ola electric scooter : स्कूटर अचानक उलटी धावली, जोधपूरमधील एक व्यक्ती जखमी, ओला इलेक्ट्रिक कंपनीलाच चूक समजेना

ola electric scooter : स्कूटर अचानक उलटी धावली, जोधपूरमधील एक व्यक्ती जखमी, ओला इलेक्ट्रिक कंपनीलाच चूक समजेना
ओला इलेक्ट्रिक स्कूटर
Image Credit source: social

ओला इलेक्ट्रिक कंपनीने गेल्या महिन्यात हिरो इलेक्ट्रिकला मागे टाकून बेस्ट सेलिंग इलेक्ट्रिक स्कूटरचे विजेतेपद पटकावले होते.

शुभम कुलकर्णी

|

May 14, 2022 | 6:22 PM

मुंबई : ओला इलेक्ट्रिक स्कूटर (ola electric scooter) खरोखरच तिच्या रायडर्सनं ओळखली जाते. या स्वदेशी ई-स्कूटरमध्ये (electric scooter) एक नवीन समस्या आता समोर आली आहे. ताज्या एका घटनेनुसार Ola S1 Pro इलेक्ट्रिक स्कूटर ही अचानक उलटी धावू लागली. हे अचानक झाल्यानं संबंधित 65 वर्षीय वृद्धाला ते कळालच नाही. यामध्ये वृद्ध जखमी झाला आहे. याआधी ओला इलेक्ट्रिक स्कूटरला (scooter) आग लागल्याची घटना घडली होती आणि आता ओला एस1 प्रोमध्ये सॉफ्टवेअर संबंधित समस्येमुळे नवीन समस्या निर्माण झाली आहे. ओला इलेक्ट्रिक कंपनीने गेल्या महिन्यात हिरो इलेक्ट्रिकला मागे टाकून बेस्ट सेलिंग इलेक्ट्रिक स्कूटरचे विजेतेपद पटकावले होते. मात्र, आता तिच्या इलेक्ट्रिक स्कूटरमधील बिघाड नक्कीच चिंतेचा विषय ठरला आहे.

संपूर्ण प्रकरण काय?

ओला इलेक्ट्रिक स्कूटरशी संबंधित एक नवीन प्रकरण राजस्थानमधील जोधपूर येथील आहे. एक 65 वर्षीय व्यक्ती त्याचा Ola S1 Pro पार्क करत असताना अचानक स्कूटर इशारा न देता रिव्हर्समध्ये गेली आणि त्यामुळे वृद्धाचे डोके भिंतीवर आदळले. यामध्ये वृद्धाचा हाताला देखील लागलं आहे. ऑटोकार इंडियाच्या रिपोर्टनुसार, पल्लव माहेश्वरी नावाच्या व्यक्तीनं लिंक्डइनवर ओला एस1 प्रोशी संबंधित या समस्येबद्दल लिहिलं आहे की ही घटना त्याच्या वडिलांसोबत घडली आहे. तो म्हणाला की ओला एस1 प्रो मध्ये सॉफ्टवेअर बगमुळे हा अपघात झाला आणि त्याच्या वडिलांना खूप दुखापत झाली, असं पल्लव माहेश्वरी यांनी लिंक्डइनवर पोस्ट करुन म्हटलंय.

पल्लव माहेश्वरी यांची पोस्ट

अशाच समस्येचा उल्लेख

S1 Pro चालवणाऱ्या एका व्यक्तीने देखील अशाच समस्येचा उल्लेख केला होता. जेव्हा त्याची स्कूटर सामान्य मोडमध्ये असताना अचानक रिव्हर्समध्ये वेग वाढू लागली होती. या सर्वांसोबतच तुम्हाला हे सांगणं देखील महत्त्वाचं आहे की, गेल्या वर्षी मार्चमध्ये पुण्यात ओला इलेक्ट्रिक स्कूटरला आग लागली होती. त्यानंतर कंपनीने 1441 Ola S1 Pro परत मागवली होती. अलीकडेच, एका सरकारी चौकशी समितीच्या अधिकाऱ्यानं सांगितले होतं की, प्राथमिक तपासात ओला इलेक्ट्रिक स्कूटरला बॅटरी सेलमधील बिघाडामुळे आग लागल्याचे समोर आले आहे. दरम्यान, ओला इलेक्ट्रिक कंपनी आपल्या स्कूटरशी संबंधित सर्व समस्या सोडवण्यात गुंतलेली आहे.

हे सुद्धा वाचा

चिंतेचा विषय ठरला

ओला इलेक्ट्रिक कंपनीने गेल्या महिन्यात हिरो इलेक्ट्रिकला मागे टाकून बेस्ट सेलिंग इलेक्ट्रिक स्कूटरचे विजेतेपद पटकावले होते. मात्र, आता तिच्या इलेक्ट्रिक स्कूटरमधील बिघाड नक्कीच चिंतेचा विषय ठरला आहे.

Follow us on

Related Stories

Most Read Stories

Click on your DTH Provider to Add TV9 MARATHI

राज्य चुनें