Honor चा फोल्डेबल स्मार्टफोन बाजारात, मॅजिक UI 6 अपडेटचा डेब्यू; जाणून घ्या किंमत आणि फीचर्स

Honor ने अलीकडेच चीनमध्ये मॅजिक V (Honor Magic V) नावाचा फोल्डेबल स्मार्टफोन लॉन्च केला आहे. फीचर-लोडेड हँडसेट क्वालकॉमच्या फ्लॅगशिप स्नॅपड्रॅगन 8 Gen 1 SoC सह येणारा पहिला फोल्डेबल फोन बनला आहे.

Honor चा फोल्डेबल स्मार्टफोन बाजारात, मॅजिक UI 6 अपडेटचा डेब्यू; जाणून घ्या किंमत आणि फीचर्स
Honor Magic V foldable smartphone

मुंबई : Honor ने अलीकडेच चीनमध्ये मॅजिक V (Honor Magic V) नावाचा फोल्डेबल स्मार्टफोन लॉन्च केला आहे. फीचर-लोडेड हँडसेट क्वालकॉमच्या फ्लॅगशिप स्नॅपड्रॅगन 8 Gen 1 SoC सह येणारा पहिला फोल्डेबल फोन बनला आहे. यात एक वेगळी सुरक्षा चिप, एक ट्रिपल रिअर कॅमेरा सेटअप, दोन होल-पंच फ्रंट कॅमेरे (एक बाहेरील आणि एक आतील बाजूस) आणि विशेष डिझाइन केलेले वॉटरड्रॉप हिंज तंत्रज्ञान आहे, जे फोल्डेबल फोनमध्ये सर्वात पातळ असल्याचे म्हटले जाते. Honor ने त्यांच्या सर्व उपकरणांसाठी नवीन Magic UI 6.0 (Honor Magic UI अपडेट) चे अनावरण केले आहे.

Honor Magic V पासवर्ड आणि बायोमेट्रिक्स यांसारख्या फिंगरप्रिंटसाठी उत्तम सिक्योरिटी फीचर्ससह सुसज्ज आहे. यात DTS:X अल्ट्रा तंत्रज्ञानासह सिमेट्रिकल टू-स्पीकर स्टीरियो सिस्टम देण्यात आली आहे. स्मार्टफोनमध्ये 4,750mAh क्षमतेची बॅटरी आहे जी 66W Honor SuperCharge चार्जिंग तंत्रज्ञानाला सपोर्ट करते.

Honor Magic V ची किंमत आणि स्पेसिफिकेशन्स

Honor Magic V च्या 12GB RAM + 256GB स्टोरेज व्हेरिएंटची किंमत CNY 9,999 (जवळपास 1,16,000 रुपये) आणि 12GB RAM + 512GB स्टोरेज व्हेरिएंटची किंमत CNY 10,999 (जवळपास 1,27,600 रुपये) इतकी आहे. Honor स्मार्टफोन चीनमध्ये 18 जानेवारीपासून ब्लॅक, बर्न ऑरेंज आणि स्पेस सिल्व्हर कलर पर्यायांमध्ये उपलब्ध होईल.

ड्युअल-सिम Honor Magic V Android 12-आधारित Magic UI 6.0 वर चालतो आणि 90Hz रिफ्रेश रेटसह 7.9-इंच फोल्डेबल फ्लेक्सिबल OLED इनर डिस्प्लेला (1,984×2,272 पिक्सेल) स्पोर्ट करतो. Honor दिलेल्या माहितीनुसार, स्क्रीन आस्पेक्ट रेशो 10.3:9, HDR10+ सर्टिफिकेशन मिळेल.

Honor Magic V चे फीचर्स

अंडर द हुड Honor Magic V मध्ये Qualcomm Snapdragon 8 Gen 1 5G SoC पॅक आहे, आणि फ्लॅगशिप चिपसेटसह येणारा हा पहिला फोल्डेबल फोन आहे. Honor ने म्हटल्याप्रमाणे यात एक इंटेलिजेंट कूलिंग सिस्टम देण्यात आली आहे, ज्यामध्ये थर्ड-जनरेशन ग्राफीक्स आणि AI इंटेलिजेंट थर्मल मॅनेजमेंट सिस्टम समाविष्ट आहे, जे या फोनचे तापमान नियंत्रणात ठेवते. फोल्डेबल फोन 12GB रॅम आणि 512GB पर्यंत स्टोरेजसह सादर करण्यात आला आहे.

शानदार कॅमेरा

Honor Magic V मध्ये 50 मेगापिक्सेलचा प्रायमरी सेन्सर देण्यात आला आहे जो f/1.9 अपर्चरसह वाइड अँगल लेन्ससह जोडलेला आहे. f/2.0 लेन्ससह 50 मेगापिक्सेल स्पेक्ट्रम-एन्हांस्ड सेन्सर आणि f/2.2 अल्ट्रा-वाइड-अँगल लेन्ससह 50 मेगापिक्सेल सेन्सर देखील आहे. बॅक कॅमेरा 4K व्हिडिओ रेकॉर्डिंगला सपोर्ट करतो आणि इलेक्ट्रॉनिक इमेज तसेच व्हिडिओ स्टॅबिलायझेशनला सपोर्ट करतो. हा कॅमेरा 10x पर्यंत डिजिटल झूम प्रदान करतो आणि एलईडी फ्लॅशसह येतो.

इतर बातम्या

Google | वृत्त संकलनातील एकाधिकारशाहीचा दुरुपयोग, गुगलविरोधात भारतात चौकशीचे आदेश

शानदार ऑफर! Oppo चा 12 हजारांचा स्मार्टफोन 9 हजार रुपयांत खरेदीची संधी

कारसाठी NOC का गरजेचं? जाणून घ्या अप्लाय करण्याची सोपी ऑनलाईन पद्धत

Published On - 6:13 pm, Wed, 12 January 22

Click on your DTH Provider to Add TV9 MARATHI