अवघ्या 1.6 लाखात घरी न्या Hyundai i10, कार आवडली नाही तर सगळे पैसे परत, जाणून घ्या कुठे मिळतेय ऑफर

तुम्हाला एखादी कार खरेदी करायची असेल परंतु कमी बजेटमुळे तुम्हाला कार खरेदी करता येत नसेल, अथवा त्यात अडचणी येत असतील, तर काळजी करण्याची गरज नाही.

अवघ्या 1.6 लाखात घरी न्या Hyundai i10, कार आवडली नाही तर सगळे पैसे परत, जाणून घ्या कुठे मिळतेय ऑफर

मुंबई : तुम्हाला एखादी कार खरेदी करायची असेल परंतु कमी बजेटमुळे तुम्हाला कार खरेदी करता येत नसेल, अथवा त्यात अडचणी येत असतील, तर काळजी करण्याची गरज नाही. कारण आज आम्ही तुम्हाला एका शानदार ऑफरबद्दल माहिती देणार आहोत, ज्याद्वारे तुम्ही अगदी कमी किंमतीत कार खरेदी करु शकाल. (bring home Hyundai i10 for just 160000 rupees)

कोरोना काळात आपल्याकडे स्वतःची वैयक्तिक कार असणे गरजेजे झाले आहे. जर आपण सेकंड हँड कार (Second Hand Car) विकत घेण्याचा विचार करत असाल परंतु बजेटमुळे चिंतेत असाल, तर ही बातमी तुमच्यासाठी आहे. कारण आज आम्ही तुम्हाला एका शानदार डीलबाबत माहिती देणार आहोत.

आम्ही ज्या कारबद्दल तुम्हाला सांगत आहोत ती कार तुम्हाला शोरुममधून खरेदी करायची असेल तर तुम्हाला 5-6 लाख रुपये मोजावे लागतील. तसेच सध्या इंधनाचे दर गगनाला भिडलेले असताना ग्राहक अधिक मायलेज देणाऱ्या गाड्या घेण्यावर भर देत आहेत. त्यामुळे ही डील तुमच्यासाठी परफेक्ट आहे.

आज आम्ही तुम्हाला ह्युंडई i10 कारच्या एका डीलबाबत माहिती देत आहोत. कारचे मायलेज आणि मेंटेनन्स खूप चांगला आहे. ह्युंडई आय 10 च्या वैशिष्ट्यांबद्दल बोलायचे झाल्यास, यामध्ये 5 सीट्स पर्याय आहे. या कारमध्ये 1197cc इंजिन आहे. हे इंजिन 81.86ps पॉवर आणि 113.75Nm टॉर्कसह येते. या इंजिनमध्ये 5 स्पीड मॅन्युअल गिअरबॉक्स देण्यात आला आहे. वैशिष्ट्यांच्या बाबतीत, तुम्हाला पॉवर विंडो, पॉवर स्टीयरिंग, मल्टी-फंक्शन स्टीयरिंग व्हील, पॉवर अॅडजस्टेबल एक्सटीरियर व्ह्यू मिरर, अँटी-लॉक ब्रेकिंग सिस्टम, फ्रंट सीट आणि वाहनात ड्युअल बॅग्स मिळतात.

मायलेजबद्दल बोलायचे झाल्यास ही कार एक लीटर पेट्रोलमध्ये 18.9 किमीचे मायलेज देते, ही कार सध्या CARS24 वर सूचीबद्ध आहे, जिथे त्याची किंमत 1.6 लाख रुपये ठेवण्यात आली आहे. हे 2009 चे मॉडेल आहे. ही कार आतापर्यंत 86,423 किलोमीटर धावली आहे. या कारची नोंदणी DL-4C RTO ची आहे.

ही कार खरेदी केल्यावर तुम्हाला 6 महिन्यांची वॉरंटी आणि 7 दिवसांची मनी बॅक गॅरंटी देखील मिळेल. दुसरीकडे, जर तुमचे बजेट कमी असेल तर कंपनी या कारवर कर्जाची सुविधा देखील देते. यासाठी तुम्हाला झिरो डाउनपेमेंट करावे लागेल आणि पुढील 60 महिन्यांसाठी तुम्हाला दर महिन्याला 3840 रुपये ईएमआय म्हणून भरावे लागतील.

महत्त्वाची सूचना : जर आपण ही सेकंड हँड कार घेणार असाल तर सर्व बाजूंनी कार तपासून पाहा. कारचं डेंटिंग आणि पेंटिंग तपासा. कार मालकाचे कागदपत्र तपासा. त्याच वेळी, कार आणि कागदपत्रांची कसून चौकशी केल्यानंतरच ही कार खरेदी करा. तसेच बातमीत दिलेली माहिती ही CARS24 वरुन घेतली आहे.

इतर बातम्या

मारुतीनंतर आता तुमच्या आवडत्या टाटा कार महागणार, जाणून घ्या किंमत किती वाढणार?

ड्रायव्हिंग लायसन्स आणि आरसी पेपर सोबत बाळगण्याचं आता नो टेन्शन, DigiLocker ला मिळाली मान्यता

Tata चा CNG गाड्यांच्या धडाका, अवघ्या 5 हजारात बूक करा किफायतशीर कार

(bring home Hyundai i10 for just 160000 rupees)

Read Full Article

Click on your DTH Provider to Add TV9 MARATHI