AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

ऑल न्यू 2022 KTM RC 200 मोटारसायकल भारतात लाँच, जाणून घ्या नव्या बाईकची खासियत आणि किंमत

दीड महिन्यापेक्षा कमी वेळात केटीएमने जागतिक बाजारपेठेसाठी नवीन जनरेशन RC 125, RC 200 आणि RC 390 बाईक सादर केल्या. त्यानंतर आता कंपनीने नवीन RC 125 आणि RC 200 सोबत RC 390 भारतात लॉन्च केल्या आहेत.

ऑल न्यू 2022 KTM RC 200 मोटारसायकल भारतात लाँच, जाणून घ्या नव्या बाईकची खासियत आणि किंमत
KTM RC 200
| Edited By: | Updated on: Oct 13, 2021 | 6:50 PM
Share

मुंबई : दीड महिन्यापेक्षा कमी वेळात केटीएमने जागतिक बाजारपेठेसाठी नवीन जनरेशन RC 125, RC 200 आणि RC 390 बाईक सादर केल्या. त्यानंतर आता कंपनीने नवीन RC 125 आणि RC 200 सोबत RC 390 भारतात लॉन्च केल्या आहेत. ब्रँडने दिलेल्या माहितीनुसार, 2022 KTM RC सिरीजच्या डिझाईन आणि हार्डवेअरमध्ये अनेक बदल करण्यात आले आहेत. (2022 KTM RC 125, KTM RC 200 launched in India at starting price of Rs 1.8 lakhs)

2022 KTM RC 200 ची किंमत 2.09 लाख रुपये (एक्स-शोरूम) आहे आणि त्यामध्ये एक नवीन चेसिस, सुधारित एर्गोनॉमिक्स, अपडेटेड इलेक्ट्रॉनिक्स आणि जीपी-प्रेरित स्टाइल मिळते. काही उल्लेखनीय वैशिष्ट्यांमध्ये नवीन अॅडजस्टेबल हँडलबार, एलसीडी डॅश इन्स्ट्रुमेंट क्लस्टर देण्यात आले आहे. तसेच फ्यूल टँकची क्षमता 9.5 लीटर वरून 13.7 लीटर इतकी वाढवण्यात आली आहे. नवीन एलईडी हेडलॅम्प आणि मोठा एअरबॉक्स यांचा समावेश करण्यात आला आहे. स्प्लिट स्टील ट्रेलिस फ्रेम हलकी आणि कडक आहे. नवीन मोटरसायकलला सुपरमोटो एबीएस देखील मिळते.

चाके देखील पूर्वीपेक्षा अधिक पॉवरफुल आणि हलकी आहेत, तर नवीन बाईक 320 मिमी फ्रंट डिस्क आणि 230 मिमी बॅक डिस्क ब्रेकद्वारे कंट्रोल केली जाते. डिझाइनसाठी, नवीन फेअरिंग चांगल्या एरोडायनामिक्ससाठी कस्टमाइज केल्याचे कंपनीने म्हटले आहे.

2022 KTM RC 200 चे फीचर्स

मोटारसायकलचे इतर हाइलाइट्स म्हणजे कर्व्ड रेडिएटर, मजबूत फ्रंट एक्सल, अपडेटेड लेसर डिझाइनसह विंडस्क्रीन, फ्रंट ब्लिंकरसह इंटीग्रेटेड फ्रंट पोझिशन लॅम्प, अॅल्युमिनियम कास्ट आणि स्प्लिट पिलियन ग्रॅब आहे. इंडिया-स्पेक 2022 KTM RC 200 मध्ये इंटरनॅशनल व्हेरिएंटचे सर्व फीचर्स आणि ऑल न्यू एलईडी LED हेडलॅम्प सिस्टमचा समावेश आहे. नवीन जनरेशन KTM RC 200 ला WP Apex मोठा पिस्टन फ्रंट फोर्क आणि मागील बाजूस नवीन WP Apex शॉक अॅब्झॉर्बर मिळेल.

परफॉरमन्ससाठी, 199.5 सीसी सिंगल-सिलेंडर लिक्विड-कूल्ड फोर-स्ट्रोक फ्यूल-इंजेक्टेड इंजिन ट्विन ओव्हरहेड कॅमशाफ्टसह वापरले जाते. तसेच मोठ्या एअरबॉक्सचा दावा करण्यात आला आहे. 2022 KTM RC 200 आणि KTM RC 125 साठी बुकिंग अधिकृत KTM डीलरशिपवर सुरू झाली आहे आणि लवकरच शोरूममध्ये पोहोचण्यापूर्वी उत्पादन सुरू होईल. मोटारसायकलचे डाउन पेमेंट फक्त 25,000 रुपये इतके आहे. ग्राहक यावेळी विशेष फायनान्स स्कीमचा लाभ घेऊ शकतात.

इतर बातम्या

डुकाटीची शानदार सुपरस्पोर्ट 950 मोटारसायकल बाजारात, जाणून घ्या किंमत आणि फीचर्स

बहुप्रतीक्षित Tata Punch भारतात लाँच, 21000 रुपये देऊन बुक करा शानदार मायक्रो एसयूव्ही

MG Astor लाँचिंगसाठी सज्ज, जाणून घ्या कसा असेल कारचा लूक, किंमत आणि फीचर्स

(2022 KTM RC 125, KTM RC 200 launched in India at starting price of Rs 1.8 lakhs)

फोडाफोडीन नाराजी, वाक् युद्धानंतर आज शिंदे-रवींद्र चव्हाण एकाच मंचावर?
फोडाफोडीन नाराजी, वाक् युद्धानंतर आज शिंदे-रवींद्र चव्हाण एकाच मंचावर?.
फडणवीसांच्या इशाऱ्याने इतर पक्ष चालतात, कुणाच्या वक्तव्याची होते चर्चा
फडणवीसांच्या इशाऱ्याने इतर पक्ष चालतात, कुणाच्या वक्तव्याची होते चर्चा.
CM सह शिंदे दादांची महत्त्वाची बैठक; पक्षांतर्गत प्रवेशबंदीवर तोडगा?
CM सह शिंदे दादांची महत्त्वाची बैठक; पक्षांतर्गत प्रवेशबंदीवर तोडगा?.
इंडिगोच्या विस्कळीत सेवेविरोधात प्रवाशांना मनस्ताप, थेट कोर्टात याचिका
इंडिगोच्या विस्कळीत सेवेविरोधात प्रवाशांना मनस्ताप, थेट कोर्टात याचिका.
रूपाली ठोंबरेंकडून बाळासाहेब अन् पवारांसोबत फोटो शेअर, चर्चांना उधाण
रूपाली ठोंबरेंकडून बाळासाहेब अन् पवारांसोबत फोटो शेअर, चर्चांना उधाण.
मुंबईत भाजपच्या महापौरामुळं कॉलर टाईट होणार! लोढांचं मोठं वक्तव्य काय?
मुंबईत भाजपच्या महापौरामुळं कॉलर टाईट होणार! लोढांचं मोठं वक्तव्य काय?.
चैत्यभूमीवर जनसागर... बाबासाहेबांच्या महापरिनिर्वाण दिनी मोठी गर्दी
चैत्यभूमीवर जनसागर... बाबासाहेबांच्या महापरिनिर्वाण दिनी मोठी गर्दी.
डॉ. आंबेडकरांना राज्यपाल, मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्र्यांकडून आदरांजली
डॉ. आंबेडकरांना राज्यपाल, मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्र्यांकडून आदरांजली.
बहरीनमध्ये जय पवार यांची हळदी, बघा दिमाखदार सोहळ्याचे फोटो
बहरीनमध्ये जय पवार यांची हळदी, बघा दिमाखदार सोहळ्याचे फोटो.
पार्थ पवारांच्या कंपनीचा 42 कोटी भरण्यास नकार, बावनकुळेंनी ठणकावलं
पार्थ पवारांच्या कंपनीचा 42 कोटी भरण्यास नकार, बावनकुळेंनी ठणकावलं.