शानदार ऑफर! 60 हजारांची बाईक अवघ्या 23 हजारात खरेदीची संधी

टीव्ही 9 मराठी डिजीटल टीम

| Edited By: |

Updated on: Jul 04, 2021 | 3:33 PM

तुम्हाला एखादी बाईक खरेदी करायची असेल परंतु कमी बजेटमुळे त्यात अडचणी येत असतील, तर काळजी करण्याची गरज नाही.

शानदार ऑफर! 60 हजारांची बाईक अवघ्या 23 हजारात खरेदीची संधी
Hero Honda Splendor Plus
Follow us

मुंबई : तुम्हाला एखादी बाईक खरेदी करायची असेल परंतु कमी बजेटमुळे तुम्हाला बाईक खरेदी करता येत नसेल, अथवा त्यात अडचणी येत असतील, तर काळजी करण्याची गरज नाही. कारण आज आम्ही तुम्हाला एका शानदार ऑफरबद्दल माहिती देणार आहोत, ज्याद्वारे तुम्ही अगदी कमी किंमतीत बाईक खरेदी करु शकाल. (Buy Hero Honda splendor plus in just Rs 23000)

आज आम्ही तुम्हाला अशा एका वेबसाइटबद्दल माहिती सांगणार आहोत ज्यावरून तुम्ही अगदी कमी किंमतीत बाईक खरेदी करू शकता. यावर तुम्हाला कमी किंमतीत दुचाकी आणि स्कूटर दोन्ही खरेदी करता येतील. CredR असं या या वेबसाईटचं नाव आहे. या वेबसाईटवर तुम्हाला सर्व प्रकारच्या सेकेंड हँड बाईक्स आणि स्कूटर खूपच कमी किंमतीत मिळतील. CredR जुन्या बाइक्सचं नूतनीकरण करून त्या बाईक्सची विक्री करते. सोबतच वॉरंटी आणि RC हस्तांतरणाची सुविधादेखील प्रदान करते.

23 हजारात Hero Honda splendor plus बाईक

CredR वर तुम्हाला केवळ 23,000 रुपयांमध्ये नुतनीकरण करण्यात आलेली Hero Honda splendor plus बाईक खरेदी करता येईल. ही बाईक 97cc ची आहे. वेबसाईटवर देण्यात आलेल्या माहितीनुसार ही एक फर्स्ट ओनर बाईक आहे. ही बाईक खरेदी केल्यास तुम्हाला 7 दिवसांचा बाय प्रोटेक्ट, 6 महिन्यांची वारंटी, अश्योर्ड आरसी ट्रान्सफरची सुविधा दिली जाईल.

ग्राहक या लिंकवर (https://www.credr.com/all-used-bikes-in-Bangalore-Bellandur/Hero-Honda-Splendor-Plus/13978) जाऊन या बाईकबाबतची माहिती घेऊ शकतात. ही बाईक बँगलोरमधील बेलंदूर येथे उपलब्ध आहे. तसेच वेबसाईटवर देण्यात आलेल्या माहितीनुसार ही बाईक फक्त 22,221 किलोमीटर धावली आहे. तसेच केवळ 399 रुपये देऊन तुम्ही या बाईकची डोरस्टेप डिलिव्हरी प्राप्त करु शकता. तसेच शोरुमवर जाऊन तुम्ही या बाईकबाबतची माहिती घेऊ शकता.

(सूचना : या बातमीत संबंधित बाईकबद्दल दिलेली माहिती ही CredR वेबसाईटवरुन घेतली आहे. अधिक माहितीसाठी संबंधित वेबसाईटवर संपर्क साधावा.)

इतर बातम्या

‘या’ इलेक्ट्रिक बाईकच्या किंमतीत 28000 रुपयांची कपात, सिंगल चार्जवर 150 किमी रेंज

भारतात यामाहा लॉन्च करणार इलेक्ट्रिक मोटरसायकल; जाणून घ्या कंपनीचे नियोजन

1 जुलैपासून ‘या’ कंपनीच्या दुचाकींची किंमत वाढणार, बुकिंगसाठी शेवटचा दिवस

Non Stop LIVE Update

Related Stories

Click on your DTH Provider to Add TV9 MARATHI