कार आहे जी थेट ऑडी A8 आणि बीएमडब्ल्यू 7 या गाड्यांशी स्पर्धा करेल. या वाहनात स्पोर्टी एएमजी लाईनचे एक्सटीरियर आणि इंटिरिअर्स मिळतात, जे 20 इंचाच्या एलॉयसह येतात. डोर हँडल्स अशा प्रकारे ब्लेंड केले गेले आहेत की ते थेट बॉडीशी जोडलेले दिसतात.

काय आहे खास?

एस क्लास S 400d इंजिनमध्ये 330hp ची पॉवर देण्यात आली आहे, जे 700Nm पीक टॉर्क देते. तर एस 450 पेट्रोल मोटर 367 hp आणि 500 Nm टॉर्क देतं. दोन्ही इंजिनमध्ये 9 जी ट्रोनिक ट्रान्समिशन सेटअप देण्यात आला आहे. एस क्लास 5 कलर ऑप्शन्समध्ये उपलब्ध आहे, ज्यामध्ये व्हाइट, ब्लॅक, ब्लू, रेड आणि ग्रीन या रंगांचा समावेश आहे. या गाडीच्या रंगांपेक्षा जास्त या गाडीचं डिझाईन आणि स्पेक्स ग्राहकांना आकर्षित करतील.

फीचर्स

2021 एस क्लासमध्ये 12.8 इंचाची मेन इन्फोटेन्मेंट सिस्टम देण्यात आली आहे. त्याच वेळी, यात 12.3 इंचाचा ड्रायव्हर डिस्प्ले देखील उपलब्ध आहे. अपडेटेड MBUX प्रणाली देखील देण्यात आली आहे. तसेच या कारमध्ये 320 जीबी स्टोरेज आणि 16 जीबी रॅम देखील मिळेल. यामध्ये दोन upholstery fits मिळतात ज्यामध्ये जिसमें Macchiato सीड आणि सिएन्ना ब्राउन नप्पा लेदरचा समावेश आहे.

या लक्झरी कारमध्ये 4D सराउंड सिस्टम, 64 कलर अॅक्टिव्ह अँबिएंट लायटिंग, मसाज सीट्स ज्या फ्रंट आणि रियरमध्ये मिळतात. तसेच प्रवाशासाठी यामध्ये लेग रेस्टही उपलब्ध आहे. यामध्ये सेंट्रल आर्मरेस्टवर टॅबलेटदेखील आहे. सध्या भारतात विक्रीसाठी कंपनीने या कारच्या 150 युनिट्सची निर्मिती केली आहे. या सर्व युनिट्सचं बुकिंग झालं आहे.

इतर बातम्या

‘या’ आहेत देशातील सर्वात स्वस्त 7 सीटर कार्स, मोठ्या कुटुंबासाठी बेस्ट पर्याय

सिंगल चार्जवर 220km रेंज, होंडाची Two-Door इलेक्ट्रिक स्पोर्ट्स कार लाँचिंगसाठी सज्ज, जाणून घ्या फीचर्स

Maruti Swift ला मागे टाकत ‘ही’ कार ठरली देशात नंबर वन, लॉकडाऊन असूनही रेकॉर्डब्रेक विक्री

(2021 Mercedes-Benz S-Class Launched In India; Prices Start At Rs 2.17 Crore)

BMC इज नॉट फॅमिली बिझनेस... भाजप नेत्याचा उद्धव ठाकरे यांना खोचक टोला
BMC इज नॉट फॅमिली बिझनेस... भाजप नेत्याचा उद्धव ठाकरे यांना खोचक टोला.
चुनाभट्टी येथे चैत्यभूमीकडे जाणाऱ्या आंबेडकर अनुयायांचा रास्ता रोको
चुनाभट्टी येथे चैत्यभूमीकडे जाणाऱ्या आंबेडकर अनुयायांचा रास्ता रोको.
तिन्ही पक्षाचा मालिक एक, अ‍ॅनाकोंडा गिळल्याशिवाय... ठाकरेंचा निशाणा
तिन्ही पक्षाचा मालिक एक, अ‍ॅनाकोंडा गिळल्याशिवाय... ठाकरेंचा निशाणा.
अमित ठाकरे यांच्या मेहुण्याच्या दिल्लीत विवाह, मोदींची सोहळ्याला हजेरी
अमित ठाकरे यांच्या मेहुण्याच्या दिल्लीत विवाह, मोदींची सोहळ्याला हजेरी.
जसं पार्थ पवारांना माफ केलं तसं तपोवनातील झाडांना...मनसेकडून थेट इशारा
जसं पार्थ पवारांना माफ केलं तसं तपोवनातील झाडांना...मनसेकडून थेट इशारा.
मालवणमध्ये फिरायला जाताय? सिंधुदुर्गात जाणाऱ्या जेटीची अवस्था बघा!
मालवणमध्ये फिरायला जाताय? सिंधुदुर्गात जाणाऱ्या जेटीची अवस्था बघा!.
नटरंगी नार.... रुपाली ठोंबरेंचा रोख कुणावर? कोणाचा घेतला खरपूस समाचार?
नटरंगी नार.... रुपाली ठोंबरेंचा रोख कुणावर? कोणाचा घेतला खरपूस समाचार?.
फडणवीसांचा दरिंदा, जल्लाद अन् गजनी उल्लेख, काँग्रेस नेता पुन्हा बरळला
फडणवीसांचा दरिंदा, जल्लाद अन् गजनी उल्लेख, काँग्रेस नेता पुन्हा बरळला.
इंदू मिल स्मारकाबाबत CM फडणवीसांची मोठी घोषणा, थेट सांगितली डेडलाईन
इंदू मिल स्मारकाबाबत CM फडणवीसांची मोठी घोषणा, थेट सांगितली डेडलाईन.
तपोवन वृक्षतोडीविरोधात मनसे नाशिककरांच्या सोबतीला, चित्रपट सेना आक्रमक
तपोवन वृक्षतोडीविरोधात मनसे नाशिककरांच्या सोबतीला, चित्रपट सेना आक्रमक.