ऑफिसला जाण्यासाठी स्वस्त कार हवी? CNG कारची यादीच वाचा
Best CNG Cars for Office: पेट्रोल आणि डिझेलच्या वाढत्या किमतींमुळे त्रस्त झालेले अनेक जण आता CNG आणि इलेक्ट्रिक कारकडे वळत आहेत. भारतात रोज ऑफिसला जाणारे लोक CNG कारकडे जास्त लक्ष देत आहेत. अशातच आज आम्ही तुम्हाला अशाच तीन CNG कारबद्दल सांगणार आहोत, ज्या तुमच्या बजेटसोबतच मायलेजमध्येही बेस्ट असतील. चला जाणून घेऊया.

Best CNG Cars for Office: ऑटो इंडस्ट्रीसाठी भारत ही मोठी बाजारपेठ आहे, इथे तुम्हाला प्रत्येक व्हेरियंटमधून अनेक रंगांची वाहने पाहायला मिळतील. सर्व कार कंपन्या लोकांना डोळ्यासमोर ठेवून वाहने तयार करतात, जेणेकरून प्रत्येक कुटुंब आपले स्वप्न पूर्ण करू शकेल.
तुम्ही रोज ऑफिसला जाण्यासाठी स्वस्त CNG कारच्या शोधात असाल तर आज आम्ही तुम्हाला अशाच काही गाड्यांबद्दल सांगणार आहोत, ज्यानंतर तुमचा शोध संपेल.
भारतातील पेट्रोल आणि डिझेलच्या वाढत्या किंमती पाहता सर्वच कंपन्या CNG आणि इलेक्ट्रिक कारकडे अधिक लक्ष देत आहेत. ग्राहकही या गाड्यांकडे वळत आहेत. ज्यांना रोज 30 ते 40 किमीचे अंतर कापायचे आहे, त्यांच्यासाठी CNG कार हा उत्तम पर्याय आहे. चला जाणून घेऊया काही CNG कारबद्दल.
मारुती सुझुकी ऑल्टो K10 CNG
मारुती ही देशातील सर्वात मोठी कार उत्पादक कंपनी प्रत्येक सेगमेंटची वाहने बनविण्यात माहिर आहे. मारुतीची ऑल्टो K10 CNG सध्या भारतातील सर्वात स्वस्त CNG कार आहे. या कारची किंमत 5 लाख 96 हजार रुपये आहे. या कारमध्ये 4 जण आरामात बसून प्रवासाचा आनंद घेऊ शकतात. अवजड ट्रॅफिकमध्ये सहज बाहेर पडण्याचा दर्जाही या कारमध्ये आहे. या कारमध्ये फ्रंट पॉवर विंडोज, एसी, पार्किंग सेन्सर्स, गिअर शिफ्ट इंडिकेटर, सेंट्रल कंसोल आर्मरेस्ट, हॅलोजन हेडलॅम्प, अॅडजस्टेबल हेडलॅम्प्स, सेंट्रल लॉकिंगसह अनेक जबरदस्त फीचर्स देण्यात आले आहेत.
Tata Tiago iCNG
कंपनीचा दावा आहे की, या कारमध्ये 27 किलोमीटर/किलो मायलेज देण्याची क्षमता आहे. ही 5 सीटर कार आहे. या कारमध्ये 1.2 लीटर इंजिन देण्यात आले आहे, जे CNG मोडवर 73 एचपी पॉवर आणि 95 एनएम टॉर्क जनरेट करते. हे इंजिन 5-स्पीड मॅन्युअल गियर बॉक्ससह सुसज्ज आहे.
मारुती सुझुकी सेलेरियो CNG
या यादीत पुन्हा एकदा मारुती सुझुकी कार आहे. सेलेरियो या CNG कारचा समावेश आहे. CNG व्हेरियंटमध्ये या कारचे सर्वाधिक मायलेज 34.43 किमी प्रति किलो आहे. भारतात या कारची एक्स-शोरूम किंमत 6.69 लाख रुपये आहे. या कारमध्ये 5 लोक आरामात बसू शकतात. या कारमध्ये सुरक्षेचीही काळजी घेण्यात आली आहे. या कारमध्ये अँटी लॉक ब्रेकिंग सिस्टिमसह ईबीडी आणि एअरबॅग्स देखील देण्यात आल्या आहेत.
