Traffic Rule: किती वेळा चालान झाल्यानंतर ड्रायव्हिंग लायसन्स रद्द होते? वाचा नियम
तुम्ही वाहतुकीच्या नियमांकडे दुर्लक्ष करत असाल तर ते तुम्हाला महागात पडू शकते. तुम्हाला वाहतुक विभागाकडून सतत चालान होत असेल तर याकडे दुर्लक्ष करु नका. यामुळे तुमचे ड्रायव्हिंग लायसन्स रद्द होऊ शकते.

भारतात सर्रासपणे वाहतुकीचे नियम मोडले जातात. यामुळे अनेकदा भीषण अपघातही होतात. तुम्हीही वाहतुकीच्या नियमांकडे दुर्लक्ष करत असाल तर ते तुम्हाला महागात पडू शकते. तुम्हाला वाहतुक विभागाकडून सतत चालान होत असेल तर याकडे दुर्लक्ष करु नका. यामुळे तुमचे ड्रायव्हिंग लायसन्स रद्द होऊ शकते. तुमचे ड्रायव्हिंग लायसन्स किती चालानांनंतर रद्द केले जाते याबाबत माहिती जाणून घेऊयात.
प्रत्येक राज्यात नियम वेगळे
भारतातील प्रत्येक राज्यात वाहतूकीचे नियम वेगळे आहेत. बऱ्याच राज्यांमध्ये जर तुम्हा 3 वेळा चालान झाले तर तुमचे लायसन्स रद्द होऊ शकते. वाहतूक पोलिसांव्यतिरिक्त रस्त्यावर बसवलेल्या कॅमेऱ्यांद्वारे देखील चालान कापले जाते. त्यामुळे एकाच वाहनावर अनेक चालान होतात. त्यामुळे वाहन चालवताना नेहमी नियमांचे पालन करा.
काही राज्यांमध्ये 5 पेक्षा जास्त चालान झाल्यास ड्रायव्हिंग लायसन्स रद्द केले जाते. लायसन्स रद्द झाल्यास तुम्हाला दंड भरून पुन्हा लायसन्ससाठी अर्ज करावा लागतो. तसेच तुमचे लायसन्स हरवले किंवा त्याची मर्यादा संपली तरीही तुम्हाला नवीन लायसन्स काढावे लागते. अशा परिस्थितीत तुम्ही दोन प्रकारे नवीन लायसन्ससाठी अर्ज करू शकता.
ड्रायव्हिंग लायसन्ससाठी ऑनलाइन अर्ज कसा करायचा?
- सर्वप्रथम तुम्हाला https://parivahan.gov.in/ या अधिकृत वेबसाइटवर जावे लागेल.
- होमपेजवरील ऑनलाइन सर्व्हिसेसवर क्लिक करा, त्यानंतर ड्रायव्हिंग लायसन्स संबंधी सर्व्हिस निवडा.
- त्यानंतर तुम्ही एका नवीन पेजवर जाल, तिथे तुमच्या राज्याचे नाव निवडावे लागेल.
- त्यानंतर एक नवीन पेज उघडेल. या पेजवरील ‘अॅप्लिकेशन फॉर डीएल रिन्यूअल’ हा पर्याय निवडा.
- यानंतर, तुम्हाला तुमची माहिती भरावी लागेल.
- यानंतर आवश्यक कागदपत्रे अपलोड करावी लागतील.
- फोटो आणि सही अपलोड करावी लागेल.
- यानंतर तुम्हाला शुल्क भरावे लागेल. नंतर अर्ज सबमिट करा
ऑफलाइन प्रक्रिया कशी आहे?
- सर्वप्रथम जवळच्या आरटीओ कार्यालयात जा.
- फॉर्म 2 (नवीन डीएल) किंवा फॉर्म एलएलडी (डुप्लिकेटसाठी) भरा.
- यानंतर आवश्यक कागदपत्रे सबमिट करा
- शुल्क भरा
बायोमेट्रिक चाचणी करा
बायोमेट्रिक चाचणीसाठी मोबाईल नंबर आधारशी लिंक केलेला असावा. 40 वर्षांपेक्षा जास्त वयाच्या लोकांसाठी मेडिकल फिटनेस फॉर्म 1 ए गरजेचा आहे. जर डुप्लिकेट लायसन्स असेल तर एफआयआरची प्रत लागेल.
