1 जुलैपासून ‘या’ कंपनीच्या दुचाकींची किंमत वाढणार, बुकिंगसाठी शेवटचा दिवस

Hero bikes and scooters | कंपनीच्या या निर्णयामुळे हिरो मोटोकॉर्पच्या दुचाकींच्या सर्वच मॉडेल्सची किंमत साधारण 3000 रुपयांनी वाढेल. यापूर्वी मार्च महिन्यात हिरोच्या दुचाकींची किंमत 2500 रुपयांनी वाढवण्यात आली होती.

1 जुलैपासून 'या' कंपनीच्या दुचाकींची किंमत वाढणार, बुकिंगसाठी शेवटचा दिवस
हिरो मोटोकॉर्प

मुंबई: देशातील आघाडी वाहननिर्माती कंपनी असणाऱ्या हिरो मोटोकॉर्पच्या दुचाकींची किंमत 1 जुलैपासून वाढणार आहे. कंपनीच्या सर्वच दुचाकींच्या किंमतीत वाढ करण्याची घोषणा काही दिवसांपूर्वीच हिरो मोटोकॉर्पकडून करण्यात आली होती. त्यानुसार गुरुवारपासून नवे दर लागू होतील. (hero motocorp bikes price will increase from 1st July 2021)

कंपनीच्या या निर्णयामुळे हिरो मोटोकॉर्पच्या दुचाकींच्या सर्वच मॉडेल्सची किंमत साधारण 3000 रुपयांनी वाढेल. यापूर्वी मार्च महिन्यात हिरोच्या दुचाकींची किंमत 2500 रुपयांनी वाढवण्यात आली होती. गेल्या काही काळात उत्पादन खर्चात वाढ झाल्यामुळे दुचाकींच्या किंमतीत वाढ केल्याचे कंपनीकडून सांगण्यात आले.

28000 रुपयांच्या बंपर डिस्काउंटसह Hero Electric स्कूटर्स खरेदी करा

इलेक्ट्रिक स्कूटर (Electric Scooters) आणि बाईकची बाजारपेठ वेगाने वाढत आहे. पेट्रोल आणि डिझेलचे वाढते दर पाहता लोक मोठ्या प्रमाणात इलेक्ट्रिक वाहनांची खरेदी करत आहेत. इलेक्ट्रिक दुचाकींच्या खरेदीला चालना देण्यासाठी सरकारने फेम II च्या (FAME II) अनुदानामध्येही बदल केला आहे, त्यानंतर या वाहनांची किंमत आणखी कमी झाली आहे. या वाहनांच्या किंमती हजारो रुपयांनी कमी झाल्या आहेत.

FAME II अनुदानाच्या दुरुस्तीनंतर, सर्व इलेक्ट्रिक वाहन उत्पादकांनी त्यांच्या दुचाकी आणि स्कूटरची किंमत कमी केली आहे. हिरो इलेक्ट्रिकने आपल्या स्कूटरच्या किंमतीतही 12 ते 33 टक्क्यांनी कपात केली असून यामध्ये सर्वाधिक फायदा ट्रिपल बॅटरीसह येणाऱ्या Nyx HX स्कूटरमध्ये दिला जात आहे.

मुंबईत एका लीटर पेट्रोलसाठी 105 रुपये; डिझेलही ‘सेंच्युरी’च्या उंबरठ्यावर

गेल्या काही दिवसांपासून इंधनाच्या दरात सातत्याने वाढ होत आहे. पेट्रोल-डिझेलच्या वाढणाऱ्या किंमती सामान्यांसाठी चिंतेचे प्रमुख कारण ठरत आहे. मुंबईत बुधवारी एका लीटर पेट्रोलची (Petrol) किंमत तब्बल 105 रुपयांवर जाऊन पोहोचली आहे. तर डिझेलही लवकरच शंभरी गाठेल, अशी चिन्हे दिसत आहेत. मंगळवारी इंधनाच्या दरात जून महिन्यातील 16 वी दर वाढ नोंदवण्यात आली होती. त्यामुळे पेट्रोलचे दर 34 पैशांनी तर डिझेल 30 पैशांनी महागले. पेट्रोल आणि डिझेलच्या दरात बुधवारी कोणताही बदल झालेला नाही.

संबंधित बातम्या:

टॅक्स, बँकिंग, सिलेंडरचे दर; 1 जुलैपासून मोठ्या बदलांची शक्यता, जाणून घ्या सर्वकाही

Harrier, Nexon सह Tata च्या गाड्यांवर 65000 रुपयांपर्यंतचा डिस्काऊंट

इथेनॉल-बेस्ड फ्लेक्स इंजिनला भारतात लवकरच परवानगी, प्रतिलीटर 30-35 रुपयांची बचत

(hero motocorp bikes price will increase from 1st July 2021)

Click on your DTH Provider to Add TV9 MARATHI