TATA च्या ‘या’ कारने बलेनो आणि वॅगनआरला मागे टाकले, ब्रेझाची जोरदार स्पर्धा
भारतात लोक आता छोट्या कारऐवजी मोठ्या कार खरेदी करण्यास प्राधान्य देत आहेत. यामुळेच कॉम्पॅक्ट एसयूव्हीची विक्री झपाट्याने वाढली आहे. आता अशाच एका एसयूव्हीने बेस्ट सेलिंग होणाऱ्या मारुती बलेनो आणि मारुती वॅगनआर सारख्या लोकप्रिय कारला मागे टाकले आहे. ही कार टाटा नेक्सॉन आहे.

नेक्सॉन ही एक प्रशस्त आणि आरामदायक एसयूव्ही आहे जी चांगली दिसते. यात अनेक मॉडर्न फीचर्स देण्यात आले असून याला 5 स्टार सेफ्टी रेटिंग मिळाले आहे. त्याची ड्रायव्हिंग क्वॉलिटी, परफॉर्मन्स आणि स्टेबिलिटीही जबरदस्त आहे. यात टचस्क्रीन इन्फोटेनमेंट सिस्टिम (अँड्रॉइड ऑटो आणि अॅपल कारप्ले सपोर्ट), डिजिटल इंस्ट्रूमेंट क्लस्टर, ऑटो क्लायमेट कंट्रोल, रियर AC व्हेंट आणि कूल्ड ग्लोव्ह बॉक्स सारखे फीचर्स देण्यात आले आहेत. टाटा नेक्सॉनच्या बेस मॉडेलची किंमत 9.06 लाख रुपयांपासून सुरू होते.
टाटा नेक्सॉनने गेल्या महिन्यात एप्रिलमध्ये विक्रीच्या बाबतीत मारुती बलेनो आणि मारुती वॅगनआर सारख्या लोकप्रिय कारला मागे टाकले आहे. टाटा नेक्स टॉप 10 सेलिंग वाहनांमध्ये सहाव्या क्रमांकावर आहे. एप्रिलमध्ये मारुतीने बलेनोच्या केवळ 13,180 आणि वॅगनआरच्या 13,413 युनिट्सची विक्री केली होती.
टाटा नेक्सॉनच्या बेस मॉडेलची किंमत 9.06 लाख रुपयांपासून सुरू होते आणि 18.41 लाख रुपयांपर्यंत (ऑन-रोड दिल्ली) जाते. टाटा नेक्सॉनच्या प्रमुख प्रतिस्पर्धी मारुती सुझुकी ब्रेझा, ह्युंदाई व्हेन्यू, किआ सोनेट, महिंद्रा एक्सयूव्ही 300 आणि एमजी हेक्टर आहेत.
सर्वात सुरक्षित कार
टाटा नेक्सॉन ही भारतातील एक अतिशय लोकप्रिय कॉम्पॅक्ट एसयूव्ही आहे, जी आपल्या सुरक्षा, डिझाइन आणि फीचर्ससाठी ओळखली जाते. ग्लोबल एनसीएपीमध्ये 5 स्टार सेफ्टी रेटिंग मिळवणारी टाटा नेक्सॉन ही भारतातील पहिली कार होती. यात 6 एअरबॅग, ईबीडीसह एबीएस, ईएसपी, ट्रॅक्शन कंट्रोल, हिल होल्ड असिस्ट आणि रियर पार्किंग कॅमेरा असे फीचर्स देण्यात आले आहेत. याची रचना मस्क्युलर आणि मॉडर्न आहे. मजबूत बिल्ड क्वालिटी “टँकसारखी मजबुती” साठी ओळखली जाते.
इंजिन आणि परफॉर्मन्स
सर्वात चांगली गोष्ट म्हणजे ही कार पेट्रोल, डिझेल, CNG आणि इलेक्ट्रिक अशा चार पर्यायांमध्ये उपलब्ध आहे. याशिवाय मॅन्युअल, एएमटी आणि डीसीटी गिअरबॉक्सचा पर्याय आहे. टाटा नेक्सनच्या आत अनेक शानदार आणि लक्झरी फीचर्स उपलब्ध आहेत.
यात प्रीमियम इंटिरिअर देण्यात आले आहे. यात टचस्क्रीन इन्फोटेनमेंट सिस्टिम (अँड्रॉइड ऑटो आणि अॅपल कारप्ले सपोर्ट), डिजिटल इंस्ट्रूमेंट क्लस्टर, ऑटो क्लायमेट कंट्रोल, रियर AC व्हेंट आणि कूल्ड ग्लोव्ह बॉक्स सारखे फीचर्स देण्यात आले आहेत. एवढेच नाही तर नेक्सॉनमध्ये वायरलेस चार्जिंग, हवेशीर सीट, व्हॉईस कमांड आणि आयआरए कनेक्टेड कार टेक सनरूफ आणि 360 डिग्री कॅमेरा आहे.
