दिवाळीमध्ये गाडी घेताय ? हे आहेत काही स्वस्त आणि मस्त पर्याय

आज आम्ही तुम्हाला अशाच 5 कारबद्दल सांगणार आहोत, ज्यांची किंमत 5 लाख रुपयांपेक्षा कमी आहे. तुम्ही जर दिवाळीत नविन गाडी घेण्याचा विचार करत असाल तर तुमच्यासाठी हे काही चांगले पर्याय आहेत.

दिवाळीमध्ये गाडी घेताय ? हे आहेत काही स्वस्त आणि मस्त पर्याय
car
Follow us
| Updated on: Nov 04, 2021 | 2:42 PM

मुंबई : गेल्या काही महिन्यांबद्दल बोलायचे झाले तर, बहुतेक कंपन्या एसयूव्ही कार किंवा त्यांच्या लहान व्हर्जन लाँच करत आहेत. या गाड्या केवळ चांगला वेग देत नाहीत तर उत्तम मायलेजही देतात. आज आम्ही तुम्हाला अशाच 5 कारबद्दल सांगणार आहोत, ज्यांची किंमत 5 लाख रुपयांपेक्षा कमी आहे. तुम्ही जर दिवाळीत नविन गाडी घेण्याचा विचार करत असाल तर तुमच्यासाठी हे काही चांगले पर्याय आहेत.

मारुती सुझुकी अल्टो 800

भारतात 5 लाख रुपयांपेक्षा कमी किंमतीच्या कारबद्दल बोलायचे झाल्यास, मारुती सुझुकी अल्टो 800 हा एक चांगला पर्याय आहे, जो या सेगमेंटमध्ये सर्वाधिक विकली जाणारी कार देखील आहे. मारुती अल्टोची एक्स-शोरूम किंमत 3.15 लाख ते 4.82 लाख रुपये आहे. ही 5 सीटर कार आहे आणि त्यात 796 cc इंजिन आहे, जे 22.05 kmpl चा मायलेज देते. याला 177 लिटरची बूट स्पेस मिळते.

car

मारुती सुझुकी Eeco

Maruti Suzuki Eeco च्या 5 STR आवृत्तीची सुरुवातीची किंमत 4.81 लाख रुपये (एक्स-शोरूम) आहे. यात 1196 cc चे इंजिन आहे, जे पेट्रोल आणि CNG प्रकारात येते. यात 5 आणि 7 सीटर पर्याय आहेत. यामध्ये यूजर्सना 2,350mm चा व्हीलबेस मिळेल.

car

मारुती सेलेरियो

मारुती सेलेरियो कार 5 लाखांपेक्षा कमी किमतीत खरेदी करू शकतात, ज्याच्या किंमती 4.65 लाख रुपये (एक्स-शोरूम) पासून सुरू होतात. या कारमध्ये 998 cc चे इंजिन देण्यात आले असून यात 5 लोक बसण्याची क्षमता आहे. त्यात पेट्रोल आणि सीएनजी दोन्ही पर्याय आहेत, जे लोकांसाठी उपयुक्त ठरतील. यात 235 लीटरची बूट स्पेस आहे.

car

टाटा टियागो

टाटा मोटर्सच्या हॅचबॅक कार टाटा टियागोचे बेस मॉडेल 5 लाख रुपयांपेक्षा कमी किमतीत उपलब्ध असेल, ज्याची सुरुवातीची किंमत 4.99 लाख रुपये (एक्स-शोरूम) आहे. याला 1199cc चे इंजिन देण्यात आले असून ते एका लिटर पेट्रोलमध्ये 23kmpl मायलेज देते. ही कार 84.48 HP पॉवर जनरेट करण्यास सक्षम आहे. याची क्षमता 5 सीटर आहे.

tata

रेनॉल्ट KWID

Renault KWID ची सुरुवातीची किंमत 4.06 लाख रुपये (एक्स-शोरूम) आहे. कंपनीने यामध्ये 799 cc चे इंजिन दिले आहे, जे 67hp पॉवर जनरेट करू शकते. 5 आसनक्षमता असलेल्या या कारचे मायलेज 22.3 किमी आहे, याची माहिती CarDekho वेबसाइटवरून उपलब्ध आहे. या कारमध्ये 279 लीटरची बूट स्पेस देण्यात आली आहे.

car

इतर बातम्या :

Renault भारतात नवीन SUV लाँच करणार, Hyundai Creta, Kia Seltos आणि MG Astor SUV ला टक्कर

3.34 लाख रुपयांची KTM 390 Duke स्पोर्ट्स बाइक अवघ्या 98000 रुपयांत, जाणून घ्या कुठे मिळतेय शानदार डील

मारुती अर्टिंगाला टक्कर, Kia ची MPV सज्ज, जाणून घ्या लीक फीचर्स आणि लाँच अपडेट

Non Stop LIVE Update
2017 ला कुठे बैठक झाली? हे सांगू शकतो, मुंडेंचा पवारांबाबत गौप्यस्फोट
2017 ला कुठे बैठक झाली? हे सांगू शकतो, मुंडेंचा पवारांबाबत गौप्यस्फोट.
मतदान करावं म्हणून न्हाव्याची भन्नाट ऑफर, बोटावरची शाई दाखवा आणि...
मतदान करावं म्हणून न्हाव्याची भन्नाट ऑफर, बोटावरची शाई दाखवा आणि....
बूथवर मतदारांच्या रांगा अन् मतदान बंद ठेऊन कर्मचारी करतायत जेवण
बूथवर मतदारांच्या रांगा अन् मतदान बंद ठेऊन कर्मचारी करतायत जेवण.
म्हातार लय खडूस, तिजोरीची किल्ली कंबरेला.., शरद पवारांवर कुणाचा निशाणा
म्हातार लय खडूस, तिजोरीची किल्ली कंबरेला.., शरद पवारांवर कुणाचा निशाणा.
मतदारच नाही, मतदान केंद्र पडली ओस; मतदारांचा मतदानावर का बहिष्कार?
मतदारच नाही, मतदान केंद्र पडली ओस; मतदारांचा मतदानावर का बहिष्कार?.
हे मोदीकृत भाजपाचे षडयंत्र, EVM वर शंका व्यक्त करत राऊतांचा गंभीर आरोप
हे मोदीकृत भाजपाचे षडयंत्र, EVM वर शंका व्यक्त करत राऊतांचा गंभीर आरोप.
राणा दाम्पत्याची बुलेटस्वारी, किती मतांनी विजय? नवनीत राणा म्हणाल्या..
राणा दाम्पत्याची बुलेटस्वारी, किती मतांनी विजय? नवनीत राणा म्हणाल्या...
दुसऱ्या टप्प्यात अनोख्या मतदाराची चर्चा, थेट माकड कडेवर घेऊन केल मतदान
दुसऱ्या टप्प्यात अनोख्या मतदाराची चर्चा, थेट माकड कडेवर घेऊन केल मतदान.
पुन्हा मरायला तयार... मतदानासाठी निघालेले जरांगे पाटील काय म्हणाले?
पुन्हा मरायला तयार... मतदानासाठी निघालेले जरांगे पाटील काय म्हणाले?.
हातांची झोळी केली...सोपे नव्हते मला हरविणे म्हणून...तुपकरांचा हल्लाबोल
हातांची झोळी केली...सोपे नव्हते मला हरविणे म्हणून...तुपकरांचा हल्लाबोल.