Amazon Great Republic Day Sale 17 जानेवारीपासून लाईव्ह, या टॉप स्मार्टफोन्सवर जबरदस्त डिस्काऊंट

amazon India ने 2022 चा पहिला मेगा सेल, ग्रेट रिपब्लिक डे सेल (Great Republic Day Sale) जाहीर केला आहे. Amazon चा हा सेल 17 जानेवारी रोजी लाईव्ह होणार आहे.

Amazon Great Republic Day Sale 17 जानेवारीपासून लाईव्ह, या टॉप स्मार्टफोन्सवर जबरदस्त डिस्काऊंट
amazon sale
Follow us
| Updated on: Jan 13, 2022 | 6:04 PM

मुंबई : Amazon India ने 2022 चा पहिला मेगा सेल, ग्रेट रिपब्लिक डे सेल (Great Republic Day Sale) जाहीर केला आहे. Amazon चा हा सेल 17 जानेवारी रोजी लाईव्ह होणार आहे. प्रजासत्ताक दिनाच्या निमित्ताने आयोजित केलेला हा सेल 22 जानेवारी 2022 पर्यंत लाईव्ह असेल. प्राइम मेंबर्सना 16 जानेवारी रोजी दुपारी 12 वाजेपासून सेलमध्ये अर्ली अॅक्सेस मिळेल. यामध्ये स्मार्टफोन, इलेक्ट्रॉनिक्स, होम आणि किचन उपकरणे तसेच टीव्ही आणि मोठ्या इलेक्ट्रॉनिक्सवर आकर्षक सूट दिली जाणार आहे.

या सेलमध्ये ग्राहकांना स्मार्टफोनवर 40 टक्क्यांपर्यंत सूट, कॅमेरा आणि लॅपटॉपसारख्या इलेक्ट्रॉनिक्सवर 70 टक्क्यांपर्यंत सूट, Amazon Alexa, Fire TV आणि Kindle डिव्हाइसवर 50 टक्क्यांपर्यंत सूट मिळू शकते. Amazon SBI कार्ड धारकांना बँक सवलत, बजाज फिनसर्व्ह वर नो-कॉस्ट EMI आणि ICICI क्रेडिट कार्ड वापरकर्त्यांना Amazon Pay डिस्काऊंट दिला जाईल. सेलमध्ये स्मार्टफोन, लॅपटॉप, टॅब्लेट, टीव्हीवर 16,000 रुपयांपर्यंतची एक्सचेंज ऑफर देखील आहे.

ग्रेट रिपब्लिक डे सेलमध्ये विविध गॅजेट्सवर ऑफर

Amazon ने या सेलबाबत सर्व तपशील उघड केलेले नाहीत. मात्र, कंपनीने नुकतेच सांगितले आहे की या सेलमध्ये कोणत्या ऑफर्स असतील. ग्राहक कॉम्बोवर 40 टक्क्यांपर्यंत सूट मिळण्याची अपेक्षा करू शकतात आणि या सेलमध्ये Samsung, Xiaomi आणि Tecno च्या स्मार्टफोन्ससह 80 हून अधिक उत्पादने लॉन्च होतील.

ग्रेट रिपब्लिक डे सेल दरम्यान Amazon स्मार्टफोनवर 40 टक्के सूट, कॅमेऱ्यांवर 50 टक्के सूट, स्मार्टवॉचवर 60 टक्के सूट आणि लॅपटॉपवर 40,000 रुपयांपर्यंत सूट दिली जाणार आहे.

ग्रेट रिपब्लिक डे सेलमध्ये इलेक्ट्रॉनिक्सवर ऑफर

रेफ्रिजरेटर आणि वॉशिंग मशीन, तसेच टीव्ही यांसारख्या मोठ्या उपकरणांवर 50 टक्के सूट. याव्यतिरिक्त, ग्राहक कन्सोल आणि पीसीसाठी 55 टक्के सूट देऊन व्हिडिओ गेम टायटल खरेदी करू शकतात. Amazon Echo स्मार्ट स्पीकर 50 टक्क्यांपर्यंत सूट, फायर टीव्ही डिव्हाइसेसवर 48 टक्क्यांपर्यंत सूट, किंडल रीडर्सवर 3,400 रुपयांपर्यंत सूट आणि Echo स्मार्ट डिस्प्लेवर 45 टक्क्यांपर्यंत सूट मिळू शकते.

या स्मार्टफोन्सवर डिस्काऊंट

  • Redmi Note 10s, ज्याची किंमत 18,999 रुपये आहे, सेलदरम्यान सवलतीच्या दरात हा फोन विकला जाईल.
  • OnePlus Nord 25G देखील सवलतीच्या दरात विकला जाईल.
  • Redmi 9A Sport हा 5000mAh बॅटरीसह लाँच केलेला स्मार्टफोन किफायतशीर किंमतीत विकला जाईल.
  • 6000mAh बॅटरीवाल्या Samsung Galaxy M12 ची कीमत Amazon सेलदरम्यान त्याच्या मूळ किंमतीपेक्षा 12,999 रुपयांनी कमी असेल.
  • याशिवाय, Redmi Note 11G, Tecno Spark 8T, IQ00 Z5 5G, Redmi 10 Prime, OnePlus 9R हे फोनदेखील सवलतीच्या दरात उपलब्ध असतील.
  • स्मार्टफोन व्यतिरिक्त, HP, LG, Lenovo, Mi, JBL, BoAt, Sony, Samsung, Amazfit, Canon, Fujifilm या लोकप्रिय ब्रँड्सची इलेक्ट्रॉनिक उपकरणे देखील सवलतीच्या दरात उपलब्ध असतील.

इतर बातम्या

5000mAh बॅटरी, Octa Core प्रोसेसरसह Tecno चा 6 हजारांच्या रेंजमध्ये नवीन स्मार्टफोन लाँच, JioPhone Next ला टक्कर

10000mAh बॅटरीसह येणारे टॉप 4 स्मार्टफोन, सिंगल चार्जमध्ये ढासू बॅकअप

Honor चा फोल्डेबल स्मार्टफोन बाजारात, मॅजिक UI 6 अपडेटचा डेब्यू; जाणून घ्या किंमत आणि फीचर्स

(Amazon Great Republic Day Sale will start from 17 January)

Non Stop LIVE Update
सभा नरेंद्र मोदींची पण सर्वात जास्त चर्चा तर 'या' व्यक्तीची, पाहा कोण?
सभा नरेंद्र मोदींची पण सर्वात जास्त चर्चा तर 'या' व्यक्तीची, पाहा कोण?.
भोरमधील सभेत अजित पवारांकडून सुप्रिया सुळेंची नक्कल, म्हणाले...
भोरमधील सभेत अजित पवारांकडून सुप्रिया सुळेंची नक्कल, म्हणाले....
मोरा सारखे नाचणारे मित्र पाहिले पण... मोर नाचताना तुम्ही पाहिलं का?
मोरा सारखे नाचणारे मित्र पाहिले पण... मोर नाचताना तुम्ही पाहिलं का?.
राजीनाम्यानंतर नसीम खान एमआयएम, वंचित की महायुतीत जाणार?
राजीनाम्यानंतर नसीम खान एमआयएम, वंचित की महायुतीत जाणार?.
कांदा निर्यातीबाबत सरकारचे दुटप्पी धोरण, शेतकऱ्यांचा संताप
कांदा निर्यातीबाबत सरकारचे दुटप्पी धोरण, शेतकऱ्यांचा संताप.
2017 ला कुठे बैठक झाली? हे सांगू शकतो, मुंडेंचा पवारांबाबत गौप्यस्फोट
2017 ला कुठे बैठक झाली? हे सांगू शकतो, मुंडेंचा पवारांबाबत गौप्यस्फोट.
मतदान करावं म्हणून न्हाव्याची भन्नाट ऑफर, बोटावरची शाई दाखवा आणि...
मतदान करावं म्हणून न्हाव्याची भन्नाट ऑफर, बोटावरची शाई दाखवा आणि....
बूथवर मतदारांच्या रांगा अन् मतदान बंद ठेऊन कर्मचारी करतायत जेवण
बूथवर मतदारांच्या रांगा अन् मतदान बंद ठेऊन कर्मचारी करतायत जेवण.
म्हातार लय खडूस, तिजोरीची किल्ली कंबरेला.., शरद पवारांवर कुणाचा निशाणा
म्हातार लय खडूस, तिजोरीची किल्ली कंबरेला.., शरद पवारांवर कुणाचा निशाणा.
मतदारच नाही, मतदान केंद्र पडली ओस; मतदारांचा मतदानावर का बहिष्कार?
मतदारच नाही, मतदान केंद्र पडली ओस; मतदारांचा मतदानावर का बहिष्कार?.