Aprilia SXR 125 स्कूटर लाँच, केवळ 5,000 रुपयात बुकिंग करा

पियाजिओने (Piaggio) एसएक्सआर रेंजची स्कूटर एप्रिलिया एसएक्सआर 125 (Aprilia SXR 125) साठी बुकिंग करण्याची घोषणा केली आहे.

Aprilia SXR 125 स्कूटर लाँच, केवळ 5,000 रुपयात बुकिंग करा
Follow us
| Updated on: Apr 03, 2021 | 12:44 PM

मुंबई : पियाजिओने (Piaggio) एसएक्सआर रेंजची स्कूटर एप्रिलिया एसएक्सआर 125 (Aprilia SXR 125) लाँच करण्यापूर्वी शुक्रवारपासून त्यासाठी बुकिंग करण्याची घोषणा केली आहे. कंपनीने त्यांच्या निवेदनात म्हटले आहे की, 5,000 रुपये टोकन अमाऊंट भरुन कंपनीच्या डिलरशिपद्वारे तुम्ही Aprilia SXR 125 ही स्कूटर बुक करु शकता. (Aprilia SXR 125 scooter launched, can book for just Rs 5,000)

मागील डिसेंबरमध्ये, इटालियन प्रीमियम स्कूटर उत्पादक कंपनीने देशात एप्रिलिया एसएक्सआर 160 सादर केली होती. पियाजिओ इंडियाचे मुख्य आणि व्यवस्थापकीय संचालक डिएगो ग्रॅफी म्हणाले की, “आमच्या प्रतिष्ठित ग्राहकांना ही लेटेस्ट स्कूटर Aprilia SXR 125 प्री-बुक करण्याची संधी आहे. Aprilia SXR 125 ही स्कूटर खास भारतीयांसाठी डिझाईन करण्यात आली आहे. ही स्कूटर इटलीमध्ये डिझाईन करण्यात आली आहे. सध्या ही स्कूटर भारतीयांच्या कौतुकास पात्र ठरत आहे. आम्ही सध्या ही स्कूटर लाँच करण्याच्या तयारीत आहोत.

किंमत

प्रीमियम स्कूटर एप्रिलिया एसएक्सआर 160 (Aprilia SXR 160) ची शोरूम किंमत 1.26 लाख रुपये इतकी आहे. कंपनीने एका निवेदनात म्हटले आहे की, 5 हजार रुपयांची टोकन रक्कम भरुन भारतभरात कंपनीशी संलग्न कोणत्याही डीलरशिपद्वारे ही स्कूटर बुक केली जाऊ शकते. याशिवाय कंपनीच्या वेबसाईटवर ऑनलाईन बुकिंगचा पर्यायही देण्यात आला आहे.

जबरदस्त इंजिन

कंपनीने म्हटले आहे की, या स्कूटरमध्ये सिंगल-सिलिंडर 4-स्ट्रोक इंजिन आहे, जे 7100 आरपीएमवर 11 पीएसची मॅक्सिमम पॉवर जनरेट करते. या स्कूटरची इंधन टाकी क्षमता 7 लिटरची आहे. पियाजिओ इंडियाचे प्रमुख व व्यवस्थापकीय संचालक डिएगो ग्रॅफी म्हणाले की, या स्कूटरचं डिझाईन इटलीमध्ये तयार करण्यात आलं असून ती शानदार शैली, उत्तम कामगिरी आणि दमदार पॉफॉर्मन्सचं प्रतीक आहे.

ग्लोबल डिझाईन

Aprilia SXR 160 मध्ये इटालियन मॅन्युफॅक्चररचं लेटेस्ट ग्लोबल डिझाईन देण्यात आलं आहे. यामध्ये तुम्हाला नवीन BS-VI 160 cc तीन वॉल्व फ्यूल इंजेक्टेड इंजिन देण्यात आलं आहे. जे 11 hp आणि 11 nm टॉर्क देतं. डिझाईन फीचर्समध्ये रॅपराऊंड एलईडी हेडलँप, एलईडी टेललाइट्स, फुल-डिजिटल इंस्ट्रूमेंट क्लस्टर, मोबाइल कनेक्टिव्हिटी ऑप्शन, एक लांब आणि मोठी सीट, एबीएससह डिस्क ब्रेक आणि सिग्नेचर Aprilia ग्राफिक्सचा समावेश आहे.

इतर बातम्या 

Bajaj Auto चा जलवा कायम, एका महिन्यात 3,69,448 वाहनांची विक्री

अवघ्या 69 हजारात खरेदी करा 1.45 लाखांची Bajaj Avenger Cruise 220

TVS च्या दुचाकींना जगभरातील ग्राहकांची पसंती, मार्च 2021 मध्ये रेकॉर्डब्रेक निर्यात

(Aprilia SXR 125 scooter launched, can book for just Rs 5,000)

Non Stop LIVE Update
दोन महिन्यामध्ये एकनाथ शिंदे दिसणार नाहीत, प्रकाश आंबेडकरांचं वक्तव्य
दोन महिन्यामध्ये एकनाथ शिंदे दिसणार नाहीत, प्रकाश आंबेडकरांचं वक्तव्य.
बेकायदा फेरीवाल्यांवर थेट कारवाई करा, मुंबई हायकोर्टाचे स्पष्ट आदेश
बेकायदा फेरीवाल्यांवर थेट कारवाई करा, मुंबई हायकोर्टाचे स्पष्ट आदेश.
मोठी बातमी, धनगर आरक्षणाची याचिका सुप्रीम कोर्टानं फेटाळली
मोठी बातमी, धनगर आरक्षणाची याचिका सुप्रीम कोर्टानं फेटाळली.
अजित पवार लोकसभेची एकही जागा जिंकणार नाहीत, पाहा कोणी केलं भाकीत?
अजित पवार लोकसभेची एकही जागा जिंकणार नाहीत, पाहा कोणी केलं भाकीत?.
वर्ध्यात पंतप्रधान मोदींचं मराठीतून भाषण अन् सभास्थळी म्हटला अभंग
वर्ध्यात पंतप्रधान मोदींचं मराठीतून भाषण अन् सभास्थळी म्हटला अभंग.
अमोल कोल्हे हे महागद्दार, धोकेसम्राट आणि...; कुणी केली जहरी टीका?
अमोल कोल्हे हे महागद्दार, धोकेसम्राट आणि...; कुणी केली जहरी टीका?.
राज ठाकरे पहिल्यांदाच धनुष्यबाणाला मत देणार, राहुल शेवाळे काय म्हणाले?
राज ठाकरे पहिल्यांदाच धनुष्यबाणाला मत देणार, राहुल शेवाळे काय म्हणाले?.
नटीला नटी म्हणायचं नाही तर काय...राऊत-पाटलांमधील संवाद कॅमेऱ्यात कैद
नटीला नटी म्हणायचं नाही तर काय...राऊत-पाटलांमधील संवाद कॅमेऱ्यात कैद.
दोनशे रूपये घ्या, पण... ठाकरेंच्या सभेसाठी आलेल्या लोकांकडून विनंती
दोनशे रूपये घ्या, पण... ठाकरेंच्या सभेसाठी आलेल्या लोकांकडून विनंती.
ज्या आईने तुम्हाला जन्म... राऊतांच्या त्या टीकेवर राणांची प्रतिक्रिया
ज्या आईने तुम्हाला जन्म... राऊतांच्या त्या टीकेवर राणांची प्रतिक्रिया.