Bajaj Pulsar 150 खरेदी करायचीये का? फीचर्स, किंमत, ऑफर्स जाणून घ्या
बजाज पल्सर 150 ही भारतीय बाजारात सर्वाधिक विकली जाणारी आणि विश्वासार्ह बाईक आहे. ही बाईक विशेषत: तरुण रायडर्सची पसंती आहे. चला तर मग जाणून घेऊया.

तुम्ही बाईक खरेदी करण्याचा प्लॅन करत असाल तर ही बातमी नक्की वाचा. तुम्ही बजाज पल्सर 150 चा देखील विचार करू शकतात. आता यात तुम्हाला कोणते खास फीचर्स मिळू शकतात, कोणती हायटेक टेक्नॉलॉजी मिळू शकते, याविषयीची माहिती पुढे वाचा.
आजच्या काळात बाईक किंवा कार खरेदी करणे पूर्वीपेक्षा सोपे झाले आहे. आता ग्राहकांना एकाच वेळी संपूर्ण रक्कम देण्याची गरज नाही, कारण फायनान्स सुविधेमुळे हे काम सोपे झाले आहे. लोक डाउन पेमेंट म्हणून काही हजार रुपये भरून बाईक घरी आणू शकतात आणि उर्वरित रक्कम बँक कर्जाद्वारे भरू शकतात. त्यामुळे ठराविक रक्कम दर महिन्याला EMI म्हणून भरावी लागते.
तुम्ही बजाज पल्सर 150 खरेदी करण्याचा विचार करत असाल तर 10,000 रुपयांच्या डाउन पेमेंटवर दरमहा किती EMI भरावा लागेल ते जाणून घेऊया.
सर्वात आधी किंमत जाणून घ्या
बजाज कंपनीची लोकप्रिय बाईक पल्सर 150 दोन व्हेरिएंटमध्ये येते. सिंगल डिस्क आणि ट्विन डिस्क. नोएडामध्ये सिंगल डिस्क व्हेरिएंटची एक्स शोरूम किंमत 1.05 लाख रुपये आहे, तर ट्विन डिस्क व्हेरिएंटची किंमत सुमारे 1.12 लाख रुपये आहे. येथे आम्ही त्याच्या सिंगल डिस्क व्हेरिएंटचे फायनान्स डिटेल्स समजून घेऊ, ज्याची एक्स-शोरूम किंमत 1,05,144 रुपये आहे. यावर 10,514 रुपये आरटीओ चार्ज आणि 6,547 रुपये विमा जोडल्यानंतर बाईकची ऑन-रोड किंमत 1,22,205 रुपये होते.
किती EMI भरावा लागेल?
तुम्ही 10,000 रुपये डाउन पेमेंट भरून ही बाईक खरेदी केली तर उर्वरित 1,12,205 रुपये बँकेकडून कर्ज म्हणून घ्यावे लागतील. समजा, बँक तुम्हाला 5 वर्षांसाठी (60 महिने) कर्ज देत असेल आणि व्याज दर 10% असेल तर तुमचा मासिक हप्ता 2,384 रुपये असेल. या काळात तुम्ही बँकेला व्याज म्हणून एकूण 30,836 रुपये द्याल. अशा प्रकारे, आपल्या बाईकची एकूण किंमत ₹ 1,53,041 असेल.
बजाज पल्सर 150 चे फीचर्स
बजाज पल्सर 150 ही भारतीय बाजारात सर्वाधिक विकली जाणारी आणि विश्वासार्ह बाईक आहे. ही बाईक विशेषत: तरुण रायडर्सची पसंती आहे. यात 149.5 सीसी 4-स्ट्रोक, 2-व्हॉल्व्ह ट्विन स्पार्क इंजिन आहे जे 14 PA जनरेट करते. सुरक्षिततेसाठी, यात फ्रंट डिस्क आणि मागील ड्रम ब्रेक, तसेच सिंगल-चॅनेल एबीएस आहे. या बाईकमध्ये एलईडी टेल लाइट्स, डीआरएल, ब्लूटूथ कनेक्टिव्हिटी, डिजिटल स्पीडोमीटर, ओडोमीटर, ट्रिप मीटर आणि सर्व्हिस ड्यू इंडिकेटर यासारखी आधुनिक फीचर्स देखील आहेत.
