Auto 9 Awards 2026 : दिल्लीत रंगणार देशातील सर्वात मोठा ऑटो पुरस्कार सोहळा, नितीन गडकरी करणार संबोधित
टीव्ही 9 नेटवर्क आयोजित ऑटो 9 अॅवॉर्ड्स २०२६ सोहळा नवी दिल्लीत पार पडणार आहे. रस्ते वाहतूक मंत्री नितीन गडकरी यांच्या उपस्थितीत होणाऱ्या या कार्यक्रमात भारतीय ऑटोमोबाईल क्षेत्रातील उत्कृष्ट कामगिरीचा गौरव केला जाईल

भारतीय ऑटोमोबाईल उद्योगाने सध्या जागतिक स्तरावर आपली वेगळी ओळख निर्माण केली आहे. याच उद्योगातील नावीन्यपूर्ण शोध, उत्कृष्ट नेतृत्व आणि तांत्रिक प्रगतीचा गौरव करण्यासाठी टीव्ही 9 नेटवर्क सज्ज झाले आहे. येत्या बुधवारी, २१ जानेवारी २०२६ रोजी नवी दिल्लीतील प्रसिद्ध ताज पॅलेस हॉटेलमध्ये ऑटो 9 अॅवॉर्ड्सचे भव्य आयोजन करण्यात आले आहे. हा अॅवॉर्ड शो देशातील सर्वात विश्वासार्ह आणि मोठा ऑटो पुरस्कार सोहळा म्हणून ओळखला जातो.
नितीन गडकरी प्रमुख पाहुणे
या कार्यक्रमाला केंद्र सरकारचे रस्ते वाहतूक आणि महामार्ग मंत्री नितीन गडकरी प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित राहणार आहेत. नितीन गडकरी यांना भारतीय रस्ते पायाभूत सुविधा आणि ऑटोमोबाईल क्षेत्रातील परिवर्तनाचे जनक मानले जाते. नितीन गडकरी हे संध्याकाळी ७.२० वाजता उपस्थितांना संबोधित करणार आहेत. ते त्यांच्या भाषणातून भारतीय ऑटोमोबाईल उद्योगाची भविष्यातील दिशा आणि सरकारच्या धोरणात्मक भूमिकेवर प्रकाश टाकतील.
यावेळी केवळ पुरस्कार वितरणच नव्हे, तर उद्योगातील आव्हाने आणि संधींवर चर्चा करण्यासाठी विविध सत्रांचे आयोजन करण्यात आले आहे. तंत्रज्ञानातील बदलांमुळे मार्केटिंगची समीकरणे कशी बदलत आहेत, यावर उद्योगातील वरिष्ठ अधिकारी चर्चा करतील. तसेच बदलत्या काळात ग्राहकांचा कल इलेक्ट्रिक वाहनांकडे (EV) आहे की हायब्रिडकडे, यावर सखोल विश्लेषण केले जाईल. यासोबतच संध्याकाळी ७:०५ वाजता मेक इन इंडिया मोहिमेवर विशेष चर्चा होईल. यात भारतातील स्थानिक उत्पादनाला चालना देणे आणि देशाला जागतिक मॅन्युफॅक्चरिंग हब बनवणे यावर भर दिला जाईल.

कार्यक्रमाचे स्वरुप
| वेळ | कार्यक्रम / सत्र |
| दुपारी 3.00 | पाहुण्यांचे आगमन आणि नोंदणी प्रक्रिया |
| दुपारी 4.00 | उद्घाटन समारंभ आणि सन्माननीय ज्युरी सदस्यांचा सत्कार |
| दुपारी 4.25 | ऑटोमोबाईल मार्केटिंग आणि कम्युनिकेशन क्षेत्रातील पुरस्कार |
| दुपारी 4.40 | पॅनेल चर्चा: बदलत्या तंत्रज्ञानातील मार्केटिंगची प्रगती |
| संध्याकाळी 5.20 | दुचाकी विभाग पुरस्कार: परफॉर्मन्स आणि इनोव्हेशनचा गौरव |
| संध्याकाळी 5.50 | चर्चासत्र: ग्राहकांच्या आवडीनिवडी आणि बाजारपेठेतील पर्याय |
| संध्याकाळी 6.30 | चारचाकी विभाग पुरस्कार: कार विभागातील उत्कृष्ट कामगिरीचा सन्मान |
| संध्याकाळी 7.05 | विशेष चर्चा: ‘मेक इन इंडिया’ आणि भारतीय उत्पादन क्षमता |
| संध्याकाळी 7.20 | नितीन गडकरी यांचे प्रमुख भाषण |
| रात्री 8.00 | ग्रँड फिनाले: वर्षातील सर्वोत्तम ऑटोमोबाईल पुरस्कारांचे वितरण |
| रात्री 8.35 | नेटवर्किंग डिनर |

टीव्ही 9 नेटवर्कच्या या उपक्रमाचा मुख्य उद्देश भारतीय मोबिलिटी क्षेत्राला जागतिक दर्जाची ओळख मिळवून देणे हा आहे. हा कार्यक्रम केवळ पुरस्कारांपुरता मर्यादित नसून, ऑटो क्षेत्रातील दिग्गज आणि धोरणकर्त्यांना एका व्यासपीठावर आणणे असा आहे. तसेच भविष्यातील स्मार्ट मोबिलिटीचा पाया रचण्यासाठी महत्त्वाचा दुवा ठरणार आहे.
