Bajaj Pulsar NS400Z : पॉवरफुल आणि फास्टेस्ट; बजाजने उतरवली दमदार बाईक, किंमत आहे इतकी

Bajaj Pulsar NS400Z ही आतापर्यंतची दमदार पल्सर बाईक आहे. या सेगमेंटमधील ही सर्वात शक्तीशाली बाईक असल्याचा दावा कंपनीने केला आहे. या बाईकमध्ये 373 सीसी क्षमतेचे सिंगल सिलेंडर इंजिन आहे. यापूर्वी हे इंजिन Dominar मध्ये पाहायला मिळाले होते. काय आहे बाईकची वैशिष्ट्ये आणि किंमत...

Bajaj Pulsar NS400Z : पॉवरफुल आणि फास्टेस्ट; बजाजने उतरवली दमदार बाईक, किंमत आहे इतकी
दमदार बाईक बाजारात
Follow us
| Updated on: May 03, 2024 | 3:05 PM

देशातील प्रमुख दुचाकी निर्मिती कंपनी बजाज ऑटोने मोठ्या प्रतिक्षेनंतर सर्वात दमदार Bajaj Pulsar NS400Z बाजारात आणली आहे. आकर्षक लूक, दमदार इंजिन आणि ॲडव्हांस फीचर्स यामुळे ग्राहकांच्या नजरा या बाईकवर खिळल्या आहेत. या बाईकची सुरुवातीची किंमत 1.85 लाख रुपये आहे. सध्या कंपनीने या बाईकला इंट्रोडक्ट्री प्राईससह बाजारात उतरवले आहे. म्हणजे लवकरच या बाईकच्या किंमतीत वाढीची शक्यता आहे.

अशी करता येईल बुकिंग

नवीन Bajaj Pulsar NS400Z साठी बुकिंग सुरु झाली आहे. ग्राहकांना ही बाईक कंपनीच्या अधिकृत वेबसाईटवरुन आणि अधिकृत डीलरकडे बुक करत येईल. त्यासाठी 5000 रुपये बुकिंग रक्कम जमा करावी लागेल. कंपनी लवकरच या बाईकची डिलिव्हरी सुरु करणार आहे. नवीन पल्सरल कंपनीने 4 वेगवेगळ्य रंगात सादर केले आहे. सर्व कलर व्हेरिएंटची किंमत 1.85 लाखांपर्यंत आहे.

हे सुद्धा वाचा

शार्प डिझाईन

Bajaj Pulsar NS400Z चे हेडलाईट आकर्षक आणि युनिक स्टाईलसह मिळतात.या हेडलाईटच्य मध्यभागी LED प्रोजेक्टर लॅप देण्यता आला आहे. बाईकला एड्जी डिझाईन देण्यात आले आहे. त्यामुळे बाईकला एक शार्प लूक आला आहे. हा लूक जवळपास NS200 ची आठवण करुन देतो. स्पोर्टी रिअर व्ह्यू मिरार, गोल्डन फीनिश सह अप साईड डाऊन फ्रंट फॉर्क सस्पेंशन आणि स्कल्प्टेड फ्यूएल टँक यामुळे ही बाईक अधिक आकर्षक दिसते.

सर्वात तेज 400 सीसी बाईक

Pulsar NS400Z मध्ये कंपनीने लिक्विड कूल्ड 373 सीसी क्षमतेचे सिंगल सिलेंडर इंजिन दिले आहे. यापूर्वी असे इंजिन Dominar मध्ये पाहायला मिळाले होते. हे इंजिन 40hp ची पॉवर आणि 35Nm चा टॉर्क जनरेट करतो. या इंजिनमध्ये 6- स्पीड गिअरबॉक्सने जोडण्यात आले आहे. हा गिअरबॉक्स स्लिप असिस्ट क्लच सिस्टिमसह येतो. ही बाईक 154 चा प्रति तास सर्वाधिक वेग देत असल्याचा दावा कंपनीने केला आहे.

अशी आहे वैशिष्ट्ये

  • इंजिन : 373CC
  • पॉवर : 40 Hp
  • टॉर्क : 35 Nm
  • टॉप स्पीड : 154 किमी प्रति तास
  • फ्यूल टँक : 12 लीटर

फीचर्स

Pulsar NS400Z मध्ये कंपनीने स्पोर्ट, रोड, रेन आणि ऑपरोड असे 4 रायडिंग मोड्स दिले आहेत. यामध्ये 3 स्तरीय ट्रॅक्शन कंट्रोल आणि स्विचबेल ड्युअल चॅनल एंटी लॉक ब्रेकिंग सिस्टिम दिली आहे. याशिवाय कलर LCD डॅशबोर्ड दिला आहे. नेव्हिगेशन डेटा दाखविण्यासाठी एक छोटी स्क्रीन पण देण्यात आली आहे.

Non Stop LIVE Update
शिंदेंच्या शिवसेनेचे उमेदवार आजच होणार जाहीर, संजय शिरसाट म्हणाले...
शिंदेंच्या शिवसेनेचे उमेदवार आजच होणार जाहीर, संजय शिरसाट म्हणाले....
शरद पवारांच्या NCPकडून एबी फॉर्मचं वाटप सुरू, 3 जणांची उमेदवारी फिक्स
शरद पवारांच्या NCPकडून एबी फॉर्मचं वाटप सुरू, 3 जणांची उमेदवारी फिक्स.
झिशान सिद्दीकी वांद्रे पूर्व मतदारसंघातून निवडणुकीच्या रिंगणात
झिशान सिद्दीकी वांद्रे पूर्व मतदारसंघातून निवडणुकीच्या रिंगणात.
'राऊतांना झोपताना झाडं अन् उठताना डोंगर...', शहाजी बापूंचं प्रत्युत्तर
'राऊतांना झोपताना झाडं अन् उठताना डोंगर...', शहाजी बापूंचं प्रत्युत्तर.
उन्मेष पाटलांना उमेदवारी, ठाकरे गटाकडून होणार अधिकृत घोषणा?
उन्मेष पाटलांना उमेदवारी, ठाकरे गटाकडून होणार अधिकृत घोषणा?.
अजितदादांच्या राष्ट्रवादीच्या 'या' नेत्यानं घेतली ठाकरेंची 'मशाल' हाती
अजितदादांच्या राष्ट्रवादीच्या 'या' नेत्यानं घेतली ठाकरेंची 'मशाल' हाती.
अमोल मिटकरींना उमेदवारी मिळणार की नाही?, अजितदादांनी तडकाफडकी बोलावलं
अमोल मिटकरींना उमेदवारी मिळणार की नाही?, अजितदादांनी तडकाफडकी बोलावलं.
'भाई को उडा देंगे, 5 करोड दे दो..', म्हणणारा आता म्हणतो, सलमान भाईजान
'भाई को उडा देंगे, 5 करोड दे दो..', म्हणणारा आता म्हणतो, सलमान भाईजान.
'ते 5 कोटी शहाजी बापूंचे? एकच गाडी सापडली अशा..',रोहित पवारांचा निशाणा
'ते 5 कोटी शहाजी बापूंचे? एकच गाडी सापडली अशा..',रोहित पवारांचा निशाणा.
'भाजपच्या यादीत धक्कातंत्र नव्हतं पण आमची यादी...', कोणाचा गौप्यस्फोट?
'भाजपच्या यादीत धक्कातंत्र नव्हतं पण आमची यादी...', कोणाचा गौप्यस्फोट?.